श्रीरामपुर (प्रतिनिधी )-श्रीरामपूर शहरातील अजब प्रकार माहिती अधिकारात उघडकीस आला असुन श्रीरामपूर शहरात अनेक ठिकाणी चक्क सी सी टी व्ही कँमेरे बंद असल्याचे पत्र श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या कार्यकर्त्याला लेखी दिले असल्याने श्रीरामपूर शहराची सुरक्षा राम भरोसे असल्याचे दिसून येत आहे या बाबत मिळालेली माहीती अशी कि श्रीरामपूर शहरातील तिरंगा न्युज चे संपादक असलम बिनसाद यांनी दिनांक २६ एप्रिल २०२१ रोजी शहर पोलीस स्टेशनला माहिती अधिकारात माहिती मागितली होती कि दिनांक २३ एप्रिल २०२१ रोजीची छ.शिवाजी चौकातील सायंकाळच्या दरम्यानची सी सी टी वि फुटेज मीळण्यास विनंती केली होती त्यावर शहर पोलीस स्टेशनने असलम बिनसाद यांना पोलीस स्टेशनच्या लेटर पॅडवर दिनांक २१ मे २०२१ रोजी लिखित पत्र दिले कि आमच्या पोलीस स्टेशनचे डी व्ही आर यात वरील तारखेस तांत्रिक अडचण आल्याने सी सी टी वि फुटेज ची रेकॉर्डिंग उपलब्ध होऊ शकली नाही म्हणून आपणास सी सी टी वि ची रेकॉर्डिंग देण्यात आली नाही असा उल्लेख शहर पोलीस स्टेशने केला आहे यावरून स्पष्ट होते कि हे सी सी टी वि कॅमेरे हे फक्त शोभेचे बाहुले आहे की काय ? पोलिसांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठी लावले असल्याने शहराची सुरक्षा राम भरोसे आहे असे म्हणण्याची पाळी आली आहे दिलेल्या माहिती अधिकारात असे उत्तर शहर पोलीस स्टेशन कडून अपेक्षित नव्हते कारण कि शहरात गजबजल्या ठिकाणीच जर सी सी टी वि बंद आहेत तर पोलिसांना हे माहित बंद असलेले सी सी टि व्ही सुरु करण्याची तसदी का घेतली नाही आहेत कदाचित कँमेरे चालूही असतील परतु काही माहीती उघड होवु नये म्हणून तर अश्या प्रकारचे पत्र देऊन माहिती अधिकारी कार्यकर्त्यांची दिशाभूल केली की काय अशी शंका येत आहे ह्या माहिती आधीकारात पाठविलेल्या प्रथम अपीलीय अधिकारी पोलीस उप विभागीय अधिकारी यांच्या कडे अपील दाखल करणार असल्याचे असलम बिनसाद यांनी प्रसार माध्यम यांना सांगितले .
Post a Comment