Latest Post


बेलापुर (प्रतिनिधी  )- कोरोनाच वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मा जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्याचा आदेश असताना बेलापुरात अचानक रविवारचा भरलेला  आठवडे बाजार सरपंच  महेंद्र साळवी रमेश अमोलीक हवालदार अतुल लोटके यांनी बंद पाडला                                             

 कोरोना नियमावली बाबत उद्या कोरोना कमीटीची बैठक घेण्यात येणार असुन त्या बैठकीत कोरोनावर उपाय योजनेचा निर्णय घेण्यात येणार आहे आठवडे बंदचा निर्णय मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दिलेला असल्यामुळे तो पाळणे आपणास बंधनकारक आहे असे अवाहन सरपंच महेंद्र साळवी यांनी केले  बेलापुरला रविवारचा आठवडे बाजार भरतो मा जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यामुळे बेलापुर ग्रामपंचायतीने गाव व परिसरात दवंडी देवुन तसेच व्हाँटस्अप द्वारे गावात फलक लिहुन सर्व व्यवसायीकांना  बाजार बंद असल्याबद्दल सुचना दिली होती असे असतानाही व्यापारी व भाजीपाला विक्रेत्यांनी आपली  दुकाने अचानक कोल्हार चौकात थाटली त्यामुळे त्या चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सांगुन देखील भाजीपाला विक्रेते व्यापारी उठण्यास तयार नव्हते अखेर सरपंच  महेंद्र साळवी यांनी बेलापुर  पोलीस स्टेशनला फोन करुन हवालदार अतुल लोटके यांना बोलावुन घेतले पोलीस सरपंच पत्रकार ग्रामपंचायत  सदस्य यांनी झालेली गर्दी कमी करुन व्यापाऱ्याची समजुत काढली त्या वेळी काही शेतकरीही आपला माल विकण्यास घेवुन आलेले होते त्यांनी आम्हाला ठराविक वेळ ठरवुन द्या  आमचा माल लगेच खराब होणारा आहे तसेच इतर गावातही आम्हाला दोन तास माल विकण्यास परवानगी देतात त्यामुळे गावातही तशीच परवानगी द्यावी अशी मागणी केली.

श्रीरामपूर शहरातील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा हीशहरातील समस्त नागरिकांची आग्रहाची मागणी आहे.या मागणीसाठी श्रीरामपूर शहरातील मुस्लीम समजाचा कधीही विरोध नव्हता व नाही.आम्ही शिवाजी चौकातच महाराजांचा आश्वारुढ पुतळा उभारावा यासाठी आग्रही आहोत.तरी आपणास विनंती की,छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा शिवाजी

चौकाशिवाय अन्यत्र कोठेही बसविण्यात येवू नये त्यास आमचा व मुस्लिम समाजाचा तिव्र विरोध आहे याची नोंद घ्यावी.पुतळ्याची जागा बदलण्याच्या प्रस्तावास अगर पुतळा अन्यत्र हलविण्याचा प्रयत्न झाल्यास आम्हास नाईलाजाने लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन वगैरे करावे लागेल व मग त्याचे होणाऱ्या परिबणामची जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी.असे अवाहन समस्त मुस्लिम समाजातील बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.


बेलापुर  (प्रातिनिधी  )-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असुन नियम न पाळणावर कठोर कारवाई करा अशा सुचना प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिल्या                                      बेलापुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देवुन बेलापुरगाव व परिसरातील कोरोना परिस्थितीचा आढावा त्यानी  घेतला या वेळी तहसीलदार प्रशांत पाटील जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक  खंडागळे  पत्रकार देविदास देसाई  उपस्थित  होते.  या वेळी उपविभागीय अधिकारी अनिल पवार म्हणाले की सर्वांना मास्क सक्तीचे करा जे दुकानदार मास्क वापरणार नाही तसेच ग्राहाकांना मास्कची सक्ती करणार नाही अशी दुकाने सात दिवसासाठी सिल करा कोरोनाचा सामना करावयाचा असेल तर नियम पाळावेच लागतील नियम न पाळणारावर कठोर कारवाई करा अशा सुचनाही पवार यांनी ग्रामपंचायतीला दिल्या या वेळी गावात मास्क वापरण्याबाबत दवंडी दिलेली आहे तसेच मास्क न वापरणार्यावर कारवाई करण्याच्या सुचना पोलीसांना दिलेल्या असल्याचे सरपंच साळवी व उपसरपंच खंडागळे यांनी सांगितले  या वेळी प्राथमिक आरोग्य  केंद्राचे आरोग्याधिकारी देविदास चोखर प्रफुल्ल डावरे पुरुषोत्तम भराटे दिलीप दायमा किशोर कदम अकबर टिन मेकरवाले आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.


श्रीरामपुर-दि.  29/03/2021 रोजी श्रीरामपुर पोलिसांना  गुप्त बातमीदार मार्फत   मातुलठाण शिवारातील गोदावरी नदी पात्रात पोकलेनच्या सहाय्याने वाळू उपसा करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने श्रीरामपुर पोलिसांनी सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकला असता  आरोपी क्र 1)  सुनीलकुमार  चूरामन महतो वय 24 वर्ष रा धोडा वस्ती ता.बेरमो जि.बोकारो राज्य झारखण्ड  हल्ली मनजीत सिंग  धुप्पड यांचेकडे रा आनंदवली  नाशिक 2) मनजीत सिंग  धुप्पड  रा आनंदवली  नाशिक 3) अंजनी गौरीशंकर विश्वकर्मा वय 24 रा. राजोहा ता. बहरी जिल्हा सिधी. मध्य प्रदेश 4) युवराज सिंग केशर सिंग भंडारी वय 40 रा.डी जी बागेसर जि. डेहराडून 5) रवी धुप्पड रा. श्रीरामपूर यांचे कडुन 2 पोकलेन, 1 बुलडोझर ,1 ट्रक 1 मोबाईल, 4 ब्रास वाळू असा एकूण 1,83,50000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.अन्य   एक आरोपी फरार असून सर्व  आरोपी विरुध्द     श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गु. क्र. 65/2021 व 66/2021  भा द वि कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे, DySP राहुल मदने,Dy.s.p  संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे,  पोसई अतुल बोरसे, स फौ. राजेंद्र  आरोळे, पोहे का सुरेश  औटी, पोहे का गोरे,  पोना  लोंढे, गोरे, रणवरे,  पोलीस कॉन्स्टेबल काका मोरे, नितीन चव्हाण, रवींद्र माळी, नितीन शिरसाठ , सुनील शिंदे आदींनी केली.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली प्रत्येकाच्या जीवनातील वार्षिक अंदाजपत्रकाची रात्र म्हणून गणली जाणारी शबे बरात रविवारी रात्री सर्व मुस्लिम बांधवांनी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली. पोलीस प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करीत रात्री मशिदीतील नमाजनंतर सर्वांनी आपल्या घरात प्रार्थना केली. कबरस्तानात कोणीही गेले नाही. त्यामुळे जमा मशिद व कबरस्थान परिसरात दरवर्षी दिसणाऱ्या गर्दी ऐवजी शुकशुकाट दिसत होता.

शबे बरात ही प्रत्येक मुस्लिमांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण रात्र असून या रात्री प्रार्थने बरोबरच कबरस्तानात जाऊन आपल्या पूर्वजांसाठी  दुआ ही केली जाते. परंतु कोरोनामुळे यावर्षी पोलिसांनी अशा पद्धतीने गर्दी करू नये. त्यामुळे प्रादुर्भाव वाढू शकतो. अशा सूचना केल्या होत्या. जामा मशिद ट्रस्ट व इतर सर्व मशिदींचे मौलानांशी विचारविनिमय करून पोलीस प्रशासन व धार्मिक संघटना यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार प्रशासनाने दिलेल्या सर्व निर्देशांचे मुस्लीम समाजाने तंतोतंत पालन केले. त्यामुळे रात्री दरवर्षी दिसणारी गर्दी कुठेही दिसली नाही. रात्री नऊ नंतरच रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. सर्व मुस्लिम बांधवांनी आपल्या घरांमध्ये प्रार्थना केली .

सध्या कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. शासन आणि प्रशासन जनतेच्या सेवेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शबे बरातच्या रात्री दरवर्षी हजारो मुस्लिम बांधव मिलाद पठण करीत कबरस्थान मध्ये जातात. तेथे मुफ्तीसाहेबांचे प्रवचन होते. त्यानंतर आपल्या पूर्वजांच्या कबरीवर जाऊन फुलांची चादर किंवा फुले  अर्पण केली जातात व दुआ केली जाते. मात्र सध्याच्या या वातावरणात अशी गर्दी केल्यास शहरातही प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सर्वांना विश्वासात घेऊन नियोजन केल्याने त्याला प्रतिसाद देत सर्वांनी आपल्या पूर्वजांसाठी घरातूनच दुआ केली. प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका मुस्लिम समाजाची नेहमीच असते.त्याचा प्रत्यय रात्री देखील आला.


अहमदनगर |प्रतिनिधी-करोना संसर्ग वाढल्याने राज्य सरकारच्या आदेशानुसार नगर जिल्ह्यात प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.जिल्हा प्रशासनाने याबाबतचे आदेश 28 मार्च रोजी जारी केले असून यात 15 एप्रिलपर्यंत रात्रीच्यावेळी गर्दी कमी करण्यासाठी पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास प्रत्येकी एक हजाराचा दंड करण्यात येणार आहे. यासह नियम कडक करण्यात आलेले आहेत.जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढलेल्या आदेशात सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील. तसेच रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास प्रति व्यक्ती एक हजारांचा दंड आकारण्यात येईल. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तीच्या हालचालीवर आणि फिरण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत निर्बंध टाकण्यात आलेले आहेत.कंटेन्मेंट झोनसाठी यापूर्वीच्या आदेशाव्दारे असलेले सर्व निबंध लागू राहतील. या झोनचे सिमांकन व अंतर्गत कार्यपध्दती याबाबत राज्य व केंद्र शासनाव्दारे वेळोवेळी जारी केलेले निर्देश लागू राहतील. कंटेन्मेंटमध्ये आढळलेल्या करोना बाधीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा यादी करुन शोध घेणे तसेच त्यांना अलग ठेवणे व 14 दिवस संपर्कात राहणे. (80 टक्के संपर्कातील व्यक्तींचा 72 तासांच्या आत शोध घेणे), सार्वजनिक ठिकाणे (उद्याने, बागा इ.) रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान बंद राहतील.उल्लंघन केल्यास प्रती व्यक्ती एक हजारांचा आकारण्यात येईल. विनामास्क आढळलेल्या व्यक्तीस 500 रुपये दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी थुकताना आढळलेल्या व्यक्तीस एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. सर्व सिनेमा हॉल्स, प्रेक्षागृह, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, हे रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीत बंद राहतील. परंतु हॉटेल्स, रेस्टॉरंटस् यांना घर पोच सेवा आणि पार्सल सुविधा देण्यास मान्यता राहील.आदेशाचे उल्लंघन झाल्यास, संबंधित सिनेमा हॉल्स, प्रेक्षागृह, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंटस् हे केंद्र शासनाव्दारे कोविड-19 साथरोग हा आपत्ती म्हणुन जाहीर केलेल्या कालावधीपर्यत बंद करण्यात येतील. तसेच उल्लंघन केलेले ठिकाणचे मालकास आपत्ती कायद्मातंर्गत दंड देखील केला जाईल.सर्व प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय, धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास मनाई राहील. प्रेक्षागृह किंवा नाट्यगृहे यांचा कार्यक्रमास वापर करण्यास मनाई राहील. याबाबत उल्लंघन झाल्यास संबंधित ठिकाणचे मालकास आपत्ती कायद्यांतर्गत दंड केला जाईल. तसेच केंद्र शासनाव्दारे कोविड-19 साथरोग हा आपत्ती म्हणुन जाहीर केलेल्या कालावधी पर्यत सदर मालमत्ता बंद करण्यात येईल. फक्त विवाह समारंभास जास्तीत-जास्त 50 व्यक्तींना एकत्र येण्यास निबंध असणार नाहीत.मंगल कार्यालय, लॉन्स, मॅरेज हॉल व लग्न समारंभाचे ठिकाणी लग्न समारंभासाठी आलेले वर्‍हाडी, पाहुणे मंडळी, मंगल कार्यालयातील कर्मचारी, आचारी व इतर उपस्थित सर्व व्यक्ती मिळून जास्तीत-जास्त 50 व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. लग्न समारंभ आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी. टेबल, खुर्च्या, पाण्याचे नळ व हाताळण्यात येणारे सर्व वस्तूंचे पृष्ठभाग इत्यादीचे निर्जतुकीकरण करण्यात यावे.मंगल कार्यालय, लॉन्स, मेरेज हॉल व लग्न समारंभाचे ठिकाणच्या आस्थापणांना लग्न समारंभासाठी येणार्‍या सर्व व्यक्तींचे थर्मल स्कॅनॅरव्दारे स्क्रिनिंग करणे तसेच सॅनिटायझर डिस्पेन्सरचा वापर करणेबंधनकारक राहील. लग्न समारंभात शारीरिक अंतराचे पालन करण्यात यावे. दोन व्यक्तींमध्ये कमीत-कमी 6 फुटांचे अंतर ठेवावे, यासह आरोग्य संस्था आणि अन्य अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय आणि खासगी कार्यालयात 50 टक्के उपस्थिती ठेवण्यात यावी. शासकीय कार्यालयात तातडीचे काम असणार्‍यांना प्रवेश देण्यात यावा, तसेच धार्मिक स्थळ या ठिकाणी गर्दी नियंत्रणाचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.


श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथील पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव यांना मातापूर शिवारात काही इसम जुगार खेळत असल्याबद्दल माहिती मिळाली. यावरून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मातापूर शिवारात बनकरवस्ती परिसरातील हाडोळ्याच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली काही इसम जुगार खेळत असल्याचे आढळून आले.यावेळी त्यांच्याकडे तपासणी केली असता रोख रक्कम, मोबाईल व पत्ते आढळून आले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे श्रीरामपूर शहरातील मटका जुगार याचेदेखील काही ठिकाणी कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक संजय सानप तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक परदेशी व पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, पोलीस हवालदार रघुनाथ खेडकर यांनी छापा टाकला. सदर आरोपींवर कडक कारवाई करण्यात आली असून यापुढे अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मीळत आहे.  .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget