Latest Post


बेलापुर  (प्रतिनिधी  )- गौतम हिरण या व्यापाऱ्याच्या अपहरणा संदर्भात अचुक माहीती देणारास  बेलापुरातील व्यापारी व ग्रामस्थ यांच्या वतीने एक लाख रुपयांचे बक्षिस देण्याचे जाहीर करण्यात आले असुन घटनेच्या निषेधार्थ शनिवार दिनांक ६ मार्च रोजी गाव बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे.   बेलापुरातील व्यापारी गौतम हिरण हे तीन दिवसापासून बेपत्ता आहेत पोलीसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असला तरी गुन्हा घडून बराच कालावधी लोटल्यामुळे गौतम हिरण यांच्या विषयी व्यापारी  व ग्रामस्थांची चिंता वाढली आहे त्यामुळे पुढील आंदोलनांची दिशा ठरविण्यासाठी बेलापुर ग्रामस्थांची बैठक ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सर्वानुमते असे ठरविण्यात आले की या घटनेबाबत अचुक माहिती देणारास योग्य ते बक्षिस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला या वेळी हिरण परिवार व्यापारी व ग्रामस्थ यांच्या वतीने अचुक माहीती देणारास एक लाख रुपयाचे बक्षिस देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच शनिवार दिनांक ६ मार्च रोजी या घटनेच्या निषेधार्थ गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला सोमवार पर्यंत गौतम हिरण यांचा शोध लागला नाही तर बेमुदत गाव बंद ठेवण्याचा निर्यणही एकमताने घेण्यात आला या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे जिप सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले पत्रकार देविदास देसाई ज्ञानेश गवले  भरत साळुंके जनता अघाडीचे अध्यक्ष  रविंद्र खटोड टँक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल मुथा पंचायत समिती सदस्य अरुण पा नाईक रणजित श्रीगोड श्रीवल्लभ मुंदडा यांनी मनोगत व्यक्त केले या वेळी बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे नवनाथ कुताळ रमेश अमोलीक  जितेंद्र छाजेड जितेंद्र गदीया दिलीप दायमा सुधाकर खंडागळे  मोहसीन सय्यद अनिल डाकले बाळू सांचेती संजय बाठीया भूषण चेंगेडीया अमोला गाढे लहानु नागले प्रफुल्ल डावरे प्रकाश कुर्हे जालींदर कुर्हे भास्कर  बगाळ अनिल मुंडलीक प्रशांत मुडलीक सुहास शेलार सतीश चायल प्रशांत बिहाणी राम पोळ बाळू दायमा दिपक क्षत्रीय सागर ढवळे अजिज शेख शिवसेनेचे अशोक पवार गणेश मुंडलीक सचिन वाघ लहानु नागले विशाल आंबेकर हरिप्रसाद मंत्री   आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-संजय भानुदास  लोखंडे राहणार बेलापुर खूर्द  वय ४७  हे सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान मोटार सायकलवर घरी जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला या हल्ल्यामुळे ते मोटारसायकल वरुन खाली पडले बिबट्याने पुन्हा त्याचेवर झडप घालुन त्याना बाजुच्या शेतात नेण्याचा प्रयत्न केला या वेळी प्रसंगावधान राखुन संजयने आरडा ओरड केली संजयच्या आवाजाने आसपासचे नागरीक गोळा झाले त्यामुळे बिबट्याने तेथुन पळ काढला ग्रामस्थांनी त्यांना तातडीने बेलापुर येथे दवाखान्यात दाखल केले तेथुन त्यांना श्रीरामपुर येथील दवाखान्यात हलविण्यात आले त्याच्या डोक्यावर गळ्याला अंगावर बर्याच जखमा झालेल्या आहे त्यांना ताताडीने अहमदनगर येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- रा.स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे  प्रांत संघचालक म्हणून बेलापुर येथील सुरेश तथा नानासाहेब जाधव यांची पुढील तीन वर्षांसाठी निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निर्णय अधिकारी  म्हणून पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख दिलीप क्षीरसागर यांनी ही निवड घोषित केली. दर तीन वर्षांनी संघाच्या  जिल्ह्यापासून वरील सर्व स्तरावरील संघ चालक पद व अखिल भारतीय सरकार्यवाह यांच्या निवडणूका होत असतात. त्याशिवाय अखिल भारतीय प्रतिनिधींची देखील निवड होत असते.कोरोना संकटाने ऑनलाईन  घेण्यात आलेल्या बैठकीत नाशिक, नगर, पुणे,सातारा,सांगली,सोलापूर व कोल्हापूर या जिल्ह्यातील निर्वाचित संघ शाखा प्रतिनिधींनी हि निवड केली.नानासाहेब जाधव हे मूळ बेलापूर ( तालुका श्रीरामपूर) येथील रहिवासी असून सध्या नगर येथे स्थायिक आहेत.त्यांनी कृषी अभियांत्रिकी मधील एम.टेक.पदवी प्राप्त केलेली असून माती आणि पाणी संवर्धनासाठी त्यांचा विशेष अभ्यास आहे. राहुरी  येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात ते १९८३ ते २०१२ या काळात प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते.त्यांनी पदवी परीक्षा प्राप्त केल्यावर संघाचे पूर्णवेळ प्रचारक  म्हणून मावळ,शिरूर तालुका तसेच जळगाव जिल्हा स्तरावर सहा वर्ष काम केले आहे.यापूर्वी रा स्व संघाच्या जिल्हा,विभाग व प्रांत स्तरावर त्यांनी  विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या असून   २०१३ पासून प्रांत संघचालक पदावर ते कार्यरत आहेत.त्यांच्या निवडीनंतर प्रांत कार्यवाह डॉ प्रवीण दबडघाव यांनी त्यांचे अभिनंदन करतांना प्रांतातील संघकामासाठी  त्यांच्या मार्गदर्शनाचा पुढील काळात पुनश्च लाभ मिळणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.या बैठकीत प्रांतातील सर्व   जिल्हा,विभाग व प्रांत स्तरावरील  प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

