धमक्या देण्याची भाषा वापरु नका अंधारातले काळे कारनामे उजेडात आले तर पंचाईत होईल - गावकरी मंडळ
गावाकरी मंडळाच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की जशास तसे उत्तर देण्याची भाषा वापरुन आपले हसे करुन घेवू नये.
हिंमत असेल तर .रविन्द्र खटोड यांनी आमच्याविरुध्द तोंड उघडूनच दाखवावे कोण आव आणतं आणि कोण काय नाटकं करतो याची आम्हाला इत्तंभूत माहिती आहे.आमच्या धंद्याच्या उचापती करणारांनी आपल्याखाली काय जळतंय ते बघावे.आमच्या नादी लागून उगाच इज्जतीचा पंचनामा करुन घेवू नये.जशास तसे उत्तराची भाषा करणा-या .खटोड यांनी आपल्याला भिडण्याची हिंमत दाखवावी म्हणजे कोणात किती दम आहे हे कळेल.आमचे बावन पत्ते ओपन आहेत.आमचे काय धंदे आहेत हे जग जाहिर आहे.आपण कधी लपून छपून धंदे वा उद्योग करीत नाही.
भेकडासारखे उद्योग करुन गच्चीवरुन पळून जाण्या सारख्या घटनांमुळे कार्यकर्त्याचे प्रपंच उध्वस्त होण्याची वेळ येते हे सगळ्या गावाने अनुभवले आहे.कार्यकत्यांना कामापुरते मामा बनवायचे आणि नंतर वा-यावर सोडून द्यायचे हे आता ध्यानात येवू लागले आहे. शनीच्या अवकृपेमुळेच आपल्यावर गाव सोडण्याची वेळ आली हे विसरू नये .तसेच बापजाद्यांच्या पुण्याईवर किती दिवस जगणार, आधी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करा आणि आपली पायरी ओळखून बोला.दुसर्यावर बिनबुडाचे आरोप करुन स्वतःचा बचाव करु नये.आम्हाला बदनाम करुन स्वतःच्या बदनामीवर पांघरुण घालू नये.आमचेवर वायफट आरोप केले आणि दमबाजीची भाषा वापरली तर जशास तसेची भाषा वापरणारांना पळता भुई थोडी होईल असा इशारा दिला आहे.
जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले म्हणाले की विरोधक आडवे येतात हि सबब सांगून किती दिवस जनतेपासून पळणार.आपण सरपंच असताना गावात काय विकास कामे केली होती हे जनता विसरलेली नाही.त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण विकास कामांना किती निधी मिळवून दिला याचाही तपशील आपण देणार आहोत.दरवेळी विरोधक अडवणूक करतात अशी सबब सांगून आपले नाकर्तेपणावर पांघरुण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये.गेल्या दहा वर्षात काय काय घडले आहे हे जनतेला पूरते ठाऊक आहे.त्यामुळे स्पर्धा करायची तर चांगल्या कामांची करा.उगाच खोटेनाटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करु नये अन आता जनताही सुज्ञ झालेली आहे .येत्या निवडणूकीत जनता दहा वर्षातील कामगिरीचे आॕडीट करुन सत्ताधां-यांचा हिशोब चुकता करील असा विश्वास श्री.नवले यांनी व्यक्त केला.