राहुरी विद्यापीठ, दि. 03 नोव्हेंबर, 2020 प्रतिनिधी मिनाष पटेकर राहुरी:_महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे काम बंद आंदोलनाच्या दुसर्या दिवशी समन्वय संघाचे सर्व पदाधिकारी, विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी एकत्र येवून प्रशासकीय इमारतीसमोर जोरदार घोषणा देत परिसर दणानुन टाकला. सातवा वेतन आयोगाच्या मागणीसाठी आणि आश्वासीत प्रगती योजना लागू व्हावी यासाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राच्या 10 जिल्ह्यातील 27 संशोधन केंद्रे, 82 योजनेत्तर योजना, 45 अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प, नऊ कृषि महाविद्यालये, आठ कृषि तंत्र विद्यालये, दोन माळी प्रशिक्षण केंद्रे, चार विभागीय विस्तार केंद्रे, पाच जिल्हा विस्तार केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी काम बंद आंदोलनाचा दुसरा दिवस उत्सपुर्तपणे घोषणा देत बंद सुरु ठेवला.
काम बंद आंदोलनाच्या दुसर्या दिवशी विद्यापीठ मध्यवर्ती परिसारातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांनी एकत्र येत मोर्चा काढला व पुर्ण विद्यापीठामध्ये घोषणा देत प्रशासकीय इमारतीसमोर सर्व कर्मचारी जमले. यावेळी या मोर्चाचे नतृत्व समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. सी.डी. देवकर, उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम, कार्याध्यक्ष डॉ. महाविरसिंग चौहान, सहसचिव डॉ. संजय कोळसे यांनी केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे आणि डॉ. सी.डी. देवकर यांनी सातवा वेतन आयोग आणि आश्वासती प्रगती योगनाचे निवेदन कुलगुरु आणि कुलसचिव यांना दिले. आंदोलनाला उत्तर देतांना कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले कर्मचार्यांच्या मागन्या रास्त आहे. राज्यात सर्व शासकीय कार्यालयांना सातवा वेतन आयोग लागु झाला असून राज्यातील कृषि विद्यापीठे याच्यातून वंचीत राहिले आहे. नुकतीच झालेल्या 48 वी कृषि संशोधन आणि विकास समिती बैठकीमध्ये सातवा वेतन आयोग आणि आश्वासीत प्रगती योजना संदर्भात मी कृषि मंत्री आणि कृषि सचिवांबरोबर याबद्दल बोललो आहे. आपल्या मागन्यांचा शासन स्तरावर विचार होणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आंदोलकांना
उत्तर देतांना कुलसचिव श्री. मोहन वाघ म्हणाले आत्तापर्यंत समन्वय संघाने दिलेले सर्व निवेदने आपण मंत्रालय स्तरावर पाठविले आहे. मंत्रालयातील अधिकार्यांबरोबर विद्यापीठ प्रशासन संपर्कात असून लवकरच समारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. या प्रसंगी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर म्हणाले समन्वय संघ दोन वर्षापासून सातवा वेतन आयोग आणि आश्वासीत प्रगती योजनासंदर्भात शासन दरबारी मागन्या मांडत आहे. शिक्षकेत्तर कर्मचारी यांची सातवा वेतन आयोगाची फाईल तयार होवून वर्ष झाले आहे. त्यात ज्या तृटी निघाल्या त्याची पुर्तता करुन दिलेली असून देखील फाईल लाल फितीत अडकली आहे. त्याचप्रमाणे शिक्षकवर्ग कर्मचार्यांच्या फाईलला ज्या तृटी होत्या त्या देखील चार महिन्यापुर्वी पुर्ण करण्यात आल्या. तरी देखील शासन दरबारी दिरंगाई का होत आहे हे न उलगडणारे कोडे आहे. विद्यापीठातील कर्मचार्यांची सहनशक्ती संपली असून नाविलाजास्तव आंदोलन करुन विद्यापीठ कर्मचारी आपला रोष व्यक्त करत आहे. तरी सातवा वेतन आयोग आणि आश्वासीत प्रगती योजना पुर्वलक्षी प्रभावाने लवकरात लवकर लागु व्हावी.
यावेळी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. याप्रसंगी डॉ. महाविरसिंग चौहान, डॉ. उत्तम कदम, डॉ. चांगदेव वायाळ व श्री. वराळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी समन्वय संघाचे गणेश मेहेत्रे, मच्छिंद्र बाचकर, महेश घाडगे, जनार्धन आव्हाड, मच्छिंद्र बेल्हेकर, संजय ठाणगे, एकनाथ बांगर, बाबासाहेब अडसुरे, जनार्धन आव्हाड, व सौ. सुरेखा निमसे इ. पदाधिकारी उपस्थित होते. आजचा मोर्चा पदव्युत्तर महाविद्यालयापासून जोरदार घोषणाबाजी करत अभियांत्रिकी महाविद्यालय येथे घोषणा देवून प्रशासकीय इमारतीसमोर ठिया आंदोलन केले. या मोर्चामध्ये मध्यवर्ती परिसरातील सर्व अधिकारी व कर्मचारी सामाजीक आंतर राखत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment