श्रीरामपुर /बेलापुर (प्रतिनिधी )- कोरोना रुग्णाकरीता नातेवाईकांची बेड मिळविण्यासाठी होणारी धावपळ थांबविण्यासाठी श्रीरामपुरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या देखरेखीखाली श्रीरामपुर तहसील कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात आला असुन ही सेवा नागरीकासाठी २४ तास सुरु राहणार असल्याची माहीती उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे रुग्णालयातील सर्व खाटा पुर्ण भरलेल्या आहेत अशा अवस्थेत रुग्णांना या दवाखान्यातुन त्या दवाखान्यात नेताना नातेवाईकाची फरफट होत असल्याचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी रुग्णांना तातडीने बेड उपलब्ध व्हावा या करीता तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला असुन या कक्षात नायब तहसीलदार श्रीमती छाया चौधरी मोबाईल नंबर ९९६०२६४६११ , अमोल ऐडके अ. का .संगायो मोबाईल नंबर ९८९०६८१६८५ ,शिवशंकर श्रीनाथ महसुल सहाय्यक मोबाईल नंबर ८९७५२६६७७७ ,नवनाथ मंडलीक शिपाई मोबाईल नंबर ८७९३४४४१८० यांची नियुक्ती केली आहे . श्रीरामपुर तहसील कार्यालयाचा दुरध्वनी ०२४२२२२२२५० असुन नागरीकासाठी हे अधिकारी व कर्मचारी २४ तास उपलब्ध असेल या कक्षातील अधिकारी कर्मचारी यांनी तालुक्यातील शासकीय /खाजगी रुग्णालयातील केंद्राची यादी तसेच दर दोन तासाला उपलब्ध बेड आँक्सिजन व जनरल बेड यांची संख्या प्राप्त करुन घ्यावयाची आहे कोवीड रुग्णांना तातडीने बेड उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्व शासकीय /खाजगी केंद्राशी समन्वय ठेवुन उपलब्ध असणार्या बेड बाबत नागरीकांनाअचुक माहीती द्यावयाची आहे त्यामुळे गरजुंना कोणत्या दवाखान्यात बेड उपलब्ध आहे हे तातडीने समजणार आहे रुग्णाची व नातेवाईकांची धावापळ कमी होण्यास मदत होणार आहे हे काम जबाबदारीने करण्याच्या सुचनाही उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी दिल्या असुन यात कसुन करणार्या अधिकारी कर्मचारी यांचेवर कारवाई देखील करण्याचा ईशारा उपविभागीय अधिकारी पवार यांनी दिला आहे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी स्थापन केलेल्या या कक्षातुन कोणत्या दवाखान्यात किती बेड उपलब्ध आहे याची अचुक माहीती नातेवाईकंना मिळणार आहे त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा वेळही वाया जाणार नाही तसेच काही ठिकाणी बेड उपलब्ध असतानाही जागाच शिल्लक नाही असे सांगितले जात होते परंतु आता केंद्रांना योग्य व अचुक माहीती द्यावी लागणार आहे त्यामुळे नागरीकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
Post a Comment