बेलापुर (प्रतिनिधी )- बेलापुर खूर्द येथे शिक्षणासाठी बाहेरगावहुन आलेल्या शाळकरी मुलीचा विनयभंग करण्यात आला असुन विनयभंग करणारास नागरीकांनी बेदम चोप देवुन बेलापुर पोलीसाच्या हवाली केले या बाबत समजलेली हकीकत अशी की बाहेरगावहुन शिक्षणासाठी येणार्या एका मुलीची देवळाली प्रवरा येथील मुलाने छेड काढली मुलीने हा प्रकार काही सामाजिक कार्येकर्त्यांना सांगीतला त्यांनी त्या मुलास शोधुन जाब विचारला तसेच चांगला धडाही शिकविला त्यानंतर नागरीकांनी त्यास बेलापुर पोलीस स्टेशनला आणले तेथे मुलीच्या घरच्यांनी तक्रार न दिल्यामुळे विषय तेथेच संपला बेलापुर खूर्द व बेलापुर बु!!येथे बाहेरगावहुन मुली शिक्षणासाठी येत असतात काही मुली बसने येतात तर काही मुली सायकलने येतात टारगट मुले नेहामी मुलीच्या जाण्या येण्याच्या मार्गावर उभे राहुन मुलींना टाँंटीग करतात छेडछाड करतात चांगल्या घराच्या मुली तक्रार करत नाही अन टारगट मुलांचा वेगळाच गैरसमज होतो त्यातुनच असे प्रकार होतात अश टारगटांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालकाकडून केली जात आहे.
Post a Comment