श्रीरामपूर- पूर्वीपेक्षाही आजची पत्रकारिता प्रगल्भ झालेली आहे पत्रकारांना नवनवीन माध्यमे व त्यामध्ये झालेले बदल आत्मसात करून अनुभव व मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर भावी काळात वाटचाल करावी लागेल जो बदल स्वीकारणार नाही त्याची पत्रकारिता विशिष्ट अशा एका ढाच्यातच राहील त्यामुळे त्याचा परिणाम प्रसार माध्यमावर होऊन त्यांची आर्थिक झळ प्रसार माध्यमे चालवणाऱ्यांना सोसावी लागेल असा इशारा सिटिजन्स जस्टीस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नागेश सावंत यांनी दिला कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दिन पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते सिटिजन्स जस्टीस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र या वृत्तपत्रे संघटनेने बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन हा पत्रकार दिनाचे आगाशे सभागृहात या ठिकाणी आयोजित केली होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार पदमाकर शिंपी हे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की पत्रकारांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे कोरोणाच्या संकटावेळी पत्रकारांनी जबाबदारीने कर्तव्य पार पाडले कुटुंबाची काळजी न करता सामान्यांना माहिती पुरविण्याकरिता कसोसिने प्रयत्न केले अशा पत्रकारांचा गुणगौरव होणे हे नवोदित पत्रकारांना प्रोत्साहन देण्याचा खरा क्षण ठरेल असे ते म्हणाले यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे, अरुण पाटील, सुधीर वायखिंडे, मराठा स्वयंसेवक संघाचे राजेंद्र भोसले, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हा अध्यक्ष असलम बिनसाद, पत्रकार सलीम पठाण, सुनील लोखंडे, जयेश सावंत, रोहित भोसले, प्रवीण जमदाडे, राहुल रणपिसे, बाबा वाघ, श्रीमती वैशाली थोरात, अमोल सावंत, रोहित डुकरे, यांच्यासह प्रसारमाध्यमे व विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment