काल सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता हा व्यापारी नेहमीप्रमाणे आपले गोडाउन बंद करून हिशोबाच्या वह्या व रोख रक्कम देऊन दुचाकीवरुन घराकडे निघाला असता बेलापुर बायपास येथे त्यांची मोटरसायकल अडवून त्यांना एका चारचाकीत बळजबरीने कोंबून त्यांचे अपहरण केले.असावे अशी शक्यता आहे एका चार चाकी वाहनात एका व्यक्तीला नेत असताना काहींनी पाहीले आहे ती व्यक्ती सोडा सोडा असे म्हणून दरवाजाला लाथा मारत असल्याचेही काहींनी सांगितले असुन पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत तीच कार श्रीरामपुरच्या दिशेने गेली असल्याचे सी सी टि व्हीत ही आढळून येत आहे त्यामुळे या व्यापाऱ्याचे अपहरण झाले की काय अशी शंका सर्वांना येत आहे रात्रभर गावातील नेतेमंडळी सदर व्यापाऱ्याचे नातेवाईक पोलीस स्टेशनला ठाण मांडून होते व्यापाऱ्याचे अपहरण करून ही चार चाकी श्रीरामपूर च्या दिशेने निघून गेली. पोलिस तिचा शोध घेत आहेत.गौतम हिरण यांची मोटारसायकल श्रीरामपुर बेलापुर बायपासला लावलेली आढळली त्या गाडीला चावी तशीच होती शिवाय हीशोबाची कागदापत्रे असलेल्या वह्यांची पिशवीही गाडीलाच होती त्यामुळे पैशाकरीता तर या व्यापार्याचे अपहरण केले नसावे ना अशी शंका नातेवाईकांना येत आहे त्या दृष्टीने बेलापुरचे पोलीस तपास करत आहे.
बेलापूर येथील व्यापारी बेपत्ता अपहरणाची शक्यता ; तपास सुरू.
बेलापुर (प्रतिनिधी ): श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर येथील प्रसिद्ध व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण हे काल सोमवारी सायंकाळी सात वाजेपासुन अचानक बेपत्ता झाले. या व्यापाऱ्याचे अपहरण झाले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Post a Comment