बेलापूर(प्रतिनिधी )- कोरोना काळात अडचणीत सापडलेले मागास वर्गीय अंपग महीलांना आधार देण्यासाठी महीला व बाल कल्याण निधीतुन १०% रक्कम खर्च करावी अशी मागणी सरपंच महेंद्र साळवी यांच्याकडे चंद्रकांत नाईक व इतरांनी केली आहे बेलापुर ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र साळवी व ग्राम विकास अधिकारी राजेश तगरे यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत फंडातील सन 2020-21 व सन 2021 -22 या दोन वर्षांचा मागासवर्गीय 15 टक्के, अपंग 5 टक्के, महिला व बालकल्याण 10 टक्के ग्रा. प. फंडातून खर्च करावयाच्या निधीचे वाटप तातडीने करावे व कोरोना सारख्या आजारामुळे लॉक डाऊन असल्याने मोल मजुरी चे काम बंद आहे या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या मागासवर्गीय अपंग महिलांना जीवनावश्यक वस्तू औषधे आदी कामा साठी रोख स्वरूपात ग्रा. पंचायतने निधिच्या रकमेतून आर्थिक सहाय्य करावे तसेच गावामधे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे डेंगू मलेरिया टायफॉईड सारखे साथी च्या आजार चा फैलाव होऊ शकतो यासाठी गावा मध्ये व वाड्या वस्त्यावर डास निर्मूलन औषधा ची फवारणी करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सरपंच श्री महिंद्र साळवी ग्राम विकास अधिकारी श्री तगरे यांना निवेदन देण्यात आले या वेळी सर्वश्री चंद्रकांत पाटील नाईक, अय्याज सय्यद, विजय शेलार, भाऊसाहेब तेलोरे, सुरेश अमोलिक, अनिल पवार, प्रकाश जाजू, अक्षय नाईक, वैभव कुर्ह्र त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य भरत साळुंके व रविंद्र खटोड, मुश्ताक शेख, रमेश अमोलिक आदी उपस्थित होते
Post a Comment