युवक बिरादरी स्पर्धेत नाऊरच्या विशाल देसाईने मिळविला प्रखर वक्ता बहुमान।
श्रीरामपुर (प्रतिनिधी )- अभिरुप युवा संसद यांच्या वतीने आयोजीत युवक बिरादरी स्पर्धेत श्रीरामपुर येथील चंद्ररुप डाकले काँलेजने दुसरा क्रमांक मिळविला असुन या काँलेजचा विद्यार्थी विशाल नवनाथ देसाई याने प्रखर वक्ता हा बहुमान मिळविला आहे एम आय टी काँलेज पुणे येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातुन स्पर्धक आलेले होते या स्पर्धेत पहीला क्रमांक मुंबईच्या टिमने मिळविला द्वितीय क्रमांक श्रीरामपुर येथील सी डी जे काँलेजने मिळविला सी डी जे काँलेज मधील विद्यार्थी विशाल नवनाथ देसाई याची प्रखर वक्ता (संसद पटु )म्हणून निवड झाली आहे दिनांक १२ जानेवारी रोजी मुंबई येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे महाराष्ट्रातुन एकुण ३८ स्पर्धकांची निवड करण्यात आली असुन त्यातुन प्रखर वक्ता निवडण्यात येणार आहे विशाल देसाई यास नाऊर येथील रविंद्र देसाई सी डी जे काँलेजचे घोडके सर पुणे येथील इंगोने सर याचे मार्गदर्शन लाभले विशाल देसाई यांच्या यशाबद्दल जेष्ठ साहित्यिक नामदेवराव देसाई पत्रकार देविदास देसाई पत्रकार संदीप जगताप प्रगत प्राथमिक सोसायटी नाऊरचे चेअरमन माणीक देसाई प्रताप देसाई आदिंनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment