कार्यरत असलेले एम.जी.एम. विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डॉ. सुधीर गव्हाणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असलेला व सरकारला शेती व शेतकऱ्यांसाठी धोरण निश्चित करताना दिशा देऊ शकणाऱ्या क्रुषि पत्रकारिता हा विषय घेऊन पीएच.डी. संशोधन करणारे डॉ. जयंत गायकवाड हे अहमदनगर जिल्ह्यातील पहिलेच संशोधक पत्रकार ठरले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होत त्यांचे दोन शोधनिबंध देखील नामांकित जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत.
पीएचडी मार्गदर्शक प्रो. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले की डॉ. जयंत गायकवाड यांच्या संशोधनाचा उपयोग राज्य व केंद्र सरकारला शेती, शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाची धोरणे आखण्यासाठी निश्चित उपयोगी आहेत. दुष्काळ, नापिकी, शेतकरी आत्महत्या, बदलते हवामान, क्रुषी विद्यापीठे, बाजारभाव, कर्जपुरवठा, शासकीय योजना, कर्जमाफी, प्रचार आणि प्रसारमाध्यमे आदींबाबतीत ठोस धोरणे ठरविणे यामुळे शक्य होणार आहे. डॉ. गायकवाड यांच्या संशोधनातून शाश्वत विकासासाठी परिश्रमपूर्वक उभे राहिलेले नवे आदर्श प्रतिमान (New Ideal Model) हे या पीएचडी संशोधनाचा USP (Unique Selling Point) आहे. या संशोधनातून पुढे आलेले निष्कर्ष, शिफारशी आणि फलीतांचे कौतुक अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक तथा संशोधक डॉ. मार्क यांनी केल्याचेही डॉ. गव्हाणे यांनी स्पष्ट केले.
या यशाबद्दल डॉ. जयंत गायकवाड यांचे राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, उच्च शिक्षणमंत्री ना. प्राजक्त दादा तनपुरे, माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, दै. लोकमतचे अहमदनगर आव्रुत्ती प्रमुख सुधीर लंके, युवक कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, पुण्यनगरी चे व्रुत्तसंपादक विकास अंत्रे, न्यूज सुपर वन चे संपादक अस्लम बिनसाद, शिर्डी प्रेस क्लबचे अध्यक्ष हरीश दिमोटे, मनोज गाडेकर, नितीन ओझा, सचिन बनसोडे, जावेद सय्यद, बाळासाहेब सोनवणे, जितेश लोकचंदानी, दिलीप खरात, युवा नेते मुन्ना भाऊ सदाफळ, इंजिनीअर संतोष राजगुरू, अभिजीत भालेराव, चंद्रकांत देठे, सौ. निता गायकवाड,
रामनाथ सदाफळ, समीर बेग यांचेसह अनेकांनी सत्कार, अभिनंदन करीत कौतुक केले आहे.
पत्रकारितेची कोणताही पार्श्वभूमी नसताना डॉ. जयंत यांनी ईटीव्ही मराठी (हैदराबाद), मी मराठी टीव्ही (मुंबई), लाईव्ह इंडिया (मुंबई), आय.बी.एन. लोकमत (शिर्डी), दै. सार्वमत (श्रीरामपूर) साठी संपादकीय पातळीवर तर मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद मधे पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागात प्राध्यापक, विभागप्रमुख म्हणून अनेक वर्ष अध्यापन केले आहे. इलेक्ट्रॉनिक व मुद्रित माध्यमातील शेकडो यशस्वी पत्रकार घडविणारे प्रा. जयंत गायकवाड यांनी
पुणे येथील 'यशदा' शासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतही अनेक अधिकऱ्यांना माहिती अधिकार अधिनियमाचे प्रशिक्षण दिलेले आहे. माहिती अधिकार कायद्याचे तज्ज्ञ प्रशिक्षक असल्याने भारत सरकार (DoPT) च्या वतीने डॉ. जयंत गायकवाड यांची नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे जिल्ह्यातील महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम सह
विविध सरकारी कार्यालयांचे तपासणी पर्यवेक्षक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. टेक्नोजर्नलिस्ट मीडिया संस्था, इन्स्टिट्यूट फॉर मीडिया रिसर्च अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि
राज्यस्तरीय महात्मा फुले पत्रकारिता पुरस्कार समितीचे ते संस्थापक संयोजक आहेत. अनेक सामाजिक प्रश्नावरही त्यांनी आंदोलनात सक्रीय भाग घेतलेला आहे. राहाता येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.एस. गायकवाड सर आणि शिक्षिका सौ. डी.डी. गायकवाड या शिक्षक दांम्पत्याचे ते सुपुत्र आहेत.
Post a Comment