श्रीरामपूर - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्या सह देशभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने, मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या उपचाराकरिता रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने, महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी व विक्री संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतुन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, संघटनेचे अध्यक्ष अशोक जोशी,उपाध्यक्ष संतोष कोठारी, हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अबूभाई कुरेशी,सचिव हजी अमीन शेख ,खजिनदार तुकाराम ताक, जलील भाई शेख, फरीद शेख,नगरसेवक मुख्तार शाह, आदींच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले, यावेळी जवळपास २०० लोकांनी रक्तदान केले, सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास खासदार सदाशिव लोखंड, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी सदिच्छा भेट दिली ,तसेच नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दूरध्वनी व्दारे शुभेच्छा संदेश दिला,सदरच्या भव्य रक्तदान शिबीरस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून ,२०० नागरिकांनी यावेळी रक्तदान केले. महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्थरातून कौतुक केले जात आहे.
Post a Comment