बेलापुर (प्रतिनिधी )- अज्ञात व्यक्तीने कोरोणा तपासणी केलेल्या किटची विल्हेवाट न लावता ते सामान प्रवरा नदी काठावर फेकुन दिले असुन या कृत्यामुळे इतरांच्या जिवीतास धोका होवु शकतो त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी आशी मागणी केली जात आहे.येथील प्रवरा नदी पात्रालगत मोठ्या प्रमाणात कोरोना तपासणीत वापर केलेले किट त्यात सलाईन हातमोजे रँपीड टेस्ट करीता वापरण्यात येणारे साहीत्य मास्क सिरींज आदि वापरलेले साहीत्य उघड्यावर फेकुन दिल्याचे आढळून आले आहे वास्तविक हे साहीत्य नष्ट
करणे आवश्यक असतानाही जबाबदार व्यक्तीने ते सर्व साहीत्य दुसर्याच्या जिवीतास अपाय होईल या हेतुने प्रवरा नदी काठावर फेकुन दिले असुन या ठिकाणी मासेमारी करणारे बांधव रोज मासे धरण्यासाठी येत असतात शिवाय ज्या ठिकाणी हे सामान टाकले तेथुन जवळच स्मशानभुमी आहे त्यामुळे हे सर्व सामान नष्ट करणे गरजेचे आहे या बाबतची माहीती प्रा .अशोक बडधे सर यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जावुन खात्री केली त्यांनतर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाँक्टर देविदास चोखर यांच्याशी संपर्क साधला डाँक्टर देविदास चोखर व त्यांच्या टिमने सदर ठिकाणी भेट देवुन पहाणी केली त्यात रँपीड टेस्ट करीता लागणारे साहीत्य आढळून आले कुणीतरी खाजगी लँबधारकाचे हे कृत्य असावे अशी शंका त्यांनी व्यक्त केली असुन असे सर्व साहीत्य नष्ट करण्याच्या सक्त सुचना सर्व तपासणी प्रयोगशाळांना देण्यात आलेल्या आहेत हे साहीत्य या ठिकाणी आणुन टाकणारावर पोलीस स्टेशनला अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करणार असल्याचेही डाँक्टर चोखर यांनी सांगितले.
Post a Comment