Latest Post

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- शासकीय पातळीवरुन १ तारखेपर्यत लाँकडाऊनची घोषणा केल्यामुळे १ जुनला नागरीकांनी खुलेआम फिरण्यास सुरुवात केली असुन आपल्याकडे पाँजिटीव्ह रुग्णांची संख्या पहाता लाँकडाऊन सुरुच असुन नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका असे अवाहन पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी केले आहे.एक जुन उजाडताच व्यापार्यांनी लाँकडाऊन शिथील झाला या अविर्भावात व्यवहार सुरु केले तसेच नागरीकही विनाकारण बाहेर पडू लागले आहेत मात्र

आपल्या जिल्ह्यात असलेली पाँजिटीव्ह रुग्णांची संख्या पहाता आपल्या जिल्ह्यात तालुक्यात लाँकडाऊनच्या नियमात शिथीलता आलेली नाही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून आपल्या सर्वांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे विनाकारण घराबाहेर पडू नका मास्क व सँनिटायझरचा वापर करा असे अवाहन पोलीस निरीक्षक सांजय सानप यांनी केले असुन नियमाचे पालन न करणारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा ईशाराही सानप यांनी दिला आहे.

 

*कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळीला Dysp संदीप मिटकेंचा झटका,*

*चोरी आणि बनावट पोलिस ओळखपत्र तयार केल्याचा गुन्हा दाखल*

सुपा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यातील कुख्यात नयन तांदळे टोळी यांनी आणखी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले  आहे. मोक्काच्या  गुन्ह्याचा तपास करीत असताना Dysp संदीप मिटके यांच्या निदर्शनास आले की, नयन तांदळे व त्याचे साथीदार यांनी चोरी आणि बनावट पोलीस ओळखपत्र बनवण्याचा गुन्हा केलाआहे त्यावरून तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून नयन तांदळे टोळीस मोठा झटका दिला आहे.

     फिर्यादी महेश  साहेबराव ससे वय 29 वर्ष धंदा व्यवसाय रा.झोपडी कॅन्टीन अहमदनगर यांचे दि 21/12/2020 रोजी नगर मनमाड रोड वरील झोपडी कॅन्टीन जवळील येवले चहाचे दुकाना समोरून  नयन तांदळे व त्याचे साथीदारांनी फिर्यादी हे चहा पिण्याकरिता गेले असता त्यांचे खिशातील पाकीट चोरून त्यामध्ये असणारे फोटोचा गैरवापर करून बनावट पोलीस ओळखपत्र तयार करून फिर्यादीची तसेच  पोलिस विभागाची फसवणूक केली आहे त्यानुसार नयन तांदळे टोळी विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन येथे.वरील दिलेल्या मजकूरचे फिर्यादी वरून अजून एक गुन्हा रजि. नंबर I 419/2021 भा.द.वि. कलम. 379,467,468,471,419,420,34 प्रमाणे दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास A.P.I.मुंडे हे करत आहेत.


*श्रीरामपुरातील सुरक्षा रामभरोसे!*

♦️श्रीरामपूर शहरात विविध भागात बसवलेले काही सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आले आहे. तसे लेखी पत्रच

श्रीरामपूर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी माहिती अधिकारात माहिती मागविलेल्या कार्यकर्त्याला दिले असल्याने श्रीरामपूर शहराची सुरक्षा रामभरोसे आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

*सीसीटीव्ही फुटेजची केली होती मागणी*

♦️श्रीरामपूर शहरातील असलम बिनसाद यांनी २६ एप्रिल रोजी शहर पोलिस स्टेशनला माहिती अधिकारात माहिती मागितली होती. त्यामध्ये २३ एप्रिल रोजीची पोलिसांकडून झालेल्या या अमानुष मारहाणी मुळे युवकाचे हात फँक्चर तर अनेकांना झाली अमानुष मारहाण प्रकरणाचे एका चौकातील सायंकाळच्या दरम्यानची सीसीटीव्ही फुटेज मिळण्यास विनंती केली होती.


*पोलिसांनी दिले हे उत्तर*

♦️पोलिसांनी असलम बिनसाद यांना पोलिस स्टेशनच्या लेटर पॅडवर २१ मे रोजी लिखित दिले की, 'आमच्या पोलिस स्टेशनच्या डीव्हीआरमध्ये वरील तारखेस तांत्रिक अडचण आल्याने सीसीटीव्ही फुटेजची रेकॉर्डिंग उपलब्ध होऊ शकली नाही, म्हणून आपणास सीसीटीव्हीची रेकॉर्डिंग देण्यात आली नाही.'

*शहरातील सुरक्षा विषयी  केला सवाल*

♦️शासकीय व प्रशासकीय अधिकारी यावर घेणार का अँक्शन.

♦️शहरातील सुरक्षा व्यवस्था बंद पडल्याची केली होती का नोंद.

♦️ श्रीरामपूरातील वरिष्ठ अधिकारी यांची चुप्पी का?

♦️  जिल्हा पोलीस प्रमुख करणार का कारवाई.

बेलापूर(प्रतिनिधी  )- कोरोना काळात अडचणीत सापडलेले मागास वर्गीय अंपग महीलांना आधार देण्यासाठी  महीला व बाल कल्याण निधीतुन १०% रक्कम खर्च करावी अशी मागणी सरपंच  महेंद्र साळवी यांच्याकडे चंद्रकांत नाईक व इतरांनी केली आहे                                बेलापुर  ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र साळवी व ग्राम विकास अधिकारी राजेश तगरे  यांना दिलेल्या  निवेदनात पुढे म्हटले आहे की बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत फंडातील सन 2020-21 व सन 2021 -22 या दोन वर्षांचा मागासवर्गीय 15 टक्के, अपंग 5 टक्के, महिला व बालकल्याण 10 टक्के ग्रा. प. फंडातून खर्च करावयाच्या निधीचे  वाटप तातडीने करावे व  कोरोना सारख्या आजारामुळे लॉक डाऊन असल्याने मोल मजुरी चे काम बंद आहे  या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या मागासवर्गीय अपंग महिलांना जीवनावश्यक वस्तू औषधे आदी कामा साठी रोख स्वरूपात ग्रा. पंचायतने निधिच्या रकमेतून आर्थिक सहाय्य करावे तसेच गावामधे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे डेंगू मलेरिया टायफॉईड सारखे साथी च्या आजार चा फैलाव होऊ शकतो यासाठी गावा मध्ये व वाड्या वस्त्यावर डास निर्मूलन औषधा ची फवारणी करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सरपंच श्री महिंद्र साळवी ग्राम विकास अधिकारी श्री तगरे  यांना निवेदन देण्यात आले या वेळी  सर्वश्री चंद्रकांत पाटील नाईक, अय्याज  सय्यद, विजय शेलार, भाऊसाहेब तेलोरे, सुरेश अमोलिक, अनिल पवार, प्रकाश जाजू, अक्षय नाईक, वैभव कुर्ह्र त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य भरत साळुंके व रविंद्र  खटोड, मुश्ताक शेख, रमेश अमोलिक आदी उपस्थित होते

