शिर्डी (प्रतिनिधी) अहमदनगर जिल्हामध्ये सुरू असलेल्या अवैध धंदे ,वाळूतस्करी तसेच गुन्हेगारीला लगाम घालण्यांचे व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम सर्वांच्या सहकार्याने आपण यापुढे करणार आहोत .असे आश्वासन अहमदनगर जिल्ह्याला नवीन आलेले कर्तव्यदक्ष असे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
अहमदनगर जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे आज सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी शिर्डीत आले होते. त्यांनी शिर्डी पोलीस उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या पाचही पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांची आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीला पोलिस उप विभागीय अधिकारी संजय सातव
तसेच शिर्डी, कोपरगाव शहर, कोपरगाव ग्रामीण, राहाता ,लोणी, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकारी उपस्थित होते .यावेळी उत्तर नगर जिल्हा तसेच शिर्डी उपविभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावांमध्ये, शहरांमध्ये अवैध धंदे ,अवैध व्यवसाय, वाळूतस्करी ,गुन्हेगारी या सर्वांचा आढावा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घेतला, यापुढे या सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे, वाळू तस्करी, गुन्हेगरी त्वरित बंद व्हावेत, यासाठी सक्त सूचना त्या त्या पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांना यावेळी देण्यात आल्याचे समजते. त्यानंतर या आढावा बैठकीनंतर शिर्डी पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक जितेश लोकचंदाणी, अध्यक्ष किशोर पाटणी, कार्याध्यक्ष राजेंद्र बनकर, सदस्य हेमंत शेजवळ, विनोद जवरेनी त्यांचा शिर्डीत प्रथम सत्कार करुन स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद न घेता स्वतः शिर्डी पत्रकार संघाला आपणच या उत्तर नगर जिल्ह्यातील प्रश्न, समस्या ,अवैध धंद्या बाबत वेळोवेळी माहिती द्या, सर्वांच्या सहकार्याने आपण अहमदनगर जिल्ह्यात अवैध धंदे वाळूतस्करी, गुन्हेगारी मोडून काढू, नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, पत्रकार ,पोलीस अधिकारी, नागरिक या सर्वांनी समन्वय साधून अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे ,आपला तसा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी पत्रकारांचेही सहकार्य आवश्यक आहे. असे यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच शिर्डीत आल्यामुळे त्यांनी साईबाबा मंदिर बंद असल्यामुळे बाहेरूनच लांबून दर्शन घेतले, सोलापूर हुन अहमदनगरला बदलून आलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यामध्ये प्रथम बदल्यांचा दणका पोलीस अधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर आता ते अवैध धंदे ,गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे त्यांची धडकी अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारांनी ,वाळूतस्करांनी घेतली आहे. त्या धर्तीवर उत्तर नगर जिल्ह्यातील शिर्डीचा त्यांचा आजचा हा दौरा महत्त्वाचा ठरला आहे .त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत आढावा बैठकीत पोलीस निरीक्षकांना सक्त सूचना करत अवैध धंदे त्वरित बंद करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत असे समजते.
Post a Comment