मृत्यूनंतर देण्यात येणारी भोजन परंपरा खंडीत करुन मंदिराला सभांमडप देण्याचा चायल परिवाराचा निर्णय.
बेलापुर (प्रतिनिधी )- मनुष्याच्या मृत्यू नंतर करण्यात येणारी मृत्यू भोजन परंपरा खंडीत करुन गावातील सप्तशृंगी मातेच्या मंदिराचा संभा मंडप बांधुन देण्याचा निर्णय बेलापुरातील चायल परिवाराने घेतला असुन या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे बेलापुर येथील किराणा मर्चड असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश मदनलाल चायल यांचे कमी वयात निधन झाले ते सप्तशृंगी मंदिराचे अध्यक्ष होते या मंदिरापुढे सभा मंडप व्हावा अशी त्यांची ईच्छा होती त्या करीता त्यांची धडपड चालु होती परंतु दुर्दैवाने त्यांचे निधन झाले त्यांची राहीलेली ईच्छा पुर्ण करण्याचा निर्णय चायल परिवाराने घेतला तारुण्यात योगेशचा मृत्यू झाल्यामुळे चायल परिवाराने बाराव्याचे भोजन न देण्याचा निर्णय घेवुन सप्तशृंगी मंदिराचा सभामंडप बांधुन देण्याचा निर्णय घेतला आहे बदलत्या काळानुरुप व प्रसंगानुरुप बदलण्याचा निर्णय चायल परिवाराने घेतला आहे या सभा मंडपासाठी सव्वा ते दिड लाख रुपये खर्च येणार आहे या सभा मंडपाचे काम लवकरात लवकर पुर्ण करुन स्वर्गीय योगेश चायल यांच्या बाराव्याच्या दिवशी दिनांक ७ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता सभामंडपाचा लोकार्पण सोहळा करण्याचा निर्णय कैलास चायल व त्यांच्या परिवाराने घेतला आहे या निमित्ताने योगेश चायल यांच्या स्मृती चिरंतर जपण्याचा चायल परिविराचा एक छोटासा प्रयत्न आहे
Post a Comment