अहमदनगर - कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे दरोडा टाकणारी टोळी दोन दिवसात जेरबंद केली तसेच गुन्ह्यातील 20 लाख 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची महत्वपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पोलिस पथकांनी संयुक्त कारवाई केली आहे.एवन हैवान काळे (वय 30, रा. चिखली ता. आष्टी जि. बीड), मनीषा एवन काळे (वय 35), रेखा जनार्दन काळे (रा. माहीजळगाव ता. कर्जत जि. अहमदनगर), कांचन एवन काळे (रा. चिखली ता.आष्टी जि. बीड) आणि एक अल्पवयीन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, माहिजळगाव ( ता. कर्जत) येथे दि.5 मे रोजी दरोडा व घरफोडी चोरी झाल्याचा कर्जत पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा हा एवन काळे (रा. चिखली जि. बीड) याने व त्याचे साथीदार यांनी मिळून केल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपींची पूर्ण माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखा पथक व कर्जत पोलिसांनी सापळा लावून आरोपीचा पाठलाग करून त्याना पकडले. या दरम्यान आरोपींच्या घराची तपासणी केली असता, चोरी गेलेला मुद्देमाल मिळून आला. गुन्ह्यातील चोरीस गेलेले दागिने व इतर चोरीतील सोन्याचे दागिने असा एकूण 30 तोळे 15 लाख रुपयांचे जप्त करण्यात आले. तसेच आरोपीच्या घरातून एक रामपुरी चाकू, लोखंडी खटवणी, 30 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, पाच लाख रुपये किमतीचे स्कार्पिओ (एमएच 17, एजे 3598) व रोख रक्कम असा एकूण 20 लाख 40 हजार 500 रुपये किमतीचे दागिने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके व कर्जत पोनि चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या शाखेचे सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ दत्तात्रेय हिंगडे, विश्वास बेरड, बबन मखरे, पोना सचिन आडबल, पोहेकाॅ सुनील चव्हाण, पोना सुरेश माळी, विशाल दळवी, दिनेश मोरे, शंकर चौधरी, पोकाॅ राहुल सोळुंके, सागर ससाणे, रवींद्र घुंगासे, रंणजीत जाधव , सागर सुलाने, संदीप चव्हाण, प्रकाश वाघ, आकाश काळे, चापोहेकाँ संभाजी कोतकर, चंद्रकांत कुसळकर, कर्जत विभागीय कार्यालयाचे अंकुश ढवळे तसेच कर्जत पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश माने, पोउनि अमरजित मोरे, पोहेकाॅ प्रबोध हंचे, पोकाॅ सुनील खैरे, श्याम जाधव, महादेव कोहक, रवींद्र वाघ, जितेंद्र सरोदे, गणेश आघाव, मपोकाॅ कोमल गोफणे आदींच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली.
Post a Comment