श्रीरामपुर (प्रतिनिधी )- राज्यात कोरोणा महामारी वाढत चालली असून त्यामुळे रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत चालली आहे उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी कोवीड हाँस्पिटलला भेटी देवुन कोरोना रुग्णांची माहीती घेतली त्या वेळी बर्याच ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता भासू लागल्याने श्रीरामपूर येथील प्रांत अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी खासगी एजन्सी व ज्याच्याकडे ऑक्सिजन सिलेंडर आहेत त्यांना ऑक्सिजन सिलेंडर शासनाकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे संपूर्ण राज्यात हॉस्पिटल मध्ये कोरोणाचे रुग्ण वाढल्याने ऑक्सिजन सिलेंडरचा तुर्वटा झालेला आहे सद्या खासगी व्यवसाय संपूर्णपणे बंद आहेत व ऑक्सिजन सिलेंडर चे एजन्सी धारक व काही खासगी लोकांकडे ऑक्सिजन सिलेंडर पडून आहेत आज व्यवसाया पेक्षा लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे झाल्याने स्वताह प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी खासगी व एजंसी धारकाकडे जाऊन ऑक्सिजन सिलेंडर चे रेकॉर्ड चेक करून माहिती घेतली व ऑक्सिजन सिलेंडर शासनाला जमा करण्याचे आवाहनही केले आहे.श्रीरामपूर येथे अनेक एजन्सी आहेत व असे अनेक व्यावसायिक आहेत की ज्यांच्याकडे ऑक्सिजन सिलेंडर चां वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो परंतु आज लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे झाल्याने उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी व्यावसायिक व एजन्सी धारकांनी ऑक्सिजन सिलेंडर शासनाला जमा करण्याचे आवाहन केले आहेत
Post a Comment