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपूर शहरातील  अजब प्रकार माहिती अधिकारात उघडकीस आला असुन श्रीरामपूर शहरात अनेक ठिकाणी  चक्क सी सी टी व्ही कँमेरे  बंद असल्याचे पत्र श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या कार्यकर्त्याला लेखी दिले असल्याने श्रीरामपूर शहराची सुरक्षा राम भरोसे असल्याचे दिसून येत आहे       या बाबत मिळालेली माहीती  अशी कि श्रीरामपूर शहरातील तिरंगा न्युज चे संपादक असलम बिनसाद यांनी दिनांक २६ एप्रिल २०२१ रोजी शहर पोलीस स्टेशनला माहिती अधिकारात माहिती मागितली होती कि दिनांक २३ एप्रिल २०२१ रोजीची छ.शिवाजी चौकातील सायंकाळच्या दरम्यानची सी सी टी वि फुटेज मीळण्यास विनंती केली होती त्यावर शहर पोलीस स्टेशनने असलम बिनसाद यांना पोलीस स्टेशनच्या लेटर पॅडवर दिनांक २१ मे २०२१ रोजी लिखित पत्र  दिले कि आमच्या पोलीस स्टेशनचे  डी व्ही आर यात वरील तारखेस तांत्रिक अडचण  आल्याने  सी सी टी वि फुटेज ची रेकॉर्डिंग उपलब्ध होऊ शकली नाही म्हणून आपणास सी सी टी वि ची रेकॉर्डिंग देण्यात आली नाही असा उल्लेख शहर पोलीस स्टेशने केला आहे यावरून स्पष्ट होते कि हे सी सी टी वि कॅमेरे हे फक्त शोभेचे बाहुले आहे की काय ? पोलिसांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठी लावले असल्याने शहराची सुरक्षा राम भरोसे आहे असे म्हणण्याची पाळी आली आहे दिलेल्या माहिती अधिकारात असे उत्तर शहर पोलीस स्टेशन कडून अपेक्षित नव्हते कारण कि शहरात गजबजल्या ठिकाणीच जर सी सी टी वि बंद आहेत तर  पोलिसांना हे माहित  बंद असलेले सी सी टि व्ही सुरु करण्याची तसदी का घेतली नाही  आहेत कदाचित कँमेरे चालूही असतील परतु काही माहीती उघड होवु नये  म्हणून तर अश्या प्रकारचे पत्र देऊन माहिती अधिकारी कार्यकर्त्यांची दिशाभूल केली की काय अशी शंका येत आहे   ह्या माहिती आधीकारात पाठविलेल्या  प्रथम अपीलीय अधिकारी पोलीस उप विभागीय अधिकारी यांच्या कडे अपील दाखल करणार असल्याचे  असलम बिनसाद यांनी प्रसार माध्यम यांना सांगितले .

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- सध्या सर्वत्रच कोरोनाने हाहाकार माजवला आहे, सुरक्षितेचा उपाय म्हणून जिल्हाभरात लॉकडाऊन लावण्यात आले आहे, शासनाच्या आदेशान्वये दुचाकीवर एकाच प्रवाशात अत्यावश्यक कामांसाठी परवानगी देण्यात आलेली आहे,अशा प्रकारे शासनस्तरावरून कोरोनास प्रतिबंध घालण्याच्या विविध उपाययोजना चालु आहे,हे खरोखरच स्तूतीजन्य व रास्त असलेतरी,आता प्रत्येकाच्या घरी काही चारचाकी वाहन नक्कीच नाही,किंबाहूना दुचाकीही नाही,मात्र परीवारातील कोणी सदस्य आजारी असल्यास अक्षरशः शेजाऱ्यांकडून तात्पुर्ती दुचाकी घेऊन का होईना जर संबंधित रुग्णांस रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केल्यास अथवा घेऊन गेल्यास आपल्या प्राणांची पर्वा न करता केवळ जनमानसासाठी भररस्त्यावर उभा पोलिस दादा आपल्या काठीने दुचाकीची खोपडी फोडतो,

इंडिगेटर तोडतो त्यावर दोनशे रुपयांचा दंड फाडतो,मात्र काहीही बोलायास गेलो की चक्क दुचाकी पोलिस स्टेशनला ओढतो, स्वतः:च दुखत असल्याने रुग्णांना दुचाकीवर बसवून रुग्णालयात जाता येईना, आणि दुसऱ्यांना देखील त्यांना दुचाकीवर बसवून रुग्णालयात नेता येईना,अशा पद्धतीने जनसामान्यांना मोठ्या संतापाचा सामना करावा लागत आहे,काही ठिकाणी तर एकट्या दुचाकी चालकास कुठलीही विचारपूस न करता दुचाकी दिसताच लांबुनच काही पोलिस दादा काठी फेकुन मारण्याचे यशस्वी प्रयोग करत आहेत,यामध्ये रुग्णांसह दुचाकीस्वारास खाली कोसळून गंभीर दुखापतीस सामोरे जावे लागत आहे,नुकतेच एक प्रकरण  मागेही असेच घडले आहे, ज्यात एका धार्मिक स्थळाचा सेवेकरी धार्मिक स्थळाचा अश्व (घोडा) घेऊन चालला होता,त्यास पोलिसदादांकरवी इतकी अमानूष मारहाण करण्यात आली की हात फॅक्चर होऊन थेड रुग्णालयात दाखल व्हावे लागले,अशाप्रकारे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या नावाखाली श्रीरामपूर शहरात पोलिसदादांकरवी लोकांना मारहाण आणि जबरदस्तीने दंड पावती फाडण्याचे कामे सध्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, यावर ज्यांचे नियंत्रण असावे असे वरीष्ठ पोलिस अधिकारी देखील यावर काहीच बोलण्यास तयार नाही, यामुळे सदरील प्रकरणी त्यांचाही अशा गैरप्रकारांना छुपा पाठिंबाच असल्याचे दिसून येत आहे.

पोलिस प्रशासन'आरोग्य सेवा ही आजच्या काळात साक्षात देवदुतच आहेत याबाबत दुमत नाहीच,मात्र यातील काही असंमंजस प्रवृती या पवित्र खात्याला आणि नात्याला बदनाम करु पाहत आहेत,यावर  जिल्हाधिकारी/जिल्हा पोलिस प्रमुख,जनतेला दिलासा दायक काही निर्णय घेतील का ? अन्यथा जनतेवर होत असलेला अन्याय आणि त्यांच्या गळचेपीवर सामाजिक कार्यकर्ताआता गप्प बसणार नाहीत तर याविरुद्ध आवाज उठविणार असल्याचे समाजवादी पार्टी चे उत्तर जिल्हाध्यक्ष तथा जे.जे.फाऊंडेशनचे अध्यक्ष जोएफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी )-लोक सहभागातुन सुरु केलेल्या कोवीड केअर सेंटरला एक महीन्याचा कालावधी पुर्ण झाला असुन या कालावधीत दोनशे रुग्ण बरे होवुन सुखरुप घरी गेले असल्याची माहीती जि. प .सदस्य शरद नवले यांनी दिली .  बेलापुर येथील मराठी शाळेत सुरु असलेल्या मोफत कोवीड केअर सेंटरला एक महीना पुर्ण झाल्याचे औचित्य साधुन तसेच १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजातुन खरेदी केलेल्या अँम्बुलन्सचा लोकार्पण सोहळा जि .प. सदस्य शरद नवले यांच्या हस्ते डाँक्टर देविदास चोखर ,सरपंच महेंद्र साळवी यां मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला  .   या वेळी बोलताना जि. प. सदस्य शरद नवले म्हणाले की जिल्हा परिषदेच्या १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजातुन  अँम्बुलन्स खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यातील एक अँम्बुलन्स बेलापुर प्राथमिक आरोग्य केद्रास देण्यात आलेली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बारा गावे येत असुन नविन अँम्बुलन्समुळे वैद्यकीय अधिकार्यांना काम करणे सोपे होईल . लोक सहभागातुन सुरु करण्यात आलेल्या कोवीड केअर सेटर मधुन रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा दिल्यामुळे सर्व रुग्ण ठणठणीत बरे झाले . हे सर्व कार्य पार पाडण्यासाठी गाव व परिसरातील अनेक दाते, देणगीदार धावुन आले .सर्वांनी केलेल्या योगदानामुळेच हे अवघड काम शक्य झाले असुन गावाचे गावपण टिकविण्यासाठी सर्वांनी अशीच एकजुट दाखवावी असे अवाहनही नवले यांनी केले आहे. या वेळी डाँक्टर सुधीर काळे ,डाँक्टर रविंद्र गंगवाल, डाँक्टर मच्छिंद्र निर्मळ ,डाँक्टर अविनाश  गायकवाड ,डाँक्टर अनिल भगत, रणजीत श्रीगोड ,अजय डाकले, पुरुषोत्तम भराटे, पोलीस पाटील अशोक प्रधान, भाजपाचे प्रफुल्ल डावरे, बाळासाहेब दाणी, साहेबराव वाबळे, अकबर टिन मेकरवाले, मुस्ताक शेख, रमेश अमोलीक, अशोक राशिनकर, संतोष डाकले, मिनु अंबिलवादे ,दिलीप अमोलीक, नाना चव्हाण ,सोमनाथ जवरे, किरण गागरे ,अमोल गाढे, सतीश शेलार ,विशाल आंबेकर, महेश कुर्हे ,संतोष शेलार उपस्थित होते .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget