श्रीरामपूर (प्रतिनिधी)- सध्या सर्वत्रच कोरोनाने हाहाकार माजवला आहे, सुरक्षितेचा उपाय म्हणून जिल्हाभरात लॉकडाऊन लावण्यात आले आहे, शासनाच्या आदेशान्वये दुचाकीवर एकाच प्रवाशात अत्यावश्यक कामांसाठी परवानगी देण्यात आलेली आहे,अशा प्रकारे शासनस्तरावरून कोरोनास प्रतिबंध घालण्याच्या विविध उपाययोजना चालु आहे,हे खरोखरच स्तूतीजन्य व रास्त असलेतरी,आता प्रत्येकाच्या घरी काही चारचाकी वाहन नक्कीच नाही,किंबाहूना दुचाकीही नाही,मात्र परीवारातील कोणी सदस्य आजारी असल्यास अक्षरशः शेजाऱ्यांकडून तात्पुर्ती दुचाकी घेऊन का होईना जर संबंधित रुग्णांस रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केल्यास अथवा घेऊन गेल्यास आपल्या प्राणांची पर्वा न करता केवळ जनमानसासाठी भररस्त्यावर उभा पोलिस दादा आपल्या काठीने दुचाकीची खोपडी फोडतो,
इंडिगेटर तोडतो त्यावर दोनशे रुपयांचा दंड फाडतो,मात्र काहीही बोलायास गेलो की चक्क दुचाकी पोलिस स्टेशनला ओढतो, स्वतः:च दुखत असल्याने रुग्णांना दुचाकीवर बसवून रुग्णालयात जाता येईना, आणि दुसऱ्यांना देखील त्यांना दुचाकीवर बसवून रुग्णालयात नेता येईना,अशा पद्धतीने जनसामान्यांना मोठ्या संतापाचा सामना करावा लागत आहे,काही ठिकाणी तर एकट्या दुचाकी चालकास कुठलीही विचारपूस न करता दुचाकी दिसताच लांबुनच काही पोलिस दादा काठी फेकुन मारण्याचे यशस्वी प्रयोग करत आहेत,यामध्ये रुग्णांसह दुचाकीस्वारास खाली कोसळून गंभीर दुखापतीस सामोरे जावे लागत आहे,नुकतेच एक प्रकरण मागेही असेच घडले आहे, ज्यात एका धार्मिक स्थळाचा सेवेकरी धार्मिक स्थळाचा अश्व (घोडा) घेऊन चालला होता,त्यास पोलिसदादांकरवी इतकी अमानूष मारहाण करण्यात आली की हात फॅक्चर होऊन थेड रुग्णालयात दाखल व्हावे लागले,अशाप्रकारे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या नावाखाली श्रीरामपूर शहरात पोलिसदादांकरवी लोकांना मारहाण आणि जबरदस्तीने दंड पावती फाडण्याचे कामे सध्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, यावर ज्यांचे नियंत्रण असावे असे वरीष्ठ पोलिस अधिकारी देखील यावर काहीच बोलण्यास तयार नाही, यामुळे सदरील प्रकरणी त्यांचाही अशा गैरप्रकारांना छुपा पाठिंबाच असल्याचे दिसून येत आहे.
पोलिस प्रशासन'आरोग्य सेवा ही आजच्या काळात साक्षात देवदुतच आहेत याबाबत दुमत नाहीच,मात्र यातील काही असंमंजस प्रवृती या पवित्र खात्याला आणि नात्याला बदनाम करु पाहत आहेत,यावर जिल्हाधिकारी/जिल्हा पोलिस प्रमुख,जनतेला दिलासा दायक काही निर्णय घेतील का ? अन्यथा जनतेवर होत असलेला अन्याय आणि त्यांच्या गळचेपीवर सामाजिक कार्यकर्ताआता गप्प बसणार नाहीत तर याविरुद्ध आवाज उठविणार असल्याचे समाजवादी पार्टी चे उत्तर जिल्हाध्यक्ष तथा जे.जे.फाऊंडेशनचे अध्यक्ष जोएफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Post a Comment