कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळीला Dysp संदीप मिटकेंचा झटका,चोरी आणि बनावट पोलिस ओळखपत्र तयार केल्याचा गुन्हा दाखल.

 

*कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळीला Dysp संदीप मिटकेंचा झटका,*

*चोरी आणि बनावट पोलिस ओळखपत्र तयार केल्याचा गुन्हा दाखल*

सुपा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यातील कुख्यात नयन तांदळे टोळी यांनी आणखी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले  आहे. मोक्काच्या  गुन्ह्याचा तपास करीत असताना Dysp संदीप मिटके यांच्या निदर्शनास आले की, नयन तांदळे व त्याचे साथीदार यांनी चोरी आणि बनावट पोलीस ओळखपत्र बनवण्याचा गुन्हा केलाआहे त्यावरून तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून नयन तांदळे टोळीस मोठा झटका दिला आहे.

     फिर्यादी महेश  साहेबराव ससे वय 29 वर्ष धंदा व्यवसाय रा.झोपडी कॅन्टीन अहमदनगर यांचे दि 21/12/2020 रोजी नगर मनमाड रोड वरील झोपडी कॅन्टीन जवळील येवले चहाचे दुकाना समोरून  नयन तांदळे व त्याचे साथीदारांनी फिर्यादी हे चहा पिण्याकरिता गेले असता त्यांचे खिशातील पाकीट चोरून त्यामध्ये असणारे फोटोचा गैरवापर करून बनावट पोलीस ओळखपत्र तयार करून फिर्यादीची तसेच  पोलिस विभागाची फसवणूक केली आहे त्यानुसार नयन तांदळे टोळी विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन येथे.वरील दिलेल्या मजकूरचे फिर्यादी वरून अजून एक गुन्हा रजि. नंबर I 419/2021 भा.द.वि. कलम. 379,467,468,471,419,420,34 प्रमाणे दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास A.P.I.मुंडे हे करत आहेत.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget