बेलापुर (प्रतिनिधी )-लोक सहभागातुन सुरु केलेल्या कोवीड केअर सेंटरला एक महीन्याचा कालावधी पुर्ण झाला असुन या कालावधीत दोनशे रुग्ण बरे होवुन सुखरुप घरी गेले असल्याची माहीती जि. प .सदस्य शरद नवले यांनी दिली . बेलापुर येथील मराठी शाळेत सुरु असलेल्या मोफत कोवीड केअर सेंटरला एक महीना पुर्ण झाल्याचे औचित्य साधुन तसेच १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजातुन खरेदी केलेल्या अँम्बुलन्सचा लोकार्पण सोहळा जि .प. सदस्य शरद नवले यांच्या हस्ते डाँक्टर देविदास चोखर ,सरपंच महेंद्र साळवी यां मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला . या वेळी बोलताना जि. प. सदस्य शरद नवले म्हणाले की जिल्हा परिषदेच्या १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजातुन अँम्बुलन्स खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यातील एक अँम्बुलन्स बेलापुर प्राथमिक आरोग्य केद्रास देण्यात आलेली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बारा गावे येत असुन नविन अँम्बुलन्समुळे वैद्यकीय अधिकार्यांना काम करणे सोपे होईल . लोक सहभागातुन सुरु करण्यात आलेल्या कोवीड केअर सेटर मधुन रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा दिल्यामुळे सर्व रुग्ण ठणठणीत बरे झाले . हे सर्व कार्य पार पाडण्यासाठी गाव व परिसरातील अनेक दाते, देणगीदार धावुन आले .सर्वांनी केलेल्या योगदानामुळेच हे अवघड काम शक्य झाले असुन गावाचे गावपण टिकविण्यासाठी सर्वांनी अशीच एकजुट दाखवावी असे अवाहनही नवले यांनी केले आहे. या वेळी डाँक्टर सुधीर काळे ,डाँक्टर रविंद्र गंगवाल, डाँक्टर मच्छिंद्र निर्मळ ,डाँक्टर अविनाश गायकवाड ,डाँक्टर अनिल भगत, रणजीत श्रीगोड ,अजय डाकले, पुरुषोत्तम भराटे, पोलीस पाटील अशोक प्रधान, भाजपाचे प्रफुल्ल डावरे, बाळासाहेब दाणी, साहेबराव वाबळे, अकबर टिन मेकरवाले, मुस्ताक शेख, रमेश अमोलीक, अशोक राशिनकर, संतोष डाकले, मिनु अंबिलवादे ,दिलीप अमोलीक, नाना चव्हाण ,सोमनाथ जवरे, किरण गागरे ,अमोल गाढे, सतीश शेलार ,विशाल आंबेकर, महेश कुर्हे ,संतोष शेलार उपस्थित होते .
Post a Comment