Latest Post

श्रीरामपुर (प्रतिनिधी) - कोरोना महामारीने संपूर्ण देशात हांहाकार माजविला असून, त्यातच आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील खूप भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे, श्रीरामपूर तालुक्याततर वैद्यकीय सेवेच्या नावाखाली भरपूर खाजगी कोविड सेंटर निर्माण झाले आहेत, परंतू डिपॉझिटच्या नावाखाली गोर- गरीबांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळण्याचा गोरखधंदा सध्या यातील अनेकांनी मांडला आहे,

पहीलेच लॉकडाऊनमुळे प्रचंड प्रमाणात आर्थिक टंचाईने भरडत असलेल्या लोकांच्या हाताला काम-धंदा नाही,मुबलक बेरोजगारीही वाढली आहे, यामध्ये कोविड सेंटरवाले महागडी औषधे, ऑक्सिजन आणावयास सांगत असल्याने लोकं सोने /मौल्यवान वस्तू गहाण ठेवून तर  कोणी व्याजाने पैसे घेऊन पूर्तता करत आहे, एवढे करून सुद्धा पैसे संपल्यावर कोविड सेंटरवाले सांगतात रुग्ण दुसरीकडे हलवा,अशातच पैशाअभावी दुसरीकडे ट्रीटमेंट न मिळाल्याने रुग्ण दगावत आहेत, त्यासाठी राज्य शासनाने खाजगी कोविड सेंटरसाठी जी नियमावली,जे दरपत्रक लागू केले आहे, ते त्यांनी कोविड सेंटरच्या बाहेरच दर्शनी भागावर सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावावेत, जेणेकरून रुग्णांच्या नातेवाईकांना दिसले पाहिजेत, सदरील दरपत्रक लावल्याने गोर- गरीबांची लुट होणार नाही, असे न केले गेल्यास आणि खाजगी कोविड सेंटरवाल्यांकडून गोरगरीबांची लूट होतच राहील्यास आम्ही समाजवादी पार्टीच्यावतीने रुग्णांची लयलुट करणाऱ्या खाजगी कोविड सेंटर चालवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे,

तथा खाजगी कोविड सेंटरवाले जर अशा पद्धतीने रुग्णांची लूट करत असतीलतर तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही श्री.जमादार यांनी या पत्रकात केले आहे.



बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर ग्रामपंचायत , विविध समाजसेवी संघटना , प्राथमिक आरोग्य केंद्र , बेलापुर ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्यातुन बेलापूरात विनामूल्य कोविड सेंटर सुरु करण्यात आले असुन ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केले आहे               शासनाच्या आदेशानुसार बेलापुर ग्रामपंचायतीने पुढाकार घेवुन प्राथमिक आरोग्य केंद्र विविध समाजसेवी संघटना मेडीकल व डाँक्टर असोसिएशन ग्रामस्थ या सर्वांच्या आर्थिक योगदानातुन मराठी शाळा येथे कोविड सेंटर सुरु करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की या कोवीड सेंटरमध्ये कोरोनाची लक्षण असणारांनाच  घरीच विलगीकरण करण्याऐवजी येथील कोवीड सेटरमध्यै त्यांचेवर उपचार केले जाणार आहे या ठिकाणी चहा नाश्ता व दोन वेळचे जेवण मोफत तसेच आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार केले जाणार आहे  या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी देविदास चोखर म्हणाले की या कोवीड सेंटर मध्ये आँक्सिजन व व्हेंटीलेटर या सारख्या सुविधा नसुन प्राथमिक लक्षणे असणार्या रुग्णावर या विलगीकरण कक्षात उपचार केले जाणार आहे प्राथमिक आरोग्य केंद्र व गावातील निष्णात डाँक्टरांच्या देखरेखीखाली येथील रुग्णावर उपचार केले जाणार आहे सदर सेंटरमध्ये येताना आधार कार्ड कोवीड तपासणी अहवाल सोबत आणावा या कोविड सेंटरचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या वेळी रणजीत श्रीगोड रमेश लोढा अजय डाकले प्रफुल्ल डावरे भरत साळुंके रविंद्र खटोडपुरुषोत्तम भराटे कामगार तलाठी कैलास खाडे डांँ .मच्छिंद्र निर्मळ डाँ.रविंद्र गंगवाल डाँ .सुधीर काळे डाँ अविनाश गायकवाड डाँ अनिल भगत पोलीस पाटील अशोक प्रधान पत्रकार देविदास देसाई ज्ञानेश गवले  विष्णूपंत डावरे दिलीप दायमा किशोर कदम दिपक क्षत्रिय  राम पोळ रमेश अमोलीक महेश ओहोळ विशाल आंबेकर दादा कुताळ प्रशांत लढ्ढा मुस्ताक शेख सविता अमोलीक अशोक राशिनकर अल्ताफ शेख आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते  या कोविड सेंटरसाठी जेष्ठ पत्रकार अशोक तुपे यांच्या स्मरणार्थ रोख स्वरुपात आर्थिक मदत देण्यात आली


बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर येथील श्री  साई मंदिरांच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त साई पावन प्रतिष्ठानच्या वतीने वरद विनायक कोवीड सेंटर करीता पंचवीस हजार रुपयांची औषधे साई पावन प्रतिष्ठानचे कैलास चायल यांनी कोवीड सेंटरचे भरत साळुंके व रविंद्र खटोड यांच्याकडे सुपुर्त केली बेलापुरचे माजी सरपंच भरत साळुंके  व रत्नेश राठी यांच्या पुढाकाराने कै .मुरलीधर खटोड पतसंस्था साई खेमानंद ट्रस्ट जनता अघाडी शनैश्वर यात्रा कमीटी यांच्या विशेष सहकार्याने बेलापुर  श्रीरामपुर रोडवर असणार्या संस्कृती मंगल कार्यालयात वरद विनायक कोविड सेंटर सुरु करण्यात आले दोनच दिवसात या कोवीड सेंटर मधील सर्व खाटा फुल झाल्या बेलापुर येथील साई मंदिराचा आज पाचवा वर्धापन दिन या निमित्ताने मंदिरात पुजा अर्चा करण्यात आली त्याच बरोबर वरद कोवीड सेंटरला पंचवीस हजार रुपयाची औषधे भेट देण्यात आली या वेळी प्रतिष्ठानचे सचिवा राजेंद्र लखोटीया रामविलास झंवर प्रशांत बिहाणी रविंद्र खटोड भरत साळुंके  नितीन कुलकर्णी वैशाली कुलकर्णी भाग्यश्री कुलकर्णी प्रसाद खरात राम पोळ अजित सहानी रघुनाथ वाघ रोहीत गाजरे पत्रकार दिलीप दायमा कीशोर कदम उपस्थित होते.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-कोरोनाच्या नावाखाली शहरात विनाकारण फिरणाराला जरब बसविण्याचे सोडून पोलीसांनी सुजाण नागरीकांसह अबाल वृध्दांनाही बेदम मारहाण केली  त्यात अनेकांना गंभीर मार लागला आहे     या बाबत हाती आलेली माहीती अशी की रात्री अचानक पोलीस फौज फाटा घेऊन शहरातील छत्रपती शिवाजी चौकात आले आणि येणाऱ्या जाणाऱ्या

नागरिकांना कसलीही कल्पना न देता गुन्हेगारासारखे बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली त्यात काही वयोवृध्द नागरीकही होते एकेक नागरीकाला पोलीस रिंगण करुन मारत होते पोलिसांनी आपल्याकडे आलेले दौंड येथील एस आर पी एफ यांना आदेश केला आणि जो सापडेल त्याची अडचण काय आहे  तो बाहेर का पडला हे जानुन न घेताच   नागरिकांवर  लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली यामध्ये एका युवकाचा हातात फँक्चर आले असुन सध्या डॉक्टर कापसे यांच्याकडे तो उपचार घेत आहे तर काही आपल्या मिळालेल्या प्रसादाचा हळद लावून घरीच उपचार करीत आहे अशा या पोलिसांच्या लढ्याची सुरुवात कोरोना बरोबर आहेत की शहरातील नागरिकांबरोबर हे समजने मुश्कील झालंय मंत्रालया पासुन ते वरीष्ठापर्यत सर्वांनी नागरीकावर लाठीचार्ज करु नये मारहाण करु नये असे आदेश असताना शहरात पोलीसांनी ही कारवाई कुणाच्या आदेशावरुन केली याची चौकशी करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे या बाबत लवकरच वरिष्ठाकडे लेखी तक्रार करण्यात येणार असल्याचे समजते.

श्रीरामपुर शहरातील नागरिकांनी दवाखाने करावे की दवाखान्यात आपल्या प्रियजनांना औषधोपचार करावा त्याच बरोबर रेमडीसीवीर व ऑक्सिजन सिलेंडरचा  मोठा तुटवडा या साठी काहींची भटकंती सुरु आहे अशा नागरिकांना आता रात्री घडलेल्या प्रकारात  स्वतः ऍडमिट होन्याची वेळ ही पोलिसांच्या चुकीच्या कारवाई मुळे आली आहे.


