Latest Post

श्रीरामपुर  (वार्ताहर)-संपूर्ण जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या गुटखा प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी टाकलेल्या एकलहरे  गुटखा छापा प्रकरणात काल शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या पथकाने उशिरा श्रीरामपूर एस टी डेपोच्या निवृत्त कर्मचारी अन्सार आजम शेख  सह अरुण गांगुर्डे यांना ताब्यात घेतले  असल्याचे पोलीस सूत्राकडून समजते  

श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रातील आठवाडी शिवारात गुलाबाच्या बागे लगत असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये पोलीस यंत्रणेने प्रथमतः 54 लाखांचा  गुटखा  जप्त केला पुन्हा दोन दिवसानंतर याच भागातील एका बंद खोलीत दहा अकरा लाखाचा गुटखा असल्याची माहिती तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळाली होती. पोलीस पथकाने या बंद खोलीतुन 11 लाख 66 हजारांचा गुटखा सुगंधी तंबाखू पुन्हा जप्त केली.

परिसरात दोन वेगवेगळे छापे पडले पहिल्या ठिकाणी जो अवैध गुटखा सापडला त्या ठिकाणच्या मालकाचा शोध पोलीस यंत्रणेला एका आठवड्यानंतर लागला तर दुसऱ्या छापा ठिकाणच्या मालकाचा शोध अर्धा महिना लोटूनही लागत नव्हता मात्र काल पोलिसांनी  ताब्यात घेतलेल्या अन्सार आजम शेख हाच गुटखा प्रकरणाचा स्थानिक गुटखा किंग असल्याचे समजले आहे.

गुटखा छापा  ठिकाणी  गेल्या सहा महिन्यापासून गुटखा साठवून करून स्थानिक किरकोळ व्यापाऱ्यांना दिला जात असे, सदर गुटखा कनेक्शन संगमनेर मधून असल्याचे समजते , हा गुटखा  कोल्हार मार्गे याठिकाणी येत होता,  ताब्यात घेतलेल्या अन्सार आजम शेख मुळे आता अस्सल आरोपी समोर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे एकलहरेचे अस्सल गुटखा किंग पर्यंत अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांना यश आले असल्याची चर्चा  परिसरात सुरू आहे

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी अर्ध्या कोटींहून अधिक गुटखा जप्त झाला, त्या ठिकाणच्या मालक, चालकांपर्यन्त  पोलीस प्रशासन  पोहचलेले असल्याचे दिसून येत आहे. 

या गुटख्याच्या अवैध व्यवसायात तीन प्रमुख भागीदार असल्याचे बोलले जात आहे, हे तिघे अनुक्रमे बेलापूर, एकलहरे व संगमनेरचे आहे.  यापैकी संगमनेरचा जावई हा आपल्या बेलापूरच्या  सासऱ्यासोबत संलग्न राहून एकलहरेतील तिसऱ्या भागिदारासोबत जावई कोल्हार मार्गे गुलाबाच्या बागे लगत असलेल्या पत्र्याचा शेडमध्ये मध्यरात्री मोठमोठ्या ट्रकमधुन वहातुक करुन गुटख्याच्या साठवणूक  करीत होता  एकलहरेतील भागीदार आपल्या तीन भावांच्या मदतीने रातोरात  श्रीरामपूर शहरासह संपूर्ण तालुक्यातील गुटखा वितरणाचे काम करीत असे, 

ज्या ठिकाणी गुटखा साठवून अवैध व्यवसाय चालू होता, त्याच्या लगत गुलाबाचा बाग असल्याने गाडीच्या आतील भागात गुटख्याच्या गोण्या व बाहेरील बाजूस गुलाबाचे फुले भरून वाहतूक होत असल्याचे  परिसरात बोलले जात आहे.एकलहरे गुटखा कनेक्शन दुरवर पसरले असुन खोलवर तपास केल्यास बरेच मोठे मासे गळाला लागु शकतात या गुटखा प्रकरणात काहींनी मध्यस्थांचीही भूमिका बजावली असुन फार मोठी तडजोड झाल्याचीही आता जोर धरु लागली आहे.


राहुरी विद्यापीठ, दि. 03 नोव्हेंबर, 2020 प्रतिनिधी मिनाष पटेकर राहुरी:_महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे काम बंद आंदोलनाच्या दुसर्या दिवशी समन्वय संघाचे सर्व पदाधिकारी, विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी एकत्र येवून प्रशासकीय इमारतीसमोर जोरदार घोषणा देत परिसर दणानुन टाकला. सातवा वेतन आयोगाच्या मागणीसाठी आणि आश्वासीत प्रगती योजना लागू व्हावी यासाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राच्या 10 जिल्ह्यातील 27 संशोधन केंद्रे, 82 योजनेत्तर योजना, 45 अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प, नऊ कृषि महाविद्यालये, आठ कृषि तंत्र विद्यालये, दोन माळी प्रशिक्षण केंद्रे, चार विभागीय विस्तार केंद्रे, पाच जिल्हा विस्तार केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी काम बंद आंदोलनाचा दुसरा दिवस उत्सपुर्तपणे घोषणा देत बंद सुरु ठेवला. 

काम बंद आंदोलनाच्या दुसर्या दिवशी विद्यापीठ मध्यवर्ती परिसारातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांनी एकत्र येत मोर्चा काढला व पुर्ण विद्यापीठामध्ये घोषणा देत प्रशासकीय इमारतीसमोर सर्व कर्मचारी जमले. यावेळी या मोर्चाचे नतृत्व समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. सी.डी. देवकर, उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम, कार्याध्यक्ष डॉ. महाविरसिंग चौहान, सहसचिव डॉ. संजय कोळसे यांनी केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे आणि डॉ. सी.डी. देवकर यांनी सातवा वेतन आयोग आणि आश्वासती प्रगती योगनाचे निवेदन कुलगुरु आणि कुलसचिव यांना दिले. आंदोलनाला उत्तर देतांना कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले कर्मचार्यांच्या मागन्या रास्त आहे. राज्यात सर्व शासकीय कार्यालयांना सातवा वेतन आयोग लागु झाला असून राज्यातील कृषि विद्यापीठे याच्यातून वंचीत राहिले आहे. नुकतीच झालेल्या 48 वी कृषि संशोधन आणि विकास समिती बैठकीमध्ये सातवा वेतन आयोग आणि आश्वासीत प्रगती योजना संदर्भात मी कृषि मंत्री आणि कृषि सचिवांबरोबर याबद्दल बोललो आहे. आपल्या मागन्यांचा शासन स्तरावर विचार होणार असल्याचे ते म्हणाले. 

यावेळी आंदोलकांना

उत्तर देतांना कुलसचिव श्री. मोहन वाघ म्हणाले आत्तापर्यंत समन्वय संघाने दिलेले सर्व निवेदने आपण मंत्रालय स्तरावर पाठविले आहे. मंत्रालयातील अधिकार्यांबरोबर विद्यापीठ प्रशासन संपर्कात असून लवकरच समारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. या प्रसंगी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर म्हणाले समन्वय संघ दोन वर्षापासून सातवा वेतन आयोग आणि आश्वासीत प्रगती योजनासंदर्भात शासन दरबारी मागन्या मांडत आहे. शिक्षकेत्तर कर्मचारी यांची सातवा वेतन आयोगाची फाईल तयार होवून वर्ष झाले आहे. त्यात ज्या तृटी निघाल्या त्याची पुर्तता करुन दिलेली असून देखील फाईल लाल फितीत अडकली आहे. त्याचप्रमाणे शिक्षकवर्ग कर्मचार्यांच्या फाईलला ज्या तृटी होत्या त्या देखील चार महिन्यापुर्वी पुर्ण करण्यात आल्या. तरी देखील शासन दरबारी दिरंगाई का होत आहे हे न उलगडणारे कोडे आहे. विद्यापीठातील कर्मचार्यांची सहनशक्ती संपली असून नाविलाजास्तव आंदोलन करुन विद्यापीठ कर्मचारी आपला रोष व्यक्त करत आहे. तरी सातवा वेतन आयोग आणि आश्वासीत प्रगती योजना पुर्वलक्षी प्रभावाने लवकरात लवकर लागु व्हावी. 

यावेळी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. याप्रसंगी डॉ. महाविरसिंग चौहान, डॉ. उत्तम कदम, डॉ. चांगदेव वायाळ व श्री. वराळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी समन्वय संघाचे गणेश मेहेत्रे, मच्छिंद्र बाचकर, महेश घाडगे, जनार्धन आव्हाड, मच्छिंद्र बेल्हेकर, संजय ठाणगे, एकनाथ बांगर, बाबासाहेब अडसुरे, जनार्धन आव्हाड, व सौ. सुरेखा निमसे इ. पदाधिकारी उपस्थित होते. आजचा मोर्चा पदव्युत्तर महाविद्यालयापासून जोरदार घोषणाबाजी करत अभियांत्रिकी महाविद्यालय येथे घोषणा देवून प्रशासकीय इमारतीसमोर ठिया आंदोलन केले. या मोर्चामध्ये मध्यवर्ती परिसरातील सर्व अधिकारी व कर्मचारी सामाजीक आंतर राखत मोठ्या संख्येने उपस्थित होते.






श्रीरामपूर -  कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्या सह देशभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने, मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या उपचाराकरिता रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने, महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी व विक्री संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतुन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, संघटनेचे अध्यक्ष अशोक जोशी,उपाध्यक्ष संतोष कोठारी, हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अबूभाई कुरेशी,सचिव हजी अमीन शेख ,खजिनदार तुकाराम ताक, जलील भाई शेख, फरीद शेख,नगरसेवक मुख्तार शाह, आदींच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले, यावेळी जवळपास २०० लोकांनी रक्तदान केले, सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास खासदार सदाशिव लोखंड, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी सदिच्छा भेट दिली ,तसेच नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दूरध्वनी व्दारे शुभेच्छा संदेश दिला,सदरच्या भव्य रक्तदान शिबीरस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून ,२०० नागरिकांनी यावेळी रक्तदान केले. महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्थरातून कौतुक केले जात आहे.



 

शिर्डी (प्रतिनिधी) अहमदनगर जिल्हामध्ये सुरू असलेल्या अवैध धंदे ,वाळूतस्करी तसेच गुन्हेगारीला  लगाम घालण्यांचे व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम सर्वांच्या सहकार्याने आपण यापुढे करणार आहोत .असे आश्वासन अहमदनगर जिल्ह्याला नवीन आलेले कर्तव्यदक्ष असे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

  अहमदनगर जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे आज सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी शिर्डीत आले होते. त्यांनी शिर्डी पोलीस उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या पाचही पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांची आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीला पोलिस उप विभागीय अधिकारी संजय सातव

तसेच शिर्डी, कोपरगाव शहर, कोपरगाव ग्रामीण, राहाता ,लोणी, पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकारी उपस्थित होते .यावेळी उत्तर नगर जिल्हा तसेच शिर्डी उपविभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावांमध्ये, शहरांमध्ये अवैध धंदे ,अवैध व्यवसाय, वाळूतस्करी ,गुन्हेगारी या सर्वांचा आढावा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घेतला, यापुढे या सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे, वाळू तस्करी, गुन्हेगरी त्वरित बंद व्हावेत, यासाठी सक्त सूचना त्या त्या पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांना यावेळी देण्यात आल्याचे  समजते. त्यानंतर  या आढावा बैठकीनंतर शिर्डी पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक जितेश लोकचंदाणी, अध्यक्ष किशोर पाटणी, कार्याध्यक्ष राजेंद्र बनकर, सदस्य हेमंत शेजवळ, विनोद जवरेनी त्यांचा शिर्डीत प्रथम सत्कार करुन स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद न घेता स्वतः शिर्डी पत्रकार संघाला आपणच या उत्तर नगर जिल्ह्यातील प्रश्न, समस्या ,अवैध धंद्या बाबत वेळोवेळी माहिती द्या, सर्वांच्या सहकार्याने आपण अहमदनगर जिल्ह्यात अवैध धंदे वाळूतस्करी, गुन्हेगारी मोडून काढू, नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, पत्रकार ,पोलीस अधिकारी, नागरिक या सर्वांनी समन्वय साधून अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे ,आपला तसा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी पत्रकारांचेही सहकार्य आवश्यक आहे. असे यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच शिर्डीत आल्यामुळे त्यांनी साईबाबा मंदिर बंद असल्यामुळे बाहेरूनच लांबून दर्शन घेतले, सोलापूर हुन अहमदनगरला बदलून आलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यामध्ये प्रथम बदल्यांचा दणका पोलीस अधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर आता ते अवैध धंदे ,गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे त्यांची धडकी अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारांनी ,वाळूतस्करांनी घेतली आहे. त्या धर्तीवर उत्तर नगर जिल्ह्यातील शिर्डीचा त्यांचा आजचा हा दौरा महत्त्वाचा ठरला आहे .त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत आढावा बैठकीत पोलीस निरीक्षकांना सक्त सूचना करत अवैध धंदे त्वरित बंद करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत असे समजते.

🔸शहर पोलिसाचे डीबी स्कॉडने तिन्ही आरोपिंना घेतले ताब्यात

बुलडाणा - 29 ओक्टोबर

बुलढाणा येथील तीन युवक शॉपिंगसाठी मुंबईला गेले असता त्यांच्याजवळील पैशे संपले म्हणून त्यांनी चुकीचा मार्ग अवलंबून एका विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकूने वार करून त्याचा गळा चिरला व त्याच्या जवळील मोबाईल व नगदी 8 हजार रुपये घेऊन पसार झाले.अधिकारीच्या मोबाईल लोकेशन वरून तिन्ही आरोपीना बुलडाणा शहर पोलिसच्या डीबी पथकाने ताब्यात घेऊन नवी मुंबई पोलिसच्या स्वाधीन केले आहे.

    याबाबत पोलिसाने दिलेली माहिती अशी की बुलडाणा येथील अमित सुनील बेंडवाल 18 वर्ष,आबिद खान अयुब खान उर्फ ऑल 18 वर्ष व अदनान कुरेशी वहीद कुरेशी उर्फ बब्या 19 वर्ष हे तिघे शॉपिंग साठी मुंबईला गेले होते. या पैकी एका जवळचा पाकीट हरवला.पैशे नसल्याने त्यांनी 22 ओक्टोबर रोजी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास सीबीडी सर्कल जॉगिंग ट्रैक जवळ,बेलापुर नवी मुंबई येथे रासत्याने पायी जात असलेले 39 वर्षीय विक्रीकर अधिकारी महेश मधुकर बिनवडे यांच्यावर अचानकपणे चाकुने वार करुण त्यांना जख्मी केले व त्यांचा जवळचा एंड्रॉइड मोबाइल व पाकिट मधील नगदी 8 हजार रुपये घेऊन फरार झाले.या हल्ल्यात महेश बिनवडे यांचा गळा चीरला व ते गंभीर जख्मी झाल्याने त्यांना उपचारार्थ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.या प्रकरणी अज्ञात आरोपीं विरुद्ध सीबीडी बेलापुर पोलीस ठाण्यात भादवीची धारा 394 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला.जख्मी बिनवडे यांच्या मोबाइलचा लोकेशन घेतला असता तो मुंबई येथे दिसला,त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर बुलडाणा येथील आरोपींनी गुन्हा केल्याचे समोर आले.याची माहिती बुलडाणा शहर ठानेदार प्रदीप सालुंखे यांना देण्यात आली.शहर डीबी स्कॉडचे शिवाजी मोरे,दत्ता नागरे व संदीप कायंदे यांनी बुलडाणा येथील आरोपी अमित बेंडवाल, आबिद खान व अदनान कुरेशी या तिघांना ताब्यात घेतले.आज 29 ओक्टोबर रोजी बेलापूर पोलीस बुलडाणा शहरात दाखल झाली असून तिन्ही आरोपींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या रॉबरीत मुम्बई येथील इतर 2 आरोपिंचा समावेश असल्याची माहिती शहर ठाणेदार प्रदीप सालुंखे यांनी असून आरोपी अमित बेंडवाल वर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे ही ते म्हणाले.आरोपींना घेण्यासाठी नवी मुंबई येथील पीएसआई एन. डी.शिंदे,पीएसआई एन. पी.सांगळे,संदीप फड,विनोद देशमुख व अज़हर शेख बुलडाणा आलेले आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी )- बेलापुर गावातील मुख्य पेठेतील रस्त्याची  तातडीने दुरुस्ती करुन डाबरीकरण करण्यात यावे या मागणी करीता सिध्दीविनायक युवा मंचच्या वतीने बेलापुर बु!! ग्रामपंचायत कार्यालयासमोर कार्यकर्ते आजपासुन उपोषणास बसले आहे                     बेलापुर बाजारापेठेतील रस्ता अतिशय खराब झाला असुन ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे यारस्त्याची ताताडीने दुरुस्ती न झाल्यास सिध्दीविनायक युवा मंचच्या वतीने उपोषणास बसण्याचा इशारा मंचचे गोपाल जोशी राजेश सुर्यवंशी शशीकांत तेलोरे रोहीत बोरा विकी मुथ्था गोपी दाणी आदित्य जाधव यांनी दिला होता त्यांच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज साकाळपासुन हे कार्यकर्ते ग्रामपंचायत कार्यालया समोर उपोषणास बसले आहे.

बुलडाणा - 28 ओक्टोबर

संपूर्ण जग कोरोना महामारी मुळे हतबल झालेला आहे.कोरोना पासून वाचन्यासाठी फिजिकल डिस्टन्स,मास्क व वारंवार हाथ धुत राहणे हे उपाय सूचवलेले आहे.या नियमांचा पालन करून आपण कोरोनापासुन सुरक्षित राहु शकतात.बुलडाणा जिल्हा प्रशासन सुद्धा नागरिका मध्ये कोरोना संसर्गा बाबत जनजागृति करीत आहे.जिल्ह्यातील काही ठराविक कोविड सेंटर मध्येच कोरोना तपासणी केली जात होती त्यामुळे रुगणांना व त्यांचे नातेवाइकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता म्हणून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या निर्देशानुसार बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत सुरु 52 प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा कोरोना तपासणी सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र सांगळे यांनी दिली आहे.कोरोनाची लक्षणे दिसल्यास ग्रामीण भागातील जनतेने आपल्या गावा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोरोनाची तपासणी करून  घ्यावे,अशे आवाहन सुद्धा डॉ. सांगळे यांनी केले आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget