गौतम हिरण या व्यापाऱ्याच्या अपहरणा संदर्भात अचुक माहीती देणारास बेलापुरातील व्यापारी व ग्रामस्थ यांच्या वतीने एक लाख रुपयांचे बक्षिस.
बेलापुर (प्रतिनिधी )- गौतम हिरण या व्यापाऱ्याच्या अपहरणा संदर्भात अचुक माहीती देणारास बेलापुरातील व्यापारी व ग्रामस्थ यांच्या वतीने एक लाख रुपयांचे बक्षिस देण्याचे जाहीर करण्यात आले असुन घटनेच्या निषेधार्थ शनिवार दिनांक ६ मार्च रोजी गाव बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे. बेलापुरातील व्यापारी गौतम हिरण हे तीन दिवसापासून बेपत्ता आहेत पोलीसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असला तरी गुन्हा घडून बराच कालावधी लोटल्यामुळे गौतम हिरण यांच्या विषयी व्यापारी व ग्रामस्थांची चिंता वाढली आहे त्यामुळे पुढील आंदोलनांची दिशा ठरविण्यासाठी बेलापुर ग्रामस्थांची बैठक ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सर्वानुमते असे ठरविण्यात आले की या घटनेबाबत अचुक माहिती देणारास योग्य ते बक्षिस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला या वेळी हिरण परिवार व्यापारी व ग्रामस्थ यांच्या वतीने अचुक माहीती देणारास एक लाख रुपयाचे बक्षिस देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच शनिवार दिनांक ६ मार्च रोजी या घटनेच्या निषेधार्थ गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला सोमवार पर्यंत गौतम हिरण यांचा शोध लागला नाही तर बेमुदत गाव बंद ठेवण्याचा निर्यणही एकमताने घेण्यात आला या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे जिप सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले पत्रकार देविदास देसाई ज्ञानेश गवले भरत साळुंके जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड टँक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल मुथा पंचायत समिती सदस्य अरुण पा नाईक रणजित श्रीगोड श्रीवल्लभ मुंदडा यांनी मनोगत व्यक्त केले या वेळी बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे नवनाथ कुताळ रमेश अमोलीक जितेंद्र छाजेड जितेंद्र गदीया दिलीप दायमा सुधाकर खंडागळे मोहसीन सय्यद अनिल डाकले बाळू सांचेती संजय बाठीया भूषण चेंगेडीया अमोला गाढे लहानु नागले प्रफुल्ल डावरे प्रकाश कुर्हे जालींदर कुर्हे भास्कर बगाळ अनिल मुंडलीक प्रशांत मुडलीक सुहास शेलार सतीश चायल प्रशांत बिहाणी राम पोळ बाळू दायमा दिपक क्षत्रीय सागर ढवळे अजिज शेख शिवसेनेचे अशोक पवार गणेश मुंडलीक सचिन वाघ लहानु नागले विशाल आंबेकर हरिप्रसाद मंत्री आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment