शेवगाव (प्रतिनिधी )- शेवगाव तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक पवनसिंग बिघोत याने आपल्यावर असलेल्या गुन्ह्याची माहीती दडवुन शासन सेवेतील सचोटी व कर्तव्य परायणता राखली नसल्यामुळे तात्पुरती पद नियुक्ती समाप्त करत असल्याचा आदेश राधाकृष्ण गमे विभागीय आयुक्त नाशिक यांनी दिला आहे शेवगाव येथील प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षक पवनसिंग बिघोत यांनी बोगस चारित्र्य पडताळणीची कागदपत्रे जोडून शासकीय नोकरी मिळवीली असुन त्याचेवर कायदेशीर कारवाई करुन सेवेतुन बडतर्फ करावे अशी मागणी संकेत कळकुंबे मिनाताई कळकुंबे यांनी केली होती पवनसिंग बिघोत हा पुरवठा निरीक्षक पदावर रुजु होण्यापूर्वी १७ सप्टेंबर २०१६ रोजी त्याचेवर सिडको पोलीसा स्टेशन औरंगाबाद येथे पोलीस तोतयागीरीचा गुन्हा दाखल झालेला होता या व्यक्तीस सेवेतुन बडतर्फ करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली होती या बाबत वरिष्ठ पातळीवर निवेदनेही देण्यात आली होती तरी देखील संबधीत व्यक्तीवर कारवाई न झाल्यामुळे संकेत कळकुंबे व मिनाताई कळकुंबे यांनी अहमदनगर येथील तहसील कार्यालयापुढे उपोषण सुरु केले त्यांच्या उपोषणासा जय भगवान महासंघ व रिपब्लीकन पार्टी गवई गटाने पाठींबा दिला होता या उपोषणाची वरिष्ठ पातळीवरुन तातडीने दखल घेण्यात आली या तक्रारी वरुन बिघोत याची चौकशी करणे कामी समिती गठीत करण्यात आली बिघोत यांची नेमणूक करताना अट क्रमांक ३२ नुसार पोलीस तापासणीची कार्यवाही ही आक्षेपार्ह असल्यास व नियुक्ती दिली असल्यास कोणतीही पूर्व सुचना न देता सेवेतुन काढुन टाकण्यात येईल असे स्पष्ट नमुद करण्यात आले होते समितीने दिलेल्या अहवालात पी आर बिघोत विरोधात गुन्हा न्यायप्रविष्ट असला तरी गुन्ह्याची माहीती शासन सेवेत रुजु होते वेळी उघड न करता लपवुन ठेवलेने कारवाईस पात्र असल्याचे सर्व सदस्यानी नमुद केले आहे त्यामुळे पी आर बिघोत यांचे पुरवठा निरीक्षक पदावरील पदस्थापना संदर्भात जाहीरातीतील अट क्रमांक ३२ तसेच ईकडील नियुक्ती आदेश१८-२-२०१९ मधील अटी व शर्तीचा भंग केला त्यामुळे पी आर बिघोत यांची तात्पुरती पदसेवा समाप्त करण्यात येत असल्याचा आदेश राधाकृष्ण गमे विभागीय आयुक्त नाशिक यांनी दिला आहे.
Post a Comment