श्रीरामपुर (प्रतिनिधी )- शासकीय पातळीवरुन १ तारखेपर्यत लाँकडाऊनची घोषणा केल्यामुळे १ जुनला नागरीकांनी खुलेआम फिरण्यास सुरुवात केली असुन आपल्याकडे पाँजिटीव्ह रुग्णांची संख्या पहाता लाँकडाऊन सुरुच असुन नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका असे अवाहन पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी केले आहे.एक जुन उजाडताच व्यापार्यांनी लाँकडाऊन शिथील झाला या अविर्भावात व्यवहार सुरु केले तसेच नागरीकही विनाकारण बाहेर पडू लागले आहेत मात्र
आपल्या जिल्ह्यात असलेली पाँजिटीव्ह रुग्णांची संख्या पहाता आपल्या जिल्ह्यात तालुक्यात लाँकडाऊनच्या नियमात शिथीलता आलेली नाही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून आपल्या सर्वांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे विनाकारण घराबाहेर पडू नका मास्क व सँनिटायझरचा वापर करा असे अवाहन पोलीस निरीक्षक सांजय सानप यांनी केले असुन नियमाचे पालन न करणारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा ईशाराही सानप यांनी दिला आहे.
Post a Comment