श्रीरामपुर (प्रतिनिधी )-श्रीरामपुर शहरात असलेल्या एका लाँजवर पोलीसांनी छापा टाकून तीन महीलासह एका पुरुषाला ताब्यात ताब्यात घेतले असुन अवैध धंदे बंद करण्याचा पोलीसांनी विडाच उचलला आहे श्रीरामपुर शहरात पोलीसांनी लाखोचा गुटखा पकडला ती गुटख्याची कारवाई वादात सापडली त्या नंतर पोलीस अधिकार्यांच्या तातडीने बदल्या झाल्या त्यातच नेवाशाहुन एक तडजोडी बाबत अधिकार्याची क्लिप व्हायरल झाली या सर्व बाबीची पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी गांभिर्याने दखल घेवुन एखाद्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरु असल्याचे आढळल्यास त्यास सबंधीत अधिकार्यास जबाबदार धरण्यात येईल असे फर्मानच पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी काढले आहे श्रीरामपुरला उपविभागीय अधिकारी म्हणून संदीप मिटके यांची तर शहर पोलीस स्टेशनला प्रशिक्षणार्थी भापोसे आयुष नोपाणी यांची नेमणूक करण्यात आली