बेलापुर (प्रतिनिधी )-कार्यकर्त्यांना दमबाजी करण्याची भाषा बंद करा अन कोण नालायक कुणाचे काय धंदे आहे हे सार्या गावाला ठाऊक आहे त्यामुळे आमच्या नादी लागाल तर जशास तसे उत्तर देवु असे अवाहन जनता विकास अघाडीचे रविंद्र खटोड यांनी दिले आहे जनता विकास अघाडीच्या प्रचाराचा शुभारभ श्री हरिहर केशव गोविंद मदिर येथे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदेव वाबळे हे होते रविंद्र खटोड पुढे म्हणाले की सुस्कृंत असल्याचा आव आणू नका कोण लायक कोण नालायक ही जनता ठरवेल आपली पायरी ओळखुन बोला आमची जिभ घसरली तर बरेच काही बाहेर येईल अन किती दिवस एकच कँसेट जनतेसमोर घासणार आम्ही शनि देवाचे भक्त आहोत हे सांगण्याची कुणाला गरज नाही आमचे तोंड उघडण्यास भाग पाडू नका नाही तर बरेच काही बाहेर येईल असेही खटोड म्हणाले बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले म्हणाले की गावात गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली परंतु विरोधकांनी केवळ दबाव तंत्राचा वापर करुन त्रास देण्याचे काम केले बेलापुर ग्रामपंचायतीची २७ वेळा चौकशी केली परंतु एक रुपयाचाही भ्रष्टाचार आढळला नाही जि प सदस्य असताना आपण काय दिवे लावले केवळ लोकांची उणे-दुणे काढण्याचेच काम केले प्रत्येक कामात अडथळा आणला गावाच्या पाणी पुरवठ्याची सर्वात मोठी चार कोटी १७ लाख रुपयाची पाणी पुरवठा योजना काही काळ रखडली होती आता त्या कामाला पुन्हा गती येणार आहे त्या करीता जनता विकास अघाडीच्या सर्व १७ उमेदवारांना निवडणूक द्या असे अवाहन नवले यांनी केले आपल्या भाषणात बोलताना भरत साळुंके म्हणाले की काळजी करु नका सर्वांचा हिशोब चुकता करु या अघाडीच्या माध्यमातून जुन्या नव्यांचा मेळ घालुन सर्वा जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला मुस्लिम कब्रस्थानचा प्रश्न सोडविला दहावा घाटाचा प्रश्न मार्गी लावला त्यातही विरोधकांनी अडथळे आणले ग्रामपंचायतीत काम करताना चुकीचे काम केले नाही चुकीच्या कामाला पाठीशी घातले नाही अन एक रुपयाही खाल्ला नाही असेही साळुंके म्हणाले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक म्हणाले की कै मुरलीधर खटोड व कै जयंतराव ससाणे हे विकास पुरुष होते त्यामुळे त्यांचे फोटो लावले त्यात कुणाला त्रास होण्याचे कारण नाही आरोप विचारा पूर्वक कराआम्ही आज पर्यत जनतेशी ईमान राखण्याचेच काम केले त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे असेही पाटील म्हणाले या वेळी गोविंद वाबळे शैलेश पवार चंद्रकांत नाईक हैदरभाई सय्यद आदिंनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचलन अभिजित राका यांनी केले
Post a Comment