बेलापुर (प्रतिनिधी )-संजय भानुदास लोखंडे राहणार बेलापुर खूर्द वय ४७ हे सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान मोटार सायकलवर घरी जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला या हल्ल्यामुळे ते मोटारसायकल वरुन खाली पडले बिबट्याने पुन्हा त्याचेवर झडप घालुन त्याना बाजुच्या शेतात नेण्याचा प्रयत्न केला या वेळी प्रसंगावधान राखुन संजयने आरडा ओरड केली संजयच्या आवाजाने आसपासचे नागरीक गोळा झाले त्यामुळे बिबट्याने तेथुन पळ काढला ग्रामस्थांनी त्यांना तातडीने बेलापुर येथे दवाखान्यात दाखल केले तेथुन त्यांना श्रीरामपुर येथील दवाखान्यात हलविण्यात आले त्याच्या डोक्यावर गळ्याला अंगावर बर्याच जखमा झालेल्या आहे त्यांना ताताडीने अहमदनगर येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे.
Post a Comment