बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ नागरीकांचा चांगला प्रतिसाद.
बेलापुर (प्रतिनिधी )- पुर्वीच्या सत्ताधार्यांनी चुकीच्या पध्दतीने कामे करुन गैरप्रकार केल्यामुळे जनतेने आपल्या हाती सत्ता दिली असुन आता आपली जबाबदारी वाढली आहे सर्वांना बरोबर घेवुन आपल्याला विकास कामे करुन गावाची वेगळी ओळख निर्माण करावयाची आहे असे मत जि प सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केले बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत आपल्या दारी या उपक्रमाचा शुभांरभ प्रभाग क्रमांक एक मधील मळहद येथुन करण्यात आला त्या वेळी नवले बोलत होते कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी रमेश वाबळे हे होते जि प सदस्य शरद नवले पुढे म्हणाले की मिळालेल्या सत्तेचा उपयोग रस्ते पाणी विज आरोग्य गटारी या व्यतीरीक्त अपंग निराधार विधवा परित्यक्त्या अशा गोर गरीबांची कामे आपल्याला करावयाची आहे सार्वजनिक कामा बरोबरच सर्व सामन्य नागरीकांच्या समस्या सोडवा लवकरच गावात एक कोटी रुपयाची विकास कामे सुरु करण्यात येणार आहे असेही नवले म्हणाले सरपंच महेंद्र साळवी म्हणाले की प्रभाग निहाय ग्रामपंचायत आपल्या दारी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला असुन आम्ही घरोघर जावुन नागरीकांच्या समस्या समजावुन त्या सोडविण्याचा प्रयत्न करु असे सरपंच साळवी म्हणाले उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या माझी वसुंधरा अभियानाची जनजागृती करण्यात येणार असुन प्रभाग निहाय स्पर्धा वृक्षारोपण निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा आदि उपक्रम राबविण्यात येतील या वेळी पत्रकार देविदास देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले या उपक्रमांतर्गत मळहद बोरुड गल्ली तकीया मोहल्ला केशवा गोविंदा गल्ली धनगर गल्ली कुंभार वेस येथील नागरीकांच्या घरोघर जावुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या केवळ समस्या जाणून त्यावर उपाय योजनाही केली जाणार असल्याचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले या वेळी प्रफुल्ल डावरे गोविंदराव खरमाळे तबसुम बागवान मुस्ताक शेख रमेश अमोलीक माधुरी ढवळे दिलीप दायमा रमेश वाबळे सजंय रासकर तसवर बागवान संजया गोरे मोहम्मंद शेख रमेश काळे अजिज शेख विशाल आंबेकर अमोल गाढेकिरण गागरे श्रीहरी बारहाते विक्रम नाईक रत्नेश गुलदगड हुसेन शेख अन्वर बागवान भरत जाधव निलेश वाबळे शरद म्हैस शफीक बागवान दादा कुताळ कासम बागवान श्रीकांत अमोलीक ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे सचिन वाघ सचिन नगरकर रविंद्र मेहेत्रे महेश कुर्हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक साहेबराव वाबळे यांनी केले तर रामदास वाबळे यांनी आभार मानले.
Post a Comment