साई मंदीराकडुन बेलापुरातील कोवीड सेंटर ला कोरोना औषधांची मदत...
बेलापुर (प्रतिनिधी )- बेलापुर येथील श्री साई मंदिरांच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त साई पावन प्रतिष्ठानच्या वतीने वरद विनायक कोवीड सेंटर करीता पंचवीस हजार रुपयांची औषधे साई पावन प्रतिष्ठानचे कैलास चायल यांनी कोवीड सेंटरचे भरत साळुंके व रविंद्र खटोड यांच्याकडे सुपुर्त केली बेलापुरचे माजी सरपंच भरत साळुंके व रत्नेश राठी यांच्या पुढाकाराने कै .मुरलीधर खटोड पतसंस्था साई खेमानंद ट्रस्ट जनता अघाडी शनैश्वर यात्रा कमीटी यांच्या विशेष सहकार्याने बेलापुर श्रीरामपुर रोडवर असणार्या संस्कृती मंगल कार्यालयात वरद विनायक कोविड सेंटर सुरु करण्यात आले दोनच दिवसात या कोवीड सेंटर मधील सर्व खाटा फुल झाल्या बेलापुर येथील साई मंदिराचा आज पाचवा वर्धापन दिन या निमित्ताने मंदिरात पुजा अर्चा करण्यात आली त्याच बरोबर वरद कोवीड सेंटरला पंचवीस हजार रुपयाची औषधे भेट देण्यात आली या वेळी प्रतिष्ठानचे सचिवा राजेंद्र लखोटीया रामविलास झंवर प्रशांत बिहाणी रविंद्र खटोड भरत साळुंके नितीन कुलकर्णी वैशाली कुलकर्णी भाग्यश्री कुलकर्णी प्रसाद खरात राम पोळ अजित सहानी रघुनाथ वाघ रोहीत गाजरे पत्रकार दिलीप दायमा कीशोर कदम उपस्थित होते.
Post a Comment