मोहिम राबवून लाभार्थ्यांचे आधार,मोबाईल सिडींग सुधारणे आवश्यक आहे.
याकरीता रास्तभाव दुकानांतील ई-पॉस
उपकरणांमधील ekyc व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे.याकरिता 31जानेवारी 2021 पूर्वी प्रत्येक रेशनकार्ड मधील लाभार्थ्यांचे 100 टक्के
आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्याच्या उद्दिष्टाने श्रीरामपूर तालुक्यात सर्व स्वस्त धान्य दुकानात हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.त्याअनुषंगाने धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाद्वारे रास्तभाव दुकानदार यांच्यामार्फत शिधापत्रिकेतील
लाभार्थ्यांच्या आधार व मोबाईल क्रमांकाचे सिडींग करण्यात येणार आहे. 31 जानेवारी 2021 पूर्वी या लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल क्रमांक सिडींग करण्याचे अधिकार सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना देण्यात आले आहेत.ekyc पडताळणी व मोबाईल सिडींग सुविधा प्रत्येक रास्तभाव धान्य दुकानात आहेत.रेशनकार्डमध्ये नोंद असलेल्या कुटुंबातील
सर्व सदस्यांचे आधारकार्ड घेऊन संबंधित रास्तभाव धान्य दुकानात जावुन ekyc पडताळणी पूर्ण करुन घ्यावी. याकरिता
संबंधित लाभार्थी यांनी वैयक्तिकरित्या दुकानात जाऊन आधारकार्ड व अंगठ्याचा ठसा pos मशिनवर द्यावयाचा आहे.
ekyc करताना कुंटुंबातील किमान एका सदस्याचा चालू मोबाईल क्रमांक देणे
आवश्यक आहे. ekyc 31 जानेवारी 2021पर्यंत करुन घेणे बंधनकारक असून 31
जानेवारी 2021 पर्यंत आधारसिडींग न झालेस सदर लाभार्थ्यांना अनुज्ञेय धान्य पुढील महिन्यापासून निलंबित करण्यात
येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.राष्ट्रीय अन्नसुरक्षा
योजना व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार सिडींग 100 टक्के पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार 31 जानेवारी 2021 पूर्वी प्रत्येक रेशनकार्डमधील
लाभार्थ्यांचे 100 टक्के आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्याच्या उद्दीष्टाने श्रीरामपूर तालुक्यात मोहिम राबविण्यात येत आहे. रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक करावे, असे आवाहन श्री. प्रशांत पाटील, तहसीलदार श्रीरामपूर
यांनी केले आहे.
Post a Comment