बेलापुर (प्रतिनिधी )-गावात चाललेली दादागीरी भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी गावकरी मंडळाला विजयी करा गावकरी मंडळाची सत्ता आल्यास गावाची दशा बदलुन योग्य दिशा देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करु अशी ग्वाही गावकरी मंडळाचे प्रमुख व जि प सदस्य शरद नवले यांनी दिली. बेलापुर ग्रामपंचायतीच्या १७ जागे करीता होणार्या गावकरी मंडळाच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंद मदिर येथे माजी जि प अध्यक्ष मिस्टर शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या वेळी बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की गावकरी मंडळ सत्तेत आल्यावर पहीले प्राधान्य गावाला शुध्द पाणी देण्याचे नियोजन करु गावातील सर्व रस्ते डांबरीकरण करु तसेच वाड्या वस्त्यावरील रस्तेही दुरुस्त करु प्रवरा नदीत पडणारा कचरा बाजार तळावर पडणारा कचरा या कचर्याचा एक कोटी रुपयाचा घन कचरा प्रकल्प राबवु त्या करीता शेती महामंडळाची जमीन ताब्यात घेवु गावातील १७०० लाभार्थ्याची नावे ड वर्ग मध्ये असुन या सर्वांना आपल्याला घरकुल योजनेचा लाभ द्यावयाचा आहे त्याच बरोबर गावात सर्व सामान्यासाठी संस्कृतीक भवनाची निर्मिती करुन तेथे विवाहची सोय करण्यात येईल तसेच तरुणासाठी जिम व महीलासाठी जाँगीग ट्रकची व्यवस्था केली जाईल असेही जि प सदस्य शरद नवले यांनी सांगीतले या वेळी बोलताना भाजपाचे सुनिल मुथा म्हणाले की दहा वर्ष ग्रामपंचायतीचा वापर केवळ स्वतःच्या फायद्यासाठी करणार्या नतद्रष्ट ठेकेदारांनी गावाला बदनाम केले विकास कामे कसे करावी याचा आदर्श समाजापुढे ठेवणारे कै ,जयंतराव ससाणे व कै .मुरलीधर खटोड यांना बदनाम करु नका भ्रष्टाचारामुळे गावाचा बट्ट्याबोळ झाला असुन गावाचा कायापालट करावयाचा असेल तर गावाकरी मंडळाला विजयी करा ज्यांनी शनि देवाला फसविले आपल्या निष्ठावंत कार्याकर्त्याला फसविले ते लोक मोठ मोठे अमिषे दाखवुन खोटी अश्वासने देवुन आपली मते मिळवतील व पाच वर्ष सत्ता भोगतील अन सत्तेतुन पैसा संपत्ती अन संपत्तीतुन पुन्हा सत्ता हे समीकरण आता हाणून पाडा असेही मुथा म्हणाले
Post a Comment