Latest Post

बेलापुर  (देविदास देसाई  )-बेलापुर खूर्द येथील केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकाने रस्त्यावर सापडलेला नऊ कोटी रुपयाचा धनादेश बँकेला परत केला त्या शिक्षकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

या बाबत सविस्तर माहीती अशी की केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील शिक्षक जालींदर विटनोर हे शाळेच्या कामानिमित्त उच्च माध्यमिक मडंळ पुणे येथे गेले होते शाळेचे


कामकाज आटोपुन रस्त्याने पायी जात असताना त्यांच्या पायाने एक कागद उडाला तो कागद त्यांना चेक साराखा वाटला त्यामुळे त्यांनी तो उचलुन हातात घेतला तर तो खरोखरच चेक होता अन तो ही चक्क नऊ कोटी रुपयाचा १३ जानेवारी २०२१ रोजी दिलेला चेक हा बँक आँफ महाराष्ट्र शाखेतुन एल आय सी कार्यालयासाठी देण्यात आलेला होता त्यांनी ही घटना तातडीने विद्यालयाचे प्राचार्य सोपान मगर व आपले नाशिक येथील नातेवाईक डाँ नवनाथ तमनर यांना कळविली दोघांनीही तो चेक  महाराष्ट्र बँकेच्या शाखेत नेवुन देण्याचा सल्ला दिला तो चेक घेवुन विटनोर हे महाराष्ट्र बँकेच्या शिवाजी नगर येथील शाखेत गेले तेथे गेल्यावर बँकेचे शाखाधिकारी कुलकर्णी यांना या बाबत माहीती देताच त्यांना फार आंनद झाला त्यांनी तातडीने सर्व स्टाफची बैठक बोलविली बैठकीत जालींदर विटनोर यांनी बँकेचे महाप्रबंधक सी एन कुलकर्णी व शाखाधिकारी पी एच पारख यांच्याकडे तो सापडलेला नऊ कोटी रुपयाचा धनादेश सुपूर्त केला सर्वांनी जालींदर विटनोर यांच्या प्रामाणिकपणा बद्दल टाळ्याच्या गजरात कौतुक करुन बँकेच्या वतीने विटनोर यांचा सत्कार करुन त्यांना गिफ्टही देण्यात आले या वेळी बँकेचे महाप्रबंधक सी एन कुलकर्णी म्हणाले की हा धनादेश बँक आँफ महाराष्ट्र एम्प्लाँइज पेंशन ट्रस्टच्या वतीने एल आय सी ला देण्यात आलेला होता पर रस्त्याने जाताना हा चेक गहाळ झाला होता विटनोर सरांनी प्रामाणिकपणे तो चेक आणुन दिला त्या बद्दल शाखेच्या वतीने त्यांचे कौतुक करतो असेही कुलकर्णी म्हणाले*

बेलापुर (प्रतिनिधी  )- सत्तेच्या धुंदीत मद मस्त झालेल्यांना आता घरचा रस्ता दाखवुन गावकरी मंडळाच्या सर्व सतरा सदस्यांना निवडून द्या त्यांच्याकडून दर्जेदार काम करुन घेण्याची जबाबदारी माझी आहे असे अवाहन गावकरी मंडळाचे नेते सुनील मुथा यांनी केले गावकरी मंडळाच्या वतीने आझाद मैदान येथे आयोजित प्रचार सांगता सभेत अध्यक्ष पदावरुन बोलाताना मुथा म्हणाले की एका विकास कामाला दहा वर्षातुन एकदाच निधी येतो त्यामुळे त्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे झाला पाहीजे सत्ताधार्यांनी गटारीची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची केली असुन गटारीतुन सांडपाणी वाहुनच जात नाही केवळ काम उरकायचे अन बिल काढायचे हाच एकमेव धंदा चालू असुन मतदानातुन या महाभागांना जाब विचारा चुकीच्या कामाचा जाब विचारण्याची जबाबदार आपलीच आहे मला त्याचे काय असा विचार जर सर्वांनी केला तर यांचे धंदे जोरात चालतील चुकीच्या कामांना अन चुकीच्या माणसांना पाठीशी घालु नका  हीच वेळ आहे नाही तर पाच वर्ष पश्चात्ताप करण्याची वेळ येईल गावात चाललेल्या चुकीच्या कामाबाबत मीच वेळोवेळी आवाज उठविला असेही मुथा म्हणाले तुमच्या बापाबरोबर मी काम केलेले आहे ते करताना अभिमान वाटायचा आज तुमचे काम पाहुन लाज वाटते पैसा वाटला की निवडून येता येते हा गैरसमज काढुन टाका सत्तेतुन पैसा कमवायचा पैशातुन गुंड गोळा करायचे ते ग्रामसभेत आणायचे अन बोलणाराला दमबाजी करायची ही यांची पध्दत आहे ग्रामपंचायतीकडे लाखो रुपयाचे भंगार पडलेले आहे ते एका व्यक्तीच्या घरात पडलेले आहे गावची ग्रामपंचायत म्हणजे आपली घरची मालमत्ता असल्यागत ही मंडळी वावारत आहे गावात वेगवेगळ्या टोळ्या तयार झालेल्या आहे आता त्यात  कर्मचाऱ्यांची टोळी देखील सामील झाली आहे आपल्या मर्जीने कर्मचारी भरले त्याचा बोजा आपल्यावर पडत आहे त्यामुळे आता जागे होवुन मतदान करा असे अवाहनही मुथा यांनी केले आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-गावकरी मंडळाने काढलेल्या प्रचार फेरीस नागरीकांनी मोठ्या उत्सहात प्रतिसाद दिला महीला पुरुष मोठ्या संख्येने या प्रचार मोहीमेत सहभागी झाले होते महीलासह सर्वांच्याच डोक्यात टोप्या घातलेल्या होत्या त्या टोप्यावर दोन्ही बाजुने गावाकरी मंडळाची निशाणी ट्रँक्टर रोडरोलर रिक्षाचे चिन्ह छापलेले होते बाजारा पेठेतील हनुमान मंदिरापासुन प्रचार फेरीस सुरुवात झाली प्रत्येक गल्ली गल्लीतुन जात उमेदवारांनी मतदारांना मत देण्याचे अवाहन केले  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन फेरीची सांगता झाली सायंकाळी आझाद मैदान येथे झालेल्या प्रचार साभेतही नागरीकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली प्रचार फेरीस मिळालेला प्रतिसाद पहाता व सभेची गर्दी पहाता या वेळेस गांवकरी मंडळ विजयी होईल असा दावा मंडळाच्या नेत्यांनी केला आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात बेलापुर परिसरात भरपुर विकास कामे केली असुन राहीलेली कामे पुर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा जनता विकास अघाडीच्या सर्व सतरा उमेदवारांना निवडणूक द्या असे अवाहन जनता विकास अघाडीचे नेते व वार्ड क्रमांक सहाचे उमेदवार सुधीर नवले यांनी केले आहे                  जनता विकास अघाडीच्या प्रचारार्थ रामगड गायकवाड वस्ती येथील आयोजित प्रचार सभेत बोलताना सुधीर नवले पुढे म्हणाले की रामगड येथे रस्ते गटारी मस्जिद व शाळेजवळ पेवींग ब्लाँक आदि कामे केली काही घराकुलाचा प्रश्न प्रलंबित आहे तो येत्या पाच वर्षाच्या काळात सोडविला जाईल रामगडला चोवीस तास वापरासाठी खारे पाणी उपलब्ध करुन दिलेले आहे विरोधक केवळ आमच्या नावाने बोंबा मारण्याचे काम करत आहे जि प चे पद असताना गावात केलेली कामे आगोदर सांगा मग आमच्यावर बोला आपल्या हातुन एकही ठोस असे विकासाचे काम झाले नाही त्यामुळै जनता आपल्याला मत देणार नाही आपला पराभव निश्चित आहे याची जाणीव झाल्याने दुसर्याला पुढे करुन खालच्या पातळीवर भाषा वापरण्याचे उद्योग या महाभागाने सुरु केले आहे शिवराळ भाषा वापरण्याचे बंद करा कायदेशीर सल्ला घेवुन त्या बाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे आम्ही पण त्या भाषेत बोलू शकतो परंतु आमचे ते संस्कार नाही विकास कामावर बोला असेही नवले म्हणाले या वेळी श्रीरामपुर नगरपालीकेचे नगरसेवक हाजी अंजुमभाई यांनी जनता विकास अघाडीच्या सर्व उमेदवारंना निवडून द्या विकासा कामे करवुन घेण्याची जबाबदारी आपली आहे या वेळी शेषराव पवार गोविंद वाबळे जनता अघाडीचे नेते रविंद्र खटोड पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक यांचीही भाषणे झाली.


बेलापुर (प्रतिनिधी  )--जिल्हा परिषदेत काम करत असताना जास्तीत जास्त निधी आणून गावाची विकास कामे केली तर विरोधकांनी बोगस कामे करुन शासनाच्या पैशावर डल्ला मारल्याचा आरोप जि प सदस्य शरद नवले यांनी केला आहे*   *सत्ताधारी मंडळींनी 10 वर्षात काय कारभार केला तो आपल्या समोर आहे, आणि मी  15 वर्षापुर्वी सरपंच असताना काय विकासाचे कामे झालीत तेही आपल्यासमोर आहेत. - तुमच्या आशिवार्दाने आणि माजी मंत्री.

आ. राधाकृष्ण विखे पाटील व माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या* *मार्गदर्शनाखाली गेल्या 10 वर्ष जिल्हा परिषदेत काम करत आहे. त्यांनी दिलेल्या संधीचा वापर मी गावाला भरीव विकास निधी मिळवून देण्यासाठी केला.तर सत्ताधां-यांनी मिळालेल्या निधीतून मलिदा खाण्याचे काम केले. दोन्ही उमेदवारांच्या पॅनलची तुलना करण्याची खरी गरज आहे. ' वित्त ' आयोगातून बेलापूर ग्रामपंचायतीला कोट्यावधीचा निधी मिळालेला असताना हा निधी गेला कुठे? मिळालेल्या निधीतून गावामधील कामे झालीत का ? हा निधी सत्ताधाऱ्यांनी लाटला

 असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले यांनी गावकरी मंडळाच्या उमेदवारांच्या कुऱ्हे वस्ती, राजवाडा येथील झालेल्या प्रचार सभेत बोलताना केले. - नवले पुढे म्हणाले की,  ग्रामपंचायत जशी बटाईने चालवण्यास घेतली होती सदस्य नसतानाही तिसरीच व्यक्ती सकाळ पासुन ग्रामपंचायत कार्यालयात ठाण मांडून बसायची.जे साधे सदस्य नाहीत ते जणू ग्रामपंचातीचे मालक बनले होते.ज्याचे केवळ 2 सदस्य निवडून आले होते, त्याने  आमच्याबरोबर  असणार्‍या इतरांना फोडाफोडीचे राजकारण केले. हा ठेकेदार ग्रामपंचायतीत निवडून आलेला नाही, त्यांचा काहिही संबध नाही, त्यांनी दीड ते दोन वर्षात १५ कोटीचा निधी हडप केला असल्याचा आरोप नवले यांनी केला आहे.-कामावर काहीच न बोलता फक्त लोकांची दिशाभूल करण्याची  सत्ताधाऱ्यांची सवय आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर सीसीटीव्ही कॅमेरे, असताना  सामानाची चोरी होते, तेथील चोरटे पकडणे आवश्यकता असताना  लबाडांनी कॅमेरेचे बंद करून ठेवले. जर तुम्ही चोरांच्या हातात चाव्या दिल्यात तर, हे भामटे आश्वासनावर आश्वासने दाखवतील, त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, १० वर्षाच्या कामाचा हिशोब मागा, मगच तुम्हाला कळेल, ' दाल में कुछ काला है '  या - टोळीचा नायनाट करायचा आहे.अश्या लोकांना निवडून देणार आहात,का ? आपल्या सुख : दुःखात मीच आहे, आता दोन अफवा येणार आहे. -प्रचार सभेत बोलताना अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे म्हणाले की,    सत्ताधाऱ्यांनी आपलं अपयश झाकण्यासाठी काय प्रयत्न करणार आहोत, तुम्हीच्या सारख्याच सगळ्यांच्या  आशिवार्दाने सहकाऱ्याने मला वयाच्या २६ व्या वर्षीच अशोक कारखान्यात संचालक म्हणून संधी मिळाली, सत्ताधाऱ्यांनी चुकीचे कामे होत असेल तर, त्यावर आम्ही विरोध दर्शविला अन् सक्षम विरोधाची भूमिका आम्ही बजावली,असल्याचा दावा अभिषेक खंडागळे यांनी केला  दादागिरी, दमबाजी, सत्ता व पैश्याची मस्ती असणार्‍याना या निवडणूकीत , धडा शिकवीला पाहीजे- बेलापूर गावात असणार्‍या शंभर वर्षापूर्वीचे चिंचेचे आणि पिंपळाचे झाड हकनाक तोडले,  गावात ४० फुट आकाराचा रस्ता आहेत का ? तो दाखवा त्यावर तुम्ही बोलण्याला तयार नाही, मग तुम्ही कुत्र्या - मांजरासारखे पळून जाता - इतक्या मोठ्या ग्रामपंचायतीला विकासकामांना निधी मिळत असताना कामे करण्याऐवजी फक्त खिसे भरण्यवयाचे गोरखधंदा सत्ताधाऱ्यांनी चालविला २५ हजार लोकसंख्या असलेल्या गावात विकासकामांचा अभाव असल्याचे पहायला मिळत असून कुठे नेऊन माझं बेलापूरगाव अशी म्हणायची वेळ ग्रामस्थांवर आली.

बेलापुर  (प्रतिनिधी )- आमच्या ताब्यात असलेल्या संस्थांच्या माध्यमातून गावातील समस्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणखी काही राहीलेली कामे पुर्ण करण्यासाठी जनता विकास अघाडीच्या सर्व मतदारांना निवडून द्या असे अवाहन जनता अघाडीचे नेते रविंद्र खटोड यांनी केले जनता विकास अघाडीच्या वतीने विविध भागात घेण्यात आलेल्या प्रचार  सभेत ते बोलत होते     आपल्या भाषणात जनता अघाडीचे नेते रविंद्र खटोड म्हणाले की पाच वर्षात गावात रस्ते गटारी स्ट्रिट लाईट स्वच्छता अशी अनेक कामे केली विरोधकांनी एकही काम न करता केवळ आरडा- ओरड अडथळा आणण्याचे काम केले सदस्यावर ग्रामसेवकावर कारवाई करण्यासाठी आपली ताकद पणाला लावली तीच ताकद गावाकरीता मोठा निधी आणण्यासाठी खर्च करा जनता तुम्हांला डोक्यावर घेईल पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसे निवडणूक आली की यांना जनतेची आठवण येते कोरोना काळात हेच बोंबा मारणारे कुठे दडून बसले होते यांना जनतेच्या नाही आपल्या जिवाची भिती होती म्हणून तर हे घरात दडून बसले होते त्यावेळेस गावातील लोकांच्या मदतीला आम्ही धावुन आहे ते आमचे कर्तव्ये  होते सकाळ पासुन सायंकाळ पर्यत आम्ही गावात ठाण मांडून होतो कुणाला काय लागते कुणाला उपचाराची गरज आहे हे आम्ही कोरोनाला न घाबरता करत होतो हे काम सार्या गावाने पाहीले आहे ते तुम्हाला कसे दिसणार कारण तुम्ही आपल्या कुटुंबा समवेत घरात सुखरुप होता त्यामुळे कोण कामाचा कोण बिन कामाचा हे मतदारांना सांगण्याची    गरज नाही सर्वांच्या सुख दुःखात आम्ही सहभागी होणारी माणसे आहेत आपल्या सारखी खोटे हसणारे तोंडावर गोड बोलणारे नाही आमच्या ताब्यात असणार्या संस्थेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न आम्ही सोडविले आपण काय केले याचे आत्मपरिक्षण करा असा मोलाचा सल्लाही खटोड यांनी दिला

बेलापुर (प्रतिनिधी )-आपल्या पुढील पिढीच्या भवितव्यासाठी गावात जे चुकीचे चालले आहे ते बंद पाडा संस्कृतीक परंपरा लाभलेल्या गावात आपल्या आया- बहीणींची इज्जत सुरक्षित ठेवायची असेल तर गावकरी मंडळाला विजयी करा चुकीच्या कामाबाबत आवाज उठवा नाहीतर भावी पिढी माफ करणार नाही असा खणखणीत इशारा गावकरी मंडळाचे नेते सुनिल मुथा यांनी दिला आहे  ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचारार्थ गावकरी मंडळाच्या गणपती गल्ली केशव गोविंद मंदिर चौक शिवनेरी गल्ली आयोध्या काँलनी रामगड गायकवाड वस्ती येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.आपल्या भाषणात गावकरी मंडळाचे नेते  सुनिल मुथा पुढे म्हणाले की जि प शरद नवले यांनी सत्ताधार्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा बुरखा फाडलाच आहे पंरतु आणखी बरेच काही कारनामे पुराव्यासह माझ्या हाती आले आहे त्यांनी तोंड उघडण्याची भाषा केली मग मी पण आता तोंड उघडाच मग माझ्याकडे असलेली जादुई पोटलीच उघडतो मग त्यातुन कुणाचे काय बाहेर येईल हे सांगता येत नाही ते जर जनते समोर आणले तर जनता तुमचे कपडे.काढल्याशिवाय राहणार नाही आपल्या इज्जतीच पंचनामा होईल म्हणून माझ्याकडे  मध्यस्थ पाठविले त्यामुळे मी पण ते टाळले नाही तर ... गावातील चुकीच्या कामावर बोट ठेवण्याची जबाबदारी आपली आहे ग्रामपंचायत कारभारावर नियंत्रण ठेवले नाही तर हे पुढारी गावही विकतील तेव्हा मतदारांनो जागृक व्हा प्रत्येक कामाची माहीती विचारा सत्ताधार्यावर अंकुश ठेवा हे काम माझ्या एकट्याचे नाही कारभारावर अंकुश नसेल तर सत्ताधारी मन मानेल तसे वागतात पण ते होवु देणार नाही गावकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जरी चुका केल्या तरी त्यांना देखील जाब विचारण्याची दाणत आपल्यात आहे अनेक ठिकाणी गटारी झाल्या पण केवळ बिले काढुन मोकळे झाले गटारीला ढाळच नसल्यामुळे सांडपाणी जागेवरच तुंबले आहे हे लोक मला सांगतात परंतु ते काम होतानाच आपण संबधीतंना जाब विचारला पाहीजे होता सगळे ठेकेदार एकत्र होवुन सत्ता मिळविण्यासाठी धडपड करत आहे पण या वेळेस जनता मतदार हुशार झालेला आहे तुमच्या काळ्या पिशव्या व आणखी काही घेवूनही मतदार गावकरी मंडळालाच विजयी करतील यात शंकाच नाही ज्यांनी गावची मुख्य बाजारपेठ भकास करण्याचे महापाप केले त्यांना पेठेत फिरकु देवु नका ग्रामपंचायतीचे भंगार विकणारे कोण अन बोंब झाल्यावर परत आणणारे कोण हे आता जनतेला समजले आहे गावात वाढत चाललेले आतिक्रमण हा फार गंभीर प्रश्न आहे पंरतु कार्यकर्ते दुखवायचे नाही म्हणून हे गप्प आहे पेठेतुन पायी चालणेही अवघड झाले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर भिंत बांधली अन एकानेही आवाज उठविला नाही गावकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता द्या मी स्वतः जावुन ती भिंत तोडेल माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल पण गावाच्या हितासाठी मी ते करेल असेही मुथा म्हणाले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget