कोवीड सेंटरसाठीचे दरपत्रक, नियमावली जाहीर करा, गोर-गरीबांची लुट थांबवा; अन्यथा सपातर्फे आंदोलन - जोयफ जमादार.

श्रीरामपुर (प्रतिनिधी) - कोरोना महामारीने संपूर्ण देशात हांहाकार माजविला असून, त्यातच आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील खूप भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे, श्रीरामपूर तालुक्याततर वैद्यकीय सेवेच्या नावाखाली भरपूर खाजगी कोविड सेंटर निर्माण झाले आहेत, परंतू डिपॉझिटच्या नावाखाली गोर- गरीबांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळण्याचा गोरखधंदा सध्या यातील अनेकांनी मांडला आहे,

पहीलेच लॉकडाऊनमुळे प्रचंड प्रमाणात आर्थिक टंचाईने भरडत असलेल्या लोकांच्या हाताला काम-धंदा नाही,मुबलक बेरोजगारीही वाढली आहे, यामध्ये कोविड सेंटरवाले महागडी औषधे, ऑक्सिजन आणावयास सांगत असल्याने लोकं सोने /मौल्यवान वस्तू गहाण ठेवून तर  कोणी व्याजाने पैसे घेऊन पूर्तता करत आहे, एवढे करून सुद्धा पैसे संपल्यावर कोविड सेंटरवाले सांगतात रुग्ण दुसरीकडे हलवा,अशातच पैशाअभावी दुसरीकडे ट्रीटमेंट न मिळाल्याने रुग्ण दगावत आहेत, त्यासाठी राज्य शासनाने खाजगी कोविड सेंटरसाठी जी नियमावली,जे दरपत्रक लागू केले आहे, ते त्यांनी कोविड सेंटरच्या बाहेरच दर्शनी भागावर सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावावेत, जेणेकरून रुग्णांच्या नातेवाईकांना दिसले पाहिजेत, सदरील दरपत्रक लावल्याने गोर- गरीबांची लुट होणार नाही, असे न केले गेल्यास आणि खाजगी कोविड सेंटरवाल्यांकडून गोरगरीबांची लूट होतच राहील्यास आम्ही समाजवादी पार्टीच्यावतीने रुग्णांची लयलुट करणाऱ्या खाजगी कोविड सेंटर चालवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे,

तथा खाजगी कोविड सेंटरवाले जर अशा पद्धतीने रुग्णांची लूट करत असतीलतर तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही श्री.जमादार यांनी या पत्रकात केले आहे.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget