नागरिकांना कसलीही कल्पना न देता गुन्हेगारासारखे बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली त्यात काही वयोवृध्द नागरीकही होते एकेक नागरीकाला पोलीस रिंगण करुन मारत होते पोलिसांनी आपल्याकडे आलेले दौंड येथील एस आर पी एफ यांना आदेश केला आणि जो सापडेल त्याची अडचण काय आहे तो बाहेर का पडला हे जानुन न घेताच नागरिकांवर लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली यामध्ये एका युवकाचा हातात फँक्चर आले असुन सध्या डॉक्टर कापसे यांच्याकडे तो उपचार घेत आहे तर काही आपल्या मिळालेल्या प्रसादाचा हळद लावून घरीच उपचार करीत आहे अशा या पोलिसांच्या लढ्याची सुरुवात कोरोना बरोबर आहेत की शहरातील नागरिकांबरोबर हे समजने मुश्कील झालंय मंत्रालया पासुन ते वरीष्ठापर्यत सर्वांनी नागरीकावर लाठीचार्ज करु नये मारहाण करु नये असे आदेश असताना शहरात पोलीसांनी ही कारवाई कुणाच्या आदेशावरुन केली याची चौकशी करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे या बाबत लवकरच वरिष्ठाकडे लेखी तक्रार करण्यात येणार असल्याचे समजते.
श्रीरामपुर शहरातील नागरिकांनी दवाखाने करावे की दवाखान्यात आपल्या प्रियजनांना औषधोपचार करावा त्याच बरोबर रेमडीसीवीर व ऑक्सिजन सिलेंडरचा मोठा तुटवडा या साठी काहींची भटकंती सुरु आहे अशा नागरिकांना आता रात्री घडलेल्या प्रकारात स्वतः ऍडमिट होन्याची वेळ ही पोलिसांच्या चुकीच्या कारवाई मुळे आली आहे.
कोरोना काळात मटका गुटखा दारुगुत्ते खुले आम सुरु आहेत पोलीसांचा त्याकडे हेतूपुरस्पर कानाडोळा आहे परंतु दवाखान्यात असलेल्या आपल्या नातेवाईकाला वाचविण्यासाठी औषधे रेमिडीसीवर करीता जिवाचा आटापिटा करणाऱ्या नागरीकांना पोलीसांनी बेदम चोप दिला पोलिसांनी वरिष्ठांनी असा निर्णय अचानक का घेतला समजतच नाही.
Post a Comment