बेलापुर (प्रतिनिधी )- ज्यांनी सत्ता आल्यावर मदमस्त होवुन काम केले गोरगरीबांना ग्रामपंचायत कार्यालयातुन हाकलुन दिले आता वेळ आली आहे यांनाही सत्तेतुन घरी बसवा अन भ्रष्टाचारी प्रवृत्ती जागेवरच ठेचा असे अवाहन जि प सदस्य शरद नवले यांनी केले गावकरी मंडळाच्या वतीने ठिकठिकाणी सभा घेण्यात आल्या होत्या त्यावेळी नवाले बोलत होते त्यांनी वेगवेगळ्या भागात काँर्नर सभा घेवुन मतदारांना सात्ताधार्यांनी केलेल्या कारनाम्याचा पाढाच वाचला जि प सदस्य शरद नवले पुढे म्हणाले की मला या गावाने भरभरून प्रेम दिले मोठे केले त्या गावाची सेवा करण्यासाठी मी आपल्यासमोर गावकरी मंडळाचे उमेदवार घेवुन
आलो आहे दहा वर्षात सत्ताधार्यांनी बोगस कामे करुन पैसा लाटला ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोग १५ व्या वित्त आयोग दलीत वस्ती करीता साडेतीन कोटी रुपये खर्च झाले पण कामे कुठेच दिसली नाही मग हा निधी नेमका गेला कोठे याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे सत्तेच्या माध्यमातून पैसे कमावून मदमस्त झालेल्यांना धड शिकवा गावातील जनता आज यांच्या दहशती खाली वावरत आहे मात्र गुप्त मतदानातुन जनता सत्ताधार्यांची धुंदी उतरल्याशिवाय राहाणार नाही मी कधीही खोटी अश्वासने दिली नाही अन देणारही नाही आपण मला मोठे केले पण मी शेवट पर्यत जमिनीवरच राहील गोरगरीबांची सेवा करेल आज गावात सर्व सामान्य माणसाला घरकुलासाठी एक गुंठा जागा मिळत नाही अन गावातील या दोघा पार्टनरच्या जमीनी वाढत आहे आमच्या ताब्यात सत्ता द्या कुणावरही अन्याय होवु देणार नाही सर्व कामामधे पारदर्शकता आणू कुणाचे फलकावर नाव लावण्यासाठी मी काम करणार नाही त्यामुळे गावकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता द्या गावाचा कायापालट करुन दाखवितो असेही जि प सदस्य शरद नवले म्हणाले.
Post a Comment