बेलापुर (प्रतिनिधी )- बेलापुर खूर्द येथील एका शेतकऱ्यावर रात्री दोन वाजता बिबट्याने हल्ला केला असुन यात शेतकऱ्याने काठीने बचाव करुन आरडा ओरड केल्यामुळे तो थोडक्यात बचावला या बाबत मिळालेली माहीती अशी की बेलापुर खूर्द येथील शेतकरी पंढरीनाथ श्रीपती महाडीक वय ५७ वर्ष हे रात्रीची लाईट असल्यामुळे आपल्या घासाच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता रात्री दोनच्या सुमारास त्यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला सुदैवाने पंढरीनाथ यांच्या हातात काठी होती काठीच्या सहाय्याने पंढरीनाथ यांने बिबट्यावर तिव्र ताकदीनिशी प्रतिकार केला त्यामुळे चवताळलेल्या बिबट्याने त्यांच्या हाताला चावा घेतला हाताला अनेक ठिकाणी जखमा झालेल्या आहेत पोटाला देखील पंजाच्या नखांचे ओरखडे बसलेले आहेत तसेच पायालाही जखमा झालेल्या आहे त्यांनी आरडा ओरड केल्यानंतर त्यांच्या घरचे लोक पळत आल्यामुळे बिबट्या माघारी फिरला या ठिकाणी त्याच्या घासातच दोन बिबटे दवा धरुन बसले होते परंतु ते महाडीक यांच्या लक्षात आले नाही जखमी अवस्थेत त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना घरी नेले परंतु कोरोनाच्या भितीमुळे डाँक्टर उठणार नाही या धास्तीने त्यांनी रात्र घरातच काढली सकाळ होताच त्यांनी बेलापुर खूर्दचे सामाजिक कार्यक्रम प्रा अशोक बडधे व पोलीस पाटील जोशी यांना कळविले त्यांनी तातडीने महाडीक यास बेलापुर प्राथमिक केंद्र येथे आणले तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर महाडीक यांना अहमदनगर येथील सिव्हील हाँस्पीटल येथे पाठविण्यात आले असुन या पूर्वीही बिबट्याने माणसावर हल्ला करण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत त्या नंतर वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबद झाला होता त्यामुळे नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता परंतु कालच्या प्रकारामुळे माणसावर हल्ला करणारा बिबट्या अजुनही परिसरात असल्याची पुष्टी होत आहे त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी बेलापुर खूर्द येथील नागरीकांनी केली आहे अनेक ग्रामस्थ सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी या रस्त्याने ये जा करत असतात त्यांनीही काळजी घ्यावी असे आवाहन जि प सदस्य शरद नवले यांनी केले आहे.
Post a Comment