कोरोना काळात मटका गुटखा दारुगुत्ते खुले आम सुरु आहेत पोलीसांचा त्याकडे हेतूपुरस्पर कानाडोळा आहे परंतु दवाखान्यात असलेल्या आपल्या नातेवाईकाला वाचविण्यासाठी औषधे रेमिडीसीवर करीता जिवाचा आटापिटा करणाऱ्या नागरीकांना पोलीसांनी बेदम चोप दिला   पोलिसांनी वरिष्ठांनी असा निर्णय अचानक का घेतला समजतच नाही.

शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीम भाई हुंडेकरी यांचे कोठला परिसरातून अपहरण झाले होते त्यानुसार तोफखाना पो.स्टे. Cr.no.41/2019 भादवि कलम363,364(अ),34प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अहमदनगर पोलिसांनी अपहरणकर्त्यांची माहिती काढून अपहरण झाल्यानंतर काही तासातच हुंडेकरी यांची सुखरूप सुटका करून आरोपी क्र. 1) अजहर मंजुर शेख, 3) निहाल /बाबा मुशरफ शेख यांना अटक केले होते.सदर गुन्ह्याचा तपास Addl. SP. सागर पाटील व DySP संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली A.P.I. पिंगळे यांनी  तपास करून चार्जशीट न्यायालयात दाखल केले.सदर प्रकरणात ॲड.पवार  ए.बी. यांनी सरकारी पक्षाची बाजी मांडली. मा.अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री अशोक कुमार भिलारे साहेब यांनी आरोपींना जन्मठेप व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली पैरवी अधिकारी म्हणून . स फौ लक्ष्मण पो हे काँ  थोरात पि डी जे कोर्ट पैरवि अधिकारी नगर शहर  यांनी काम पाहिले.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- राज्यात कोरोणा महामारी वाढत चालली असून त्यामुळे रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत चालली आहे उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी कोवीड हाँस्पिटलला भेटी देवुन कोरोना रुग्णांची माहीती घेतली त्या वेळी बर्याच ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता भासू लागल्याने श्रीरामपूर येथील प्रांत अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी खासगी एजन्सी व ज्याच्याकडे ऑक्सिजन सिलेंडर आहेत त्यांना ऑक्सिजन सिलेंडर शासनाकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे संपूर्ण राज्यात हॉस्पिटल मध्ये कोरोणाचे रुग्ण वाढल्याने ऑक्सिजन सिलेंडरचा तुर्वटा  झालेला आहे सद्या खासगी व्यवसाय संपूर्णपणे बंद आहेत व ऑक्सिजन सिलेंडर चे एजन्सी धारक व काही खासगी लोकांकडे ऑक्सिजन सिलेंडर पडून आहेत आज व्यवसाया पेक्षा लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे झाल्याने स्वताह प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी खासगी  व एजंसी धारकाकडे जाऊन ऑक्सिजन सिलेंडर चे रेकॉर्ड चेक करून माहिती घेतली व ऑक्सिजन सिलेंडर शासनाला जमा करण्याचे आवाहनही केले आहे.श्रीरामपूर येथे अनेक एजन्सी आहेत व असे अनेक व्यावसायिक आहेत की ज्यांच्याकडे ऑक्सिजन सिलेंडर चां वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो परंतु आज लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे झाल्याने उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी व्यावसायिक व एजन्सी धारकांनी ऑक्सिजन सिलेंडर शासनाला जमा करण्याचे आवाहन केले आहेत 
 

श्रीरामपूर पोलिसांना  गुप्त बातमीदार मार्फत  देवकर वस्ती येथे एक इसम गांजा विक्री करण्या करिता आला असले बाबतची  खात्रीशीर माहिती मिळाल्याने तेथे जाऊन छापा टाकला असता 4,60,000/  रुपये किमतीचा 46 किलो गांजा व 4,00,000/  रुपये किमतीची एक महिंद्रा बोलेरो पिकपअसा एकूण 8,60,000/- (8 लाख साठ हजार रुपयांचा) मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपी गणेश भास्कर सरोदे वय 38 वर्ष राहणार देवकर वस्ती वार्ड नंबर 7  श्रीरामपूर . याचेविरुध्द  श्रीरामपूर शहर पोलीस  स्टेशन जि.अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे . सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे, यांचे मार्गदर्शनाखाली Dy.s.p. संदीप मिटके पोलीस निरीक्षक सानप,सपोनि संभाजी पाटील,पोहे का जोसेफ साळवी,  पोना  करमल,  पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी, राहुल नरवडे, किशोर जाधव,सुनील दिघे आदींनी केली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget