बेलापुर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने मराठी शाळेत कोवीड सेंटर सुरु
बेलापुर (प्रतिनिधी )- बेलापुर ग्रामपंचायत , विविध समाजसेवी संघटना , प्राथमिक आरोग्य केंद्र , बेलापुर ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्यातुन बेलापूरात विनामूल्य कोविड सेंटर सुरु करण्यात आले असुन ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केले आहे शासनाच्या आदेशानुसार बेलापुर ग्रामपंचायतीने पुढाकार घेवुन प्राथमिक आरोग्य केंद्र विविध समाजसेवी संघटना मेडीकल व डाँक्टर असोसिएशन ग्रामस्थ या सर्वांच्या आर्थिक योगदानातुन मराठी शाळा येथे कोविड सेंटर सुरु करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की या कोवीड सेंटरमध्ये कोरोनाची लक्षण असणारांनाच घरीच विलगीकरण करण्याऐवजी येथील कोवीड सेटरमध्यै त्यांचेवर उपचार केले जाणार आहे या ठिकाणी चहा नाश्ता व दोन वेळचे जेवण मोफत तसेच आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार केले जाणार आहे या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी देविदास चोखर म्हणाले की या कोवीड सेंटर मध्ये आँक्सिजन व व्हेंटीलेटर या सारख्या सुविधा नसुन प्राथमिक लक्षणे असणार्या रुग्णावर या विलगीकरण कक्षात उपचार केले जाणार आहे प्राथमिक आरोग्य केंद्र व गावातील निष्णात डाँक्टरांच्या देखरेखीखाली येथील रुग्णावर उपचार केले जाणार आहे सदर सेंटरमध्ये येताना आधार कार्ड कोवीड तपासणी अहवाल सोबत आणावा या कोविड सेंटरचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या वेळी रणजीत श्रीगोड रमेश लोढा अजय डाकले प्रफुल्ल डावरे भरत साळुंके रविंद्र खटोडपुरुषोत्तम भराटे कामगार तलाठी कैलास खाडे डांँ .मच्छिंद्र निर्मळ डाँ.रविंद्र गंगवाल डाँ .सुधीर काळे डाँ अविनाश गायकवाड डाँ अनिल भगत पोलीस पाटील अशोक प्रधान पत्रकार देविदास देसाई ज्ञानेश गवले विष्णूपंत डावरे दिलीप दायमा किशोर कदम दिपक क्षत्रिय राम पोळ रमेश अमोलीक महेश ओहोळ विशाल आंबेकर दादा कुताळ प्रशांत लढ्ढा मुस्ताक शेख सविता अमोलीक अशोक राशिनकर अल्ताफ शेख आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते या कोविड सेंटरसाठी जेष्ठ पत्रकार अशोक तुपे यांच्या स्मरणार्थ रोख स्वरुपात आर्थिक मदत देण्यात आली
Post a Comment