बेलापुर (प्रतिनिधी )- बेलापुर येथील प्रतिष्ठीत व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरणाचा तातडीने शोध घेवुन आरोपींना जेरबंद करावे व गौतम हिरण यांची सहीसलामत सुटका करावी अशी मागणी बेलापुर ग्रामस्थ व्यापारी यांच्या वातीने करण्यात आली असुन तपास योग्य दिशेने चालु आहे तपासात व्यत्यय येईल असे कृत्य करु नये असे अवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी केले आहे बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे सोमवार दिनांक १ मार्च रोजी सायंकाळी अज्ञात ईसमांनी अपहरण केले होते पोलीसांनी तातडीने मिंसिंगचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता आज सकाळी श्रीरामपुर व बेलापुर येथील व्यापारी तसेच बेलापुर ग्रामस्थ हे बेलापुर ग्रामपंचायत कार्यालयापासुन मुक मोर्चाने बेलापुर पोलीस स्टेशनला आले तेथे सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच आभिषेक खंडागळे बेलापुर पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई खजिनदार सुनिल मुथा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा भरत साळुंके जि प सदस्य शरद नवले यांनी या घटनेचा बारकाईने तपास करुन आरोपींना जेरबंद करावे व व्यापारी गौतम हिरण यांची सुखरुप सुटका करावी अशी मागणी केली या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके व पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी सांगितले की पोलीसांचा सर्व बाजुंनी तपास सुरु आहे तपासासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे पोलीस तपासात अडथळा होईल असे कृत्य कुणी करु नये आरोपींना अटक करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत दरम्यान अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी सकाळी बेलापुरला भेट दिल्यानंतर तपासाला गती मिळाली पोलीसांनी आगोदर मिसींगचा गुन्हा दाखल केला होता नतंर अपहरणाचा गुन्हा दाखल केला असला तरी या गुन्ह्याचा तपास तातडीने लावावा या गुन्ह्यातील आरोपीना लवाकरात लवकर अटक करुन व्यापारी गौतम हिरण यांची सुखरुप सुटका करावी अन्यथा बेलापुर ग्रामस्थ व व्यापारी आंदोलन करतील असा ईशाराही या वेळी देण्यात आला या वेळी कांतीलाल मुथा रमन मुथा बाजार समितीचे संचालक सुधीर नवले रवि खटोड अजय डाकले प्रकाश कुर्हे रमेश लोढा अनिल नाईक मुस्ताक शेख भूषण चेंगेडीया अभिषेक राका हीतेश धाडीवाल अजिज शेख गोपाल जोशी शरद सोमाणी गणपत मुथा अनिल पवार अशोक गवते किरण भांड रत्नेश बोरा मिथुन मुथा अभिजीत नवलखा राजेश खटोड प्रसाद खरात सचिन जोशी राहुल लखोटीया प्रशांत शहाणे रमेश अमोलीक आदिसह व्यापारी बांधव उपस्थित होते.
Post a Comment