शिर्डी/ राहाता : येथील पत्रकार प्रा. जयंत दामोधर गायकवाड यांना पुणे येथील विद्यापीठाने नुकतीच पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विषयात पीएच.डी. पदवी जाहीर केली आहे. या संशोधनासाठी डॉ. जयंत यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध

कार्यरत असलेले एम.जी.एम. विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डॉ. सुधीर गव्हाणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. 


सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असलेला व सरकारला  शेती व शेतकऱ्यांसाठी धोरण निश्चित करताना दिशा देऊ शकणाऱ्या क्रुषि पत्रकारिता हा विषय घेऊन पीएच.डी. संशोधन करणारे डॉ. जयंत गायकवाड हे अहमदनगर जिल्ह्यातील पहिलेच संशोधक पत्रकार ठरले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होत त्यांचे दोन शोधनिबंध देखील नामांकित जर्नलमध्ये  प्रसिद्ध झालेले आहेत. 


पीएचडी मार्गदर्शक प्रो. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले की डॉ. जयंत गायकवाड यांच्या संशोधनाचा उपयोग राज्य व केंद्र सरकारला शेती, शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाची धोरणे आखण्यासाठी  निश्चित उपयोगी आहेत. दुष्काळ, नापिकी, शेतकरी आत्महत्या, बदलते हवामान, क्रुषी विद्यापीठे, बाजारभाव, कर्जपुरवठा, शासकीय योजना, कर्जमाफी, प्रचार आणि प्रसारमाध्यमे आदींबाबतीत ठोस धोरणे ठरविणे यामुळे शक्य होणार आहे. डॉ. गायकवाड यांच्या  संशोधनातून शाश्वत विकासासाठी परिश्रमपूर्वक उभे राहिलेले नवे आदर्श प्रतिमान (New Ideal Model)  हे या पीएचडी संशोधनाचा USP (Unique Selling Point) आहे. या संशोधनातून पुढे आलेले  निष्कर्ष, शिफारशी आणि फलीतांचे कौतुक अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे  ज्येष्ठ प्राध्यापक तथा संशोधक डॉ. मार्क यांनी केल्याचेही डॉ. गव्हाणे यांनी स्पष्ट केले. 


या यशाबद्दल डॉ. जयंत गायकवाड यांचे राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, उच्च शिक्षणमंत्री ना. प्राजक्त दादा तनपुरे, माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, दै. लोकमतचे अहमदनगर आव्रुत्ती प्रमुख सुधीर लंके, युवक कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, पुण्यनगरी चे व्रुत्तसंपादक विकास अंत्रे, न्यूज सुपर वन चे संपादक अस्लम बिनसाद,  शिर्डी प्रेस क्लबचे अध्यक्ष हरीश दिमोटे,  मनोज गाडेकर, नितीन ओझा, सचिन बनसोडे, जावेद सय्यद, बाळासाहेब सोनवणे, जितेश लोकचंदानी, दिलीप खरात,  युवा नेते मुन्ना भाऊ सदाफळ, इंजिनीअर संतोष राजगुरू,  अभिजीत भालेराव, चंद्रकांत देठे, सौ. निता गायकवाड, 

रामनाथ सदाफळ, समीर बेग यांचेसह अनेकांनी सत्कार, अभिनंदन करीत कौतुक केले आहे. 


पत्रकारितेची कोणताही  पार्श्वभूमी नसताना डॉ. जयंत यांनी  ईटीव्ही मराठी (हैदराबाद), मी मराठी टीव्ही (मुंबई), लाईव्ह इंडिया (मुंबई), आय.बी.एन. लोकमत (शिर्डी), दै. सार्वमत (श्रीरामपूर) साठी संपादकीय पातळीवर तर मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद मधे पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागात प्राध्यापक, विभागप्रमुख म्हणून अनेक वर्ष अध्यापन केले आहे. इलेक्ट्रॉनिक व मुद्रित माध्यमातील शेकडो यशस्वी पत्रकार घडविणारे प्रा. जयंत गायकवाड यांनी

पुणे येथील 'यशदा' शासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतही अनेक अधिकऱ्यांना माहिती अधिकार अधिनियमाचे प्रशिक्षण दिलेले आहे. माहिती अधिकार कायद्याचे तज्ज्ञ प्रशिक्षक असल्याने  भारत  सरकार (DoPT) च्या वतीने डॉ. जयंत गायकवाड यांची  नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे  जिल्ह्यातील महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम सह

विविध सरकारी कार्यालयांचे तपासणी पर्यवेक्षक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. टेक्नोजर्नलिस्ट मीडिया संस्था, इन्स्टिट्यूट फॉर मीडिया रिसर्च अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि

राज्यस्तरीय महात्मा फुले पत्रकारिता पुरस्कार समितीचे ते संस्थापक संयोजक आहेत. अनेक सामाजिक प्रश्नावरही त्यांनी आंदोलनात सक्रीय भाग घेतलेला आहे.   राहाता येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.एस. गायकवाड सर आणि शिक्षिका सौ. डी.डी. गायकवाड या शिक्षक दांम्पत्याचे ते  सुपुत्र आहेत.


बेलापुर  (प्रतिनिधी )- बेलापुर येथील प्रतिष्ठीत व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरणाचा तातडीने शोध घेवुन आरोपींना जेरबंद करावे व गौतम हिरण यांची सहीसलामत सुटका करावी अशी मागणी बेलापुर ग्रामस्थ व्यापारी यांच्या वातीने करण्यात आली असुन तपास योग्य दिशेने चालु आहे तपासात व्यत्यय येईल असे कृत्य करु नये असे अवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी केले आहे                                            बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे सोमवार दिनांक १ मार्च रोजी सायंकाळी अज्ञात ईसमांनी अपहरण केले होते पोलीसांनी तातडीने मिंसिंगचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता आज सकाळी श्रीरामपुर व बेलापुर येथील व्यापारी तसेच बेलापुर ग्रामस्थ हे बेलापुर ग्रामपंचायत कार्यालयापासुन मुक मोर्चाने बेलापुर पोलीस स्टेशनला आले तेथे सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच आभिषेक खंडागळे  बेलापुर पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई  खजिनदार सुनिल मुथा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा भरत साळुंके जि प सदस्य शरद नवले यांनी या घटनेचा बारकाईने तपास करुन आरोपींना जेरबंद करावे व व्यापारी गौतम हिरण यांची सुखरुप सुटका करावी अशी मागणी केली या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके व पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी सांगितले की पोलीसांचा सर्व बाजुंनी तपास सुरु आहे तपासासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे पोलीस तपासात अडथळा होईल असे कृत्य कुणी करु नये आरोपींना अटक करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत दरम्यान अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी सकाळी बेलापुरला भेट दिल्यानंतर तपासाला गती मिळाली पोलीसांनी आगोदर मिसींगचा गुन्हा दाखल केला होता नतंर अपहरणाचा गुन्हा दाखल केला असला तरी या गुन्ह्याचा तपास तातडीने लावावा या गुन्ह्यातील आरोपीना लवाकरात लवकर अटक करुन व्यापारी गौतम हिरण यांची सुखरुप सुटका करावी अन्यथा बेलापुर ग्रामस्थ व व्यापारी आंदोलन करतील असा ईशाराही या वेळी देण्यात आला  या वेळी कांतीलाल मुथा रमन मुथा बाजार समितीचे संचालक सुधीर नवले रवि खटोड अजय डाकले प्रकाश कुर्हे रमेश लोढा अनिल नाईक  मुस्ताक शेख भूषण चेंगेडीया अभिषेक राका हीतेश धाडीवाल अजिज शेख गोपाल जोशी शरद सोमाणी गणपत मुथा अनिल पवार अशोक गवते किरण भांड रत्नेश बोरा मिथुन मुथा अभिजीत नवलखा राजेश खटोड प्रसाद खरात सचिन जोशी राहुल लखोटीया प्रशांत शहाणे रमेश अमोलीक आदिसह व्यापारी बांधव उपस्थित होते.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- मनुष्याच्या मृत्यू नंतर करण्यात येणारी मृत्यू भोजन परंपरा खंडीत करुन गावातील सप्तशृंगी मातेच्या मंदिराचा संभा मंडप बांधुन देण्याचा निर्णय बेलापुरातील चायल परिवाराने घेतला असुन या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे                                       बेलापुर येथील किराणा मर्चड असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश मदनलाल चायल यांचे कमी वयात निधन झाले ते सप्तशृंगी मंदिराचे अध्यक्ष होते या मंदिरापुढे सभा मंडप व्हावा अशी त्यांची ईच्छा होती त्या करीता त्यांची धडपड चालु होती परंतु दुर्दैवाने त्यांचे निधन झाले त्यांची राहीलेली ईच्छा पुर्ण करण्याचा निर्णय चायल परिवाराने घेतला तारुण्यात योगेशचा मृत्यू झाल्यामुळे चायल परिवाराने बाराव्याचे भोजन न देण्याचा निर्णय घेवुन  सप्तशृंगी मंदिराचा सभामंडप बांधुन  देण्याचा निर्णय घेतला आहे  बदलत्या काळानुरुप व प्रसंगानुरुप बदलण्याचा निर्णय चायल परिवाराने घेतला आहे या सभा मंडपासाठी सव्वा ते दिड लाख रुपये खर्च येणार आहे  या सभा मंडपाचे काम लवकरात लवकर पुर्ण करुन स्वर्गीय योगेश चायल यांच्या बाराव्याच्या दिवशी दिनांक ७ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता सभामंडपाचा लोकार्पण सोहळा करण्याचा निर्णय कैलास चायल व त्यांच्या परिवाराने घेतला आहे या निमित्ताने योगेश चायल यांच्या स्मृती चिरंतर जपण्याचा  चायल परिविराचा एक छोटासा प्रयत्न आहे

बेलापुर  (प्रतिनिधी ): श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर येथील  प्रसिद्ध व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण हे काल सोमवारी सायंकाळी सात वाजेपासुन अचानक बेपत्ता झाले. या व्यापाऱ्याचे अपहरण झाले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

काल सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता हा व्यापारी नेहमीप्रमाणे आपले गोडाउन बंद करून हिशोबाच्या वह्या व रोख रक्कम देऊन दुचाकीवरुन घराकडे निघाला असता बेलापुर बायपास येथे त्यांची मोटरसायकल अडवून त्यांना एका चारचाकीत बळजबरीने कोंबून त्यांचे अपहरण केले.असावे अशी शक्यता आहे एका चार चाकी वाहनात एका व्यक्तीला नेत असताना काहींनी पाहीले आहे ती व्यक्ती सोडा सोडा असे म्हणून दरवाजाला लाथा मारत असल्याचेही काहींनी सांगितले असुन पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत तीच कार श्रीरामपुरच्या दिशेने गेली असल्याचे सी सी टि व्हीत ही आढळून येत आहे त्यामुळे या व्यापाऱ्याचे अपहरण झाले की काय अशी शंका सर्वांना येत आहे रात्रभर गावातील नेतेमंडळी सदर व्यापाऱ्याचे नातेवाईक पोलीस स्टेशनला ठाण मांडून होते  व्यापाऱ्याचे अपहरण करून ही चार चाकी श्रीरामपूर च्या दिशेने  निघून गेली. पोलिस तिचा शोध घेत आहेत.गौतम हिरण यांची मोटारसायकल श्रीरामपुर बेलापुर बायपासला लावलेली आढळली त्या गाडीला चावी तशीच होती शिवाय हीशोबाची कागदापत्रे असलेल्या वह्यांची पिशवीही गाडीलाच होती त्यामुळे पैशाकरीता तर या व्यापार्याचे अपहरण केले नसावे ना अशी शंका नातेवाईकांना येत आहे त्या दृष्टीने बेलापुरचे पोलीस तपास करत आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget