श्रीरामपूर पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत देवकर वस्ती येथे एक इसम गांजा विक्री करण्या करिता आला असले बाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्याने तेथे जाऊन छापा टाकला असता 4,60,000/ रुपये किमतीचा 46 किलो गांजा व 4,00,000/ रुपये किमतीची एक महिंद्रा बोलेरो पिकपअसा एकूण 8,60,000/- (8 लाख साठ हजार रुपयांचा) मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपी गणेश भास्कर सरोदे वय 38 वर्ष राहणार देवकर वस्ती वार्ड नंबर 7 श्रीरामपूर . याचेविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे . सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे, यांचे मार्गदर्शनाखाली Dy.s.p. संदीप मिटके पोलीस निरीक्षक सानप,सपोनि संभाजी पाटील,पोहे का जोसेफ साळवी, पोना करमल, पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी, राहुल नरवडे, किशोर जाधव,सुनील दिघे आदींनी केली.
Post a Comment