Latest Post

अहमदनगर - कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे दरोडा टाकणारी टोळी दोन दिवसात जेरबंद केली तसेच गुन्ह्यातील 20 लाख 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची महत्वपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पोलिस पथकांनी संयुक्त कारवाई केली आहे.एवन हैवान काळे (वय 30, रा. चिखली ता. आष्टी जि. बीड), मनीषा एवन काळे (वय 35), रेखा जनार्दन काळे (रा. माहीजळगाव ता. कर्जत जि. अहमदनगर), कांचन एवन काळे (रा. चिखली ता.आष्टी जि. बीड) आणि एक अल्पवयीन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, माहिजळगाव ( ता. कर्जत) येथे दि.5 मे रोजी दरोडा व घरफोडी चोरी झाल्याचा कर्जत पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा हा एवन काळे (रा. चिखली जि. बीड) याने व त्याचे साथीदार यांनी मिळून केल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपींची पूर्ण माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखा पथक व कर्जत पोलिसांनी सापळा लावून आरोपीचा पाठलाग करून त्याना पकडले. या दरम्यान आरोपींच्या घराची तपासणी केली असता, चोरी गेलेला मुद्देमाल मिळून आला. गुन्ह्यातील चोरीस गेलेले दागिने व इतर चोरीतील सोन्याचे दागिने असा एकूण 30 तोळे 15 लाख रुपयांचे जप्त करण्यात आले. तसेच आरोपीच्या घरातून एक रामपुरी चाकू, लोखंडी खटवणी, 30 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, पाच लाख रुपये किमतीचे स्कार्पिओ (एमएच 17, एजे 3598) व रोख रक्कम असा एकूण 20 लाख 40 हजार 500 रुपये किमतीचे दागिने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके व कर्जत पोनि चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या शाखेचे सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ दत्तात्रेय हिंगडे, विश्वास बेरड, बबन मखरे, पोना सचिन आडबल, पोहेकाॅ सुनील चव्हाण, पोना सुरेश माळी, विशाल दळवी, दिनेश मोरे, शंकर चौधरी, पोकाॅ राहुल सोळुंके, सागर ससाणे, रवींद्र घुंगासे, रंणजीत जाधव , सागर सुलाने, संदीप चव्हाण, प्रकाश वाघ, आकाश काळे, चापोहेकाँ संभाजी कोतकर, चंद्रकांत कुसळकर, कर्जत विभागीय कार्यालयाचे अंकुश ढवळे तसेच कर्जत पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश माने, पोउनि अमरजित मोरे, पोहेकाॅ प्रबोध हंचे, पोकाॅ सुनील खैरे, श्याम जाधव, महादेव कोहक, रवींद्र वाघ, जितेंद्र सरोदे, गणेश आघाव, मपोकाॅ कोमल गोफणे आदींच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर खूर्द येथील एका शेतकऱ्यावर रात्री दोन वाजता बिबट्याने हल्ला केला असुन यात शेतकऱ्याने काठीने बचाव करुन आरडा ओरड केल्यामुळे तो थोडक्यात बचावला                                      या बाबत मिळालेली माहीती अशी की बेलापुर खूर्द येथील शेतकरी पंढरीनाथ श्रीपती महाडीक वय ५७ वर्ष हे रात्रीची लाईट असल्यामुळे आपल्या घासाच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता रात्री दोनच्या सुमारास त्यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला सुदैवाने पंढरीनाथ यांच्या हातात काठी होती काठीच्या सहाय्याने पंढरीनाथ यांने बिबट्यावर तिव्र ताकदीनिशी प्रतिकार केला त्यामुळे चवताळलेल्या बिबट्याने त्यांच्या हाताला चावा घेतला हाताला अनेक ठिकाणी जखमा झालेल्या आहेत पोटाला देखील पंजाच्या नखांचे ओरखडे बसलेले आहेत तसेच पायालाही जखमा झालेल्या आहे त्यांनी आरडा ओरड केल्यानंतर त्यांच्या घरचे लोक पळत आल्यामुळे बिबट्या माघारी फिरला या ठिकाणी त्याच्या घासातच दोन बिबटे दवा धरुन बसले होते परंतु ते महाडीक यांच्या लक्षात  आले नाही जखमी अवस्थेत त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना घरी नेले परंतु कोरोनाच्या भितीमुळे डाँक्टर  उठणार नाही या धास्तीने त्यांनी रात्र घरातच काढली सकाळ होताच त्यांनी बेलापुर खूर्दचे सामाजिक कार्यक्रम प्रा अशोक बडधे व पोलीस पाटील जोशी यांना कळविले त्यांनी तातडीने महाडीक यास बेलापुर प्राथमिक केंद्र येथे आणले तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर महाडीक यांना अहमदनगर येथील सिव्हील हाँस्पीटल येथे पाठविण्यात आले असुन या पूर्वीही बिबट्याने माणसावर हल्ला करण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत त्या नंतर वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबद झाला होता त्यामुळे नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता परंतु  कालच्या प्रकारामुळे माणसावर हल्ला करणारा बिबट्या अजुनही परिसरात असल्याची पुष्टी होत आहे त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी बेलापुर खूर्द येथील नागरीकांनी केली आहे अनेक ग्रामस्थ सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी या रस्त्याने ये जा करत असतात त्यांनीही काळजी घ्यावी असे आवाहन जि प सदस्य शरद नवले यांनी केले आहे.

संगमनेर (शहर प्रतिनिधी)संगमनेर शहरात लॉकडाऊन सुरू असतानाही शहरातील तीन बत्ती चौकात काही नागरिक घोळक्याने फिरत होते. करोना काळात घोळक्याने फिरत असणार्‍यांना शहर पोलिसांनी चोप दिला.याची माहिती मिळताच संतप्त जमावाने येत पोलिसांना धक्काबुक्की करत त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. जमावाचा रुद्रावतार पाहून पोलिस अधिकार्‍यांसह पोलिसांनी येथून काढता पाय घेतला. पोलीस व जमाव आमने-सामने आल्याने शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.सध्या पवित्र महिना सुरू असल्याने सायंकाळी नागरिक बाहेर पडतात. जमावबंदी असतानाही या ठिकाणी गर्दी होत असते. काल दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तीन बत्ती चौक व पुणे रोड परिसरात अनेकांनी गर्दी केली होती. यावेळी बंदोबस्तास असलेल्या अहमदनगर येथील दंगल नियंत्रण पथकातील पोलिसांनी त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. या पथकातील काही कर्मचार्‍यांनी नागरिकांना चांगला चोप दिला. यावेळी या नागरिकांची व पोलिसांची जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.घटनेची माहिती समजताच परिसरातील सुमारे 200 नागरिक घटनास्थळी जमा झाले. संतप्त जमावाने पोलिसांचे वाहन अडविले. त्यांनी पोलिसांना मारहाणीबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमावातील काही जणांनी दोघा पोलिस कर्मचार्‍यांना मारहाण केली. संतप्त जमावाने पोलीस वाहनावर दगडफेक सुरू केली. रस्त्यावरून जाणार्‍या एका वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. जमावाचा रुद्रावतार पाहून पोलीस अधिकार्‍यासह पोलीस कर्मचार्‍यांनी तेथून वाहनासह काढता पाय घेतला.लॉकडाऊनमुळे संगमनेरात दंगल नियंत्रण पथक बोलाविण्यात आले आहे. हे पथक शहर पोलीस अधिकार्‍याच्या नियंत्रणाखाली काम करीत आहे. गेल्या दोन दिवसापासून या पथकातील कर्मचार्‍यांनी शहरातील अनेक नागरिकांना ‘प्रसाद’ दिला आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या संतापाचा काल दुपारी उद्रेक झाला. नागरिकांना पोलिसांनी मारहाण करू नये असे आदेश गृहमंत्र्यांनी दिलेले असतानाही संगमनेरात मात्र या आदेशाचे पालन होतांना दिसत नाही. पोलीस अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.पोलीस अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार काही पोलीस नागरिकांना बेदम मारहाण करीत असल्याचे तक्रारी होत आहे. शहरातील तीन बत्ती चौकात घडलेल्या घटनेमुळे पोलीस यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता. गुन्हा दाखल होतो की नाही याबाबतही उलटसुलट चर्चा पोलीस वर्तुळात सुरु होती.रात्री उशीरापर्यंत मारहाण झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी फिर्याद दाखल करण्यास असमर्थता दाखविल्याने गुन्हा कुणाविरोधात दाखल करायचा हा प्रश्नही पोलीस अधिकार्‍यांपुढे होता. यावर रात्री उशीरापर्यंत कुठलाही तोडगा निघत नसल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांनी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्या समवेत रात्री उशीरापर्यंत बैठक सुरु होती. 

 
बेलापुर  (प्रतिनिधी  )-  अज्ञात व्यक्तीने कोरोणा तपासणी केलेल्या किटची विल्हेवाट न लावता ते सामान प्रवरा नदी काठावर फेकुन दिले असुन या कृत्यामुळे इतरांच्या जिवीतास धोका होवु शकतो त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी आशी मागणी केली जात आहे.येथील प्रवरा नदी पात्रालगत मोठ्या प्रमाणात कोरोना तपासणीत वापर केलेले किट त्यात सलाईन हातमोजे रँपीड टेस्ट करीता वापरण्यात येणारे साहीत्य  मास्क सिरींज आदि वापरलेले साहीत्य उघड्यावर फेकुन दिल्याचे आढळून आले आहे वास्तविक हे साहीत्य नष्ट

करणे आवश्यक असतानाही जबाबदार व्यक्तीने ते सर्व साहीत्य दुसर्याच्या जिवीतास अपाय होईल या हेतुने प्रवरा नदी काठावर फेकुन दिले असुन या ठिकाणी  मासेमारी करणारे बांधव रोज मासे धरण्यासाठी येत असतात शिवाय ज्या ठिकाणी हे सामान टाकले तेथुन जवळच स्मशानभुमी आहे त्यामुळे हे सर्व सामान नष्ट करणे गरजेचे आहे या बाबतची माहीती प्रा .अशोक बडधे सर यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जावुन खात्री केली त्यांनतर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाँक्टर देविदास चोखर यांच्याशी संपर्क साधला डाँक्टर देविदास चोखर व त्यांच्या टिमने सदर ठिकाणी भेट देवुन पहाणी केली त्यात रँपीड टेस्ट करीता लागणारे साहीत्य आढळून आले  कुणीतरी खाजगी लँबधारकाचे हे कृत्य असावे अशी शंका त्यांनी व्यक्त केली असुन असे सर्व साहीत्य नष्ट करण्याच्या सक्त सुचना सर्व तपासणी प्रयोगशाळांना देण्यात आलेल्या आहेत हे साहीत्य या ठिकाणी आणुन टाकणारावर पोलीस स्टेशनला अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करणार असल्याचेही डाँक्टर चोखर यांनी सांगितले.

अहमदनगर -दिनांक २२/०४/२०२१ रोजी आरोपी नामे १) विपूल नरेश वक्कानी, वय- ४० वर्षे, ह. रा. प्लॉट नं. १०, कवडे पाटील कॉर्नर, बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव, पुणे, मूळ रा. प्लॉट नं. डी-९०३, मार्वल इनिगमा, युवान आयटी पार्क जवळ, खराडी, पुणे याने व त्याचे इतर साथीदारांनी मिळून स्टेट बँक, शाखा- सावेडी येथे बनावट चेक वटविण्याचा प्रयत्न करुन तसेच साथीदार आरोपशी संगनमत करुन अशाच प्रकारे आयसीआयसीआय बँक, शाखा चिंचवड, पुणे येथेही बनावट चेक वटविण्याचा प्रयत्न केला तसेच वेगवेगळ्या फर्म, सरकारी एजन्सी यांचे नावाने बनावट शिक्के तसेच बनावट व खोटे चेक तयार करुन त्यावर खोट्या सह्या करुन सदर दस्त हे खरे असल्याचे भासवून शासनाची व वेगवेगळ्या फर्मची फसवणूक करुन ते बँकेमध्ये वटविण्याचा प्रयत्न करुन फसवणूक केलेली आहे. याबाबत पोना/१५१६ रविकिरण बाबूराव सोनटक्के, नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी तोफखाना पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ३१७/२०२१, भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७२, ५११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर गुन्ह्याचा तपास श्री. मिथून घुगे, सहायक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे करीत असून सदर गुन्ह्यात यापूर्वी आरोपी नामे १) विपूल नरेंद्र वक्कानी, वय- ४० वर्षे, रा. प्लॉट नं. १०, कवडे पाटील कॉर्नर, बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव, पुणे, २) यशवंत दत्तात्रय देसाई, वय- ४९ वर्षे, रा. सी-४१, एसडीएफसी कॉलनी, शाहूनगर, चिंचवड, पुणे, ३) नरेश रामचंद्र बालकोंडेकर, वय- ३३ वर्षे, रा. सर्वे नं. २३, हनुमान नगर, भगत वस्ती, भोसरी, पुणे, ४) राहूल ज्ञानोबा गुळवे, वय ४६ वर्षे, रा. राम मंदीर जवळ, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ५) संदीप पंजाबराव भगत, वय ३२ वर्ष रा. कच्चरवाडी ता. इंदापुर जि. पुणे, ६) तुषार आत्माराम कुंभारे, वय ३४ वर्ष रा. कुंभारवाडा, वाघोली, जि. पुणे, ७) पंचशिल ज्ञानदेव शिंदे वय ४५ वर्ष रा. पुष्पा हो सोसा. संभाजी नगर, चिंचवड, जि. पुणे यांना अटक करण्यात आलेली आहे.तपासामध्ये सदर गुन्ह्यात विजेंद्र दक्ष, रा. कालकाजी, दक्षिण दिल्ली हा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने मा. पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर यांचे परवानगीने व श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि मिथून घुगे, पोना/सचिन आडबल, विशाल दळवी, लक्ष्मण खोकले, पोकॉ/रोहीत येमूल, चा. पोहेकॉ/ उमाकांत गावडे अशांनी मिळून दिल्ली येथे जावून दिल्ली पोलीसांचे मदतीने आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे विजेन्द्रकुमार उर्फ विजेन्द्र रघुनंदनसिंग दक्ष, वय ३९ वर्षे, रा. एन-२, कालकाजी, दक्षिण दिल्ली यांस ताब्यात घेतले. सदर आरोपीस मा. महानगर दंडाधिकारी, साकेत न्यायालय परिसर, नवी दिल्ली यांचे न्यायालयात हजर करुन आरोपीची दोन दिवसांची ट्रान्झीट रिमांड घेवून त्यांस अहमदनगर येथे आणून दि. ०३/०५/२०२१ रोजी अहमदनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची दि. ०७/०५/२०२१ रोजी पावेतो पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचेकडून महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील अशा प्रकारचे विवीध गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील कार्यवाही श्री. मिथून घुगे, सहायक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे करीत आहेत.सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटिल साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. विशाल ढुमे साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, नगर शहर विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपुर शहर पोलीसांनी एका इसमाकडून गावठी कट्टा तसेच एक जिवंत काडतुस व एक चोरीची मोटारसायकल सह एकुण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे . या बाबत मिळालेली माहीती अशी की श्रीरामपूर शहराच्या प्रांत कार्यालय शेजारील खबड्डी या ठिकाणी एक इसम ज्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती गुप्त बातमी द्वारे मिळाल्याने अप्पर पोलीस अधीक्षक  डॉ. दिपाली काळे यांच्या सूचनेनुसार डी वाय एस पी संदीप मिटके यांच्यासह पी आय संजय सानप

यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, राहुल नरवाडे, पंकज गोसावी, राहुल गायकवाड, यांनी एका संशयीत इसमास सापळा रचून ताब्यात घेतले  त्याने आपले नाव  बळीराम उर्फ बल्ली रामचीत यादव वय 30 वर्ष राहणार सरस्वती कॉलनी देवकर वस्ती वार्ड नंबर 7 असे असल्याचे सांगितले  त्याची अंग झडती घेतली असता  त्याच्याकडे  2500  रुपये किमतीचा गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस त्याचप्रमाणे एक्टिवा गाडी 40000 रुपये किमतीचे एकूण 65000 रुपये किमतीचे मुद्देमाल आढळून आला त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ऍक्टिवा गाडी ही पुणे येथून चोरून आणल्याची कबुली आरोपीने दिली आहे  त्याचप्रमाणे आरोपीवर चैन  स्नँशिंग मोबाईल चोरी अशा अनेक गुन्हे दाखल आहेत.
त्याच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर  1/ 248 / 2021 आर्म एक्ट 3,5,7/ 25 अशाप्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे श्रीरामपूर शहर पोलीस यांचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जोसेफ साळवे हे करत आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-हिमालय पर्वतरांगांमध्ये वसलेल्या नेपाळमधल्या माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वांत उंच शिखराच्या बेस कॅम्पवर श्रीरामपूर येथील तरुणाने भगवा ध्वज फडकावून पराक्रम केला आहे.शहरातील दळवीवस्ती मोरगे हॉस्पिटल परिसरात राहणारे सुनील कांबळे यांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प नुकतेच सर केले आहे. माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणे म्हणजे जवळपास माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची 60% मोहीम पूर्ण करणे होय. 21 एप्रिल 2021 रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथून सुनील विलास छाया कांबळे यांनी एव्हरेस्ट मोहिमेला सुरुवात केली. त्यानंतर विविध टप्पे पार करून तसेच करोना आणि वैद्यकीय संदर्भातील इतर चाचण्या यांची पूर्तता करून सुनील कांबळे काल 1 मे रोजी माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प (उंची पाच हजार 364 मीटर) इथपर्यंत पोहोचले आहेत. तेथे पोहचल्यावर त्यांनी भगवा व तिरंगा ध्वज फडकाविला. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या महिन्यात ते एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावर पोहोचतील आणि श्रीरामपूरसाठी एक नवीन विक्रम प्रस्थापित करतील अशी आशा आहे. सुनील कांबळे यांना या पुढच्या एव्हरेस्ट मोहिमेसाठी श्रीरामपूरकरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget