Latest Post

बेलापुर (प्रतिनिधी  )-गावाच्या विकासासाठी गावकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता द्या गावकरी मंडळाच्या कारभारावर नियंत्रण ठेवुन  विकास कामे करुन घेण्याची जबाबदारी माझी आहे असे विधान गावकरी मंडळाचे नेते सुनिल मुथा यांनी केले गावकरी मंडळाच्या प्रचारार्थ खटोड काँलनी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते     आपल्या भाषणात मुथा पुढे म्हणाले की आपला स्वाभिमान गहान ठेवु नका आज पैशाच्या जोरावर तुमची मते विकत घेतली जातील परंतु पाच वर्षे तुम्ही विकास कामावर बोलुच शकणार नाही कुणी काम घेवुन गेले तर ते लगेच पैसे घेवुन मतदान केले हे म्हणतील त्यामुळे आपला मतदानाचा हक्क न घाबरता आपली

सदसद विवेक बुध्दी जागी ठेवुन मतदान करा समोरच्या पार्टीने काही दिले तरी ते घ्या पण मतदान गावकरी मंडळालाच करा या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी होणार असली तरी तो पैसा सत्तेतुनच मिळविलेला आहे तो गावाचा म्हणजे आपलाच पैसा आहे पैसा त्यांचा घ्या पण मतदान गावकरी मंडळाला करा मी आजपर्यत गावाच्या विकासासाठी भाडणे करत आलेलो आहे हे सर्वांनी पाहीले आहे मग ते अतिक्रमण असो रस्त्याचे काम असो की भंगार चोरीचे प्रकरण असो चुकणाराला जाब विचारण्याची आपल्यात दानत आहे दहा वर्ष सत्ता भोगली म्हणून काहींना वाटत असेल की आम्ही गावचे मालक झालो तर तो समज काढुन टाका कै मुरलीशेठ खटोड यांनी २२ वर्ष गाव गाडा हाकला पण कुणाची त्यांच्या कारभारावर बोट ठेवण्याची ताकद झाली नाही अन आज काय चालले आहे हे सर्व आपल्या समोर आहे या भागातील फार वर्षापासुनचा प्रलंबीत असलेला गटारीचा प्रश्न तातडीने सोडविला जाईल या बाबत संबधीत सोमाणी कुटुंबीयांशी चर्चा झालेली आहे अन मार्गही निघालेला आहे त्यामुळे गावकरी मंडळाचे सर्व उमेदवार तरुण तडफदार असुन ते निश्चितच गावचा चेहरा मोहरा बदलुन टाकतील असेही मुथा म्हणाले.

बेलापुर (प्रतिनिधी  )- - लाॅकडाऊन काळात मयत व अपंग माणसांच्या नावावर खोटे चेक काढुन आपले उखळ पांढरे केले  बगलबच्यांना सांभाळले अशा नतद्रष्ट लोकाना जनता त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार  नाही असे उदगार जि प सदस्य शदर नवले यांनी काढले  सर्वसामान्य लोकांना कुठेही मदत दिली गेली नाही , खरे लाभार्थी लाभापासुन वंचित राहीले  त्यांना मदत केली नाही,  अश्या लोकांना तुम्ही निवडून देणार आहात का? सभा  पार पडल्यावर मतदारांना फोन केले जातात   तुम्ही सभेत का गेलात ? अशी दमबाजी सत्ताधाऱ्यांकडून केली जाईल, तुम्ही मिटींगला का गेले व का बोलले ?  तुम्हाला धमकावले जाईल घाबरू नका मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील  आता या  गावगुंडांची दादागिरी मोडून काढण्याची वेळ तुमच्यावर आली.

          *असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी गावकरी मंडळाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना केले*.


      - *सभेत बोलताना नवले पुढे म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या जागेत बचत गट भवन बांधण्याचा मानस आहे, बचत गटांना  चालना देण्यासाठी मोठे मार्केट उभे करण्यासाठी त्यांची जबाबदारी आमच्या सारख्यावर राहणार असल्याने ती आपण पुर्ण करू, अशी ग्वाही नवले दिली.*


       *आपल्या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचा निर्धार नवले यांनी केला आहे*. 


         *आलीबाबा चाळीस जणांची टोळी गावात आता  एकएका मतांसाठी वणवण फिरत आहे.  दहा वर्षात काय दिवे लावले हे जनता आता विचारत इहे हीच सुज्ञ जनता इतकी दुधखुळी नाही, गावाला यापुढील काळात नवीन वळण लावावा लागणार आहे. यांचीही बोगसगिरी जनता खपवून घेणार नाही* 

    -  *असेही नवले म्हणाले* 


   -  *सभेत बोलताना अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे म्हणाले की*, 

   *खार्‍या पिण्याच्या पाण्यामुळे माता -भगिनी आजारी पडत आहे. आपले जेष्ठ नागरिक आजारी पडत असल्याने आपल्या गावामध्ये व आपल्या भागात मोठ्या आरोग्याच्या समस्या उभ्या  आहेत पाणी पुरवठ्यावर कुणाचेही नियंत्रण नाही   पाणी पुरवठ्याला कुठेही टायमिंग नाहीच,बडी मंडळी दररोज आर ओचे फिल्टर पाणी पित आहे पण सर्वसामान्याचे काय त्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार  असा सवाल अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे* 

*चाँदनगर येथे झालेल्या गावकरी मंडळाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बैठकीत केला*. 


      *खंडागळे म्हणाले की, गेल्या 10 वर्षेच्या कालखंडात विकास कामांमध्ये  फार मोठा भ्रष्टाचार* *झालेला आहे.  विकास कामे*

*करत असतानाच मलई खायची हा मोठा उद्योग गेल्या 10 वर्षेच्या कालखंडात सत्ताधाऱ्यांनी केला असल्याचा आरोप खडांगळे यांनी केला*


बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर खूर्द येथे शिक्षणासाठी बाहेरगावहुन आलेल्या शाळकरी मुलीचा विनयभंग करण्यात आला असुन विनयभंग करणारास नागरीकांनी बेदम चोप देवुन बेलापुर पोलीसाच्या हवाली केले       या बाबत समजलेली हकीकत अशी की बाहेरगावहुन शिक्षणासाठी येणार्या एका मुलीची देवळाली प्रवरा येथील मुलाने छेड काढली मुलीने हा प्रकार काही सामाजिक कार्येकर्त्यांना सांगीतला त्यांनी त्या मुलास शोधुन जाब विचारला तसेच चांगला धडाही शिकविला त्यानंतर नागरीकांनी त्यास बेलापुर पोलीस स्टेशनला आणले तेथे मुलीच्या घरच्यांनी तक्रार न दिल्यामुळे  विषय तेथेच संपला बेलापुर खूर्द व बेलापुर बु!!येथे बाहेरगावहुन मुली शिक्षणासाठी येत असतात काही मुली बसने येतात तर काही मुली सायकलने येतात टारगट मुले नेहामी मुलीच्या जाण्या येण्याच्या मार्गावर उभे राहुन मुलींना टाँंटीग करतात छेडछाड करतात चांगल्या घराच्या मुली तक्रार करत नाही अन टारगट मुलांचा वेगळाच गैरसमज होतो त्यातुनच असे प्रकार होतात  अश टारगटांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालकाकडून केली जात आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी )- ज्यांनी सत्ता आल्यावर मदमस्त होवुन काम केले गोरगरीबांना ग्रामपंचायत कार्यालयातुन हाकलुन दिले आता वेळ आली आहे यांनाही सत्तेतुन घरी बसवा अन भ्रष्टाचारी प्रवृत्ती जागेवरच ठेचा असे अवाहन जि प सदस्य शरद नवले यांनी केले गावकरी मंडळाच्या वतीने ठिकठिकाणी सभा घेण्यात आल्या  होत्या त्यावेळी नवाले बोलत होते त्यांनी वेगवेगळ्या भागात काँर्नर सभा घेवुन मतदारांना सात्ताधार्यांनी केलेल्या कारनाम्याचा पाढाच वाचला जि प सदस्य शरद नवले पुढे म्हणाले की मला या गावाने भरभरून प्रेम दिले मोठे केले त्या गावाची सेवा करण्यासाठी मी आपल्यासमोर गावकरी मंडळाचे उमेदवार घेवुन

आलो आहे दहा वर्षात सत्ताधार्यांनी बोगस कामे करुन पैसा लाटला ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोग १५ व्या वित्त आयोग दलीत वस्ती करीता साडेतीन कोटी रुपये खर्च झाले पण कामे कुठेच दिसली नाही मग हा निधी नेमका गेला कोठे याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे सत्तेच्या माध्यमातून पैसे कमावून मदमस्त झालेल्यांना धड शिकवा गावातील जनता आज यांच्या दहशती खाली वावरत आहे मात्र गुप्त मतदानातुन जनता सत्ताधार्यांची धुंदी उतरल्याशिवाय राहाणार नाही मी कधीही खोटी अश्वासने दिली नाही अन देणारही नाही आपण मला मोठे केले पण मी शेवट पर्यत जमिनीवरच राहील गोरगरीबांची सेवा करेल आज गावात सर्व सामान्य माणसाला घरकुलासाठी एक गुंठा जागा मिळत नाही अन गावातील या दोघा पार्टनरच्या जमीनी वाढत आहे आमच्या ताब्यात सत्ता द्या कुणावरही अन्याय होवु देणार नाही सर्व कामामधे पारदर्शकता आणू कुणाचे फलकावर नाव लावण्यासाठी मी काम करणार नाही त्यामुळे गावकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता द्या गावाचा कायापालट करुन दाखवितो असेही जि प सदस्य शरद नवले म्हणाले.


बेलापूरः(प्रतिनिधी  )-आमची पायरी ओळखण्या आधी आपण कोणत्या पायरीवर उभे आहात हे ओळखा.हिंमत असेल तर   तोंड उघडून दाखवावेच.योग्य वेळी  तुम्ही केलेल्या कारन्यामांचा जाहिर पंचनामा करणारच आहोत.तसेच अंधारातले काळे कारनामे उजेडात आणणारच आहोत.असे सडेतोड उत्तर गावकरी मंडळाच्या वतीने प्रसिद्धीस  दिले आहे 

 गावाकरी मंडळाच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की  जशास तसे उत्तर देण्याची  भाषा वापरुन आपले हसे करुन घेवू नये.

हिंमत असेल तर .रविन्द्र खटोड यांनी आमच्याविरुध्द तोंड उघडूनच दाखवावे  कोण आव आणतं आणि कोण काय नाटकं करतो याची आम्हाला इत्तंभूत माहिती आहे.आमच्या धंद्याच्या उचापती करणारांनी आपल्याखाली काय जळतंय ते बघावे.आमच्या नादी लागून उगाच इज्जतीचा पंचनामा करुन घेवू नये.जशास तसे उत्तराची भाषा करणा-या .खटोड यांनी आपल्याला भिडण्याची  हिंमत दाखवावी  म्हणजे कोणात किती दम आहे हे कळेल.आमचे बावन पत्ते ओपन आहेत.आमचे काय धंदे आहेत हे जग जाहिर आहे.आपण कधी लपून छपून धंदे वा उद्योग करीत नाही.

 भेकडासारखे उद्योग करुन गच्चीवरुन  पळून जाण्या सारख्या घटनांमुळे  कार्यकर्त्याचे प्रपंच उध्वस्त होण्याची वेळ येते हे सगळ्या गावाने अनुभवले आहे.कार्यकत्यांना कामापुरते मामा बनवायचे आणि नंतर वा-यावर सोडून द्यायचे हे आता ध्यानात येवू लागले आहे.  शनीच्या अवकृपेमुळेच आपल्यावर गाव सोडण्याची वेळ आली हे विसरू नये .तसेच बापजाद्यांच्या पुण्याईवर किती दिवस जगणार, आधी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करा आणि आपली पायरी ओळखून बोला.दुसर्यावर बिनबुडाचे आरोप करुन स्वतःचा बचाव करु नये.आम्हाला बदनाम करुन स्वतःच्या बदनामीवर पांघरुण घालू नये.आमचेवर वायफट आरोप केले आणि दमबाजीची भाषा वापरली तर जशास तसेची भाषा वापरणारांना  पळता भुई थोडी होईल असा इशारा  दिला आहे.

          जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले म्हणाले की विरोधक आडवे येतात हि सबब सांगून किती दिवस जनतेपासून पळणार.आपण सरपंच असताना गावात काय विकास कामे केली होती हे जनता विसरलेली नाही.त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण विकास कामांना किती निधी मिळवून दिला याचाही तपशील आपण देणार आहोत.दरवेळी विरोधक  अडवणूक करतात अशी सबब सांगून आपले नाकर्तेपणावर पांघरुण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न  करु नये.गेल्या दहा वर्षात काय काय घडले आहे हे जनतेला पूरते ठाऊक आहे.त्यामुळे स्पर्धा करायची तर चांगल्या  कामांची करा.उगाच खोटेनाटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करु नये अन आता जनताही सुज्ञ झालेली आहे .येत्या निवडणूकीत जनता  दहा वर्षातील कामगिरीचे आॕडीट करुन सत्ताधां-यांचा हिशोब चुकता करील असा विश्वास श्री.नवले यांनी व्यक्त केला.


शेवगाव (प्रतिनिधी  )- शेवगाव तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक पवनसिंग बिघोत याने आपल्यावर असलेल्या गुन्ह्याची माहीती दडवुन शासन सेवेतील सचोटी व कर्तव्य परायणता राखली नसल्यामुळे तात्पुरती पद नियुक्ती समाप्त करत असल्याचा आदेश राधाकृष्ण गमे विभागीय आयुक्त नाशिक यांनी दिला आहे   शेवगाव येथील प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षक पवनसिंग बिघोत यांनी बोगस चारित्र्य पडताळणीची कागदपत्रे जोडून शासकीय नोकरी मिळवीली असुन त्याचेवर कायदेशीर कारवाई करुन सेवेतुन बडतर्फ करावे अशी मागणी संकेत कळकुंबे मिनाताई कळकुंबे यांनी केली होती पवनसिंग बिघोत हा पुरवठा निरीक्षक पदावर रुजु होण्यापूर्वी १७ सप्टेंबर २०१६ रोजी त्याचेवर सिडको पोलीसा स्टेशन औरंगाबाद येथे पोलीस तोतयागीरीचा गुन्हा दाखल झालेला होता या व्यक्तीस सेवेतुन बडतर्फ करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली होती या बाबत वरिष्ठ पातळीवर निवेदनेही देण्यात आली होती तरी देखील संबधीत व्यक्तीवर कारवाई न झाल्यामुळे संकेत कळकुंबे व मिनाताई कळकुंबे यांनी अहमदनगर येथील तहसील कार्यालयापुढे उपोषण सुरु केले त्यांच्या उपोषणासा जय भगवान महासंघ व रिपब्लीकन पार्टी गवई गटाने पाठींबा दिला होता या उपोषणाची वरिष्ठ पातळीवरुन तातडीने दखल घेण्यात आली या तक्रारी वरुन बिघोत याची चौकशी करणे कामी समिती गठीत करण्यात आली  बिघोत यांची नेमणूक करताना अट क्रमांक ३२ नुसार पोलीस तापासणीची कार्यवाही ही आक्षेपार्ह असल्यास व नियुक्ती दिली असल्यास कोणतीही पूर्व सुचना न देता सेवेतुन काढुन टाकण्यात येईल असे स्पष्ट नमुद करण्यात आले होते समितीने दिलेल्या अहवालात पी आर बिघोत विरोधात गुन्हा न्यायप्रविष्ट असला तरी  गुन्ह्याची माहीती शासन सेवेत रुजु होते वेळी उघड न करता लपवुन ठेवलेने कारवाईस पात्र असल्याचे सर्व सदस्यानी नमुद केले आहे  त्यामुळे पी आर बिघोत यांचे पुरवठा निरीक्षक पदावरील पदस्थापना संदर्भात जाहीरातीतील अट क्रमांक ३२ तसेच ईकडील नियुक्ती आदेश१८-२-२०१९ मधील अटी व शर्तीचा भंग केला त्यामुळे पी आर बिघोत यांची तात्पुरती पदसेवा समाप्त करण्यात येत असल्याचा आदेश राधाकृष्ण गमे विभागीय आयुक्त नाशिक यांनी दिला आहे.

श्रीरामपुर (प्रतिनिधी  )-राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने शंभर टक्के आधार सिडीग व मोबाईल क्रमांक सिड करण्याच्या सुचना दिल्या असुन तालुक्यातील दुकानदारांनी वेळेत हे काम पुर्ण करावे तसेच नागरीकांनीही सहकार्य करावे आसे अवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात तहसीलदार पाटील यांनी पुढे म्हटले आहे की  राष्ट्रीय अनसुरक्षा योजना व अंत्योदय अन्नयोजनेचे श्रीरामपूर तालुक्यात एकुण  1 लाख 78 हजार 232 इतके लाभार्थी असून 1लाख 41 हजार 695 (79.50%) इतक्या लाभार्थ्यांचे आधार सिडींग झालेले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी विशेष

मोहिम राबवून लाभार्थ्यांचे आधार,मोबाईल सिडींग सुधारणे आवश्यक आहे.

याकरीता रास्तभाव दुकानांतील ई-पॉस

उपकरणांमधील ekyc  व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे.याकरिता 31जानेवारी 2021 पूर्वी प्रत्येक रेशनकार्ड मधील लाभार्थ्यांचे 100 टक्के

आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्याच्या उद्दिष्टाने श्रीरामपूर  तालुक्यात सर्व स्वस्त धान्य दुकानात हा कार्यक्रम  राबविण्यात येत आहे.त्याअनुषंगाने धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाद्वारे रास्तभाव दुकानदार यांच्यामार्फत शिधापत्रिकेतील

लाभार्थ्यांच्या आधार व मोबाईल क्रमांकाचे सिडींग करण्यात येणार आहे. 31 जानेवारी 2021 पूर्वी या लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल क्रमांक सिडींग करण्याचे अधिकार  सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना देण्यात आले आहेत.ekyc  पडताळणी व मोबाईल सिडींग सुविधा प्रत्येक रास्तभाव धान्य दुकानात आहेत.रेशनकार्डमध्ये नोंद असलेल्या कुटुंबातील

सर्व सदस्यांचे आधारकार्ड घेऊन संबंधित रास्तभाव धान्य दुकानात जावुन ekyc पडताळणी पूर्ण करुन घ्यावी. याकरिता

संबंधित लाभार्थी यांनी वैयक्तिकरित्या दुकानात जाऊन आधारकार्ड व अंगठ्याचा ठसा pos  मशिनवर द्यावयाचा आहे.

ekyc  करताना कुंटुंबातील किमान एका सदस्याचा चालू मोबाईल क्रमांक देणे

आवश्यक आहे.  ekyc 31 जानेवारी 2021पर्यंत करुन घेणे बंधनकारक असून 31

जानेवारी 2021 पर्यंत आधारसिडींग न झालेस सदर लाभार्थ्यांना अनुज्ञेय धान्य पुढील महिन्यापासून निलंबित करण्यात

येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.राष्ट्रीय अन्नसुरक्षा

योजना व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार सिडींग 100 टक्के पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार 31 जानेवारी 2021 पूर्वी प्रत्येक रेशनकार्डमधील

लाभार्थ्यांचे 100 टक्के आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्याच्या उद्दीष्टाने श्रीरामपूर तालुक्यात मोहिम राबविण्यात येत आहे. रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक करावे, असे आवाहन श्री. प्रशांत पाटील, तहसीलदार श्रीरामपूर 

यांनी  केले आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget