श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रातील आठवाडी शिवारात गुलाबाच्या बागे लगत असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये पोलीस यंत्रणेने प्रथमतः 54 लाखांचा गुटखा जप्त केला पुन्हा दोन दिवसानंतर याच भागातील एका बंद खोलीत दहा अकरा लाखाचा गुटखा असल्याची माहिती तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळाली होती. पोलीस पथकाने या बंद खोलीतुन 11 लाख 66 हजारांचा गुटखा सुगंधी तंबाखू पुन्हा जप्त केली.
परिसरात दोन वेगवेगळे छापे पडले पहिल्या ठिकाणी जो अवैध गुटखा सापडला त्या ठिकाणच्या मालकाचा शोध पोलीस यंत्रणेला एका आठवड्यानंतर लागला तर दुसऱ्या छापा ठिकाणच्या मालकाचा शोध अर्धा महिना लोटूनही लागत नव्हता मात्र काल पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अन्सार आजम शेख हाच गुटखा प्रकरणाचा स्थानिक गुटखा किंग असल्याचे समजले आहे.
गुटखा छापा ठिकाणी गेल्या सहा महिन्यापासून गुटखा साठवून करून स्थानिक किरकोळ व्यापाऱ्यांना दिला जात असे, सदर गुटखा कनेक्शन संगमनेर मधून असल्याचे समजते , हा गुटखा कोल्हार मार्गे याठिकाणी येत होता, ताब्यात घेतलेल्या अन्सार आजम शेख मुळे आता अस्सल आरोपी समोर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे एकलहरेचे अस्सल गुटखा किंग पर्यंत अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांना यश आले असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी अर्ध्या कोटींहून अधिक गुटखा जप्त झाला, त्या ठिकाणच्या मालक, चालकांपर्यन्त पोलीस प्रशासन पोहचलेले असल्याचे दिसून येत आहे.
या गुटख्याच्या अवैध व्यवसायात तीन प्रमुख भागीदार असल्याचे बोलले जात आहे, हे तिघे अनुक्रमे बेलापूर, एकलहरे व संगमनेरचे आहे. यापैकी संगमनेरचा जावई हा आपल्या बेलापूरच्या सासऱ्यासोबत संलग्न राहून एकलहरेतील तिसऱ्या भागिदारासोबत जावई कोल्हार मार्गे गुलाबाच्या बागे लगत असलेल्या पत्र्याचा शेडमध्ये मध्यरात्री मोठमोठ्या ट्रकमधुन वहातुक करुन गुटख्याच्या साठवणूक करीत होता एकलहरेतील भागीदार आपल्या तीन भावांच्या मदतीने रातोरात श्रीरामपूर शहरासह संपूर्ण तालुक्यातील गुटखा वितरणाचे काम करीत असे,
ज्या ठिकाणी गुटखा साठवून अवैध व्यवसाय चालू होता, त्याच्या लगत गुलाबाचा बाग असल्याने गाडीच्या आतील भागात गुटख्याच्या गोण्या व बाहेरील बाजूस गुलाबाचे फुले भरून वाहतूक होत असल्याचे परिसरात बोलले जात आहे.एकलहरे गुटखा कनेक्शन दुरवर पसरले असुन खोलवर तपास केल्यास बरेच मोठे मासे गळाला लागु शकतात या गुटखा प्रकरणात काहींनी मध्यस्थांचीही भूमिका बजावली असुन फार मोठी तडजोड झाल्याचीही आता जोर धरु लागली आहे.
Post a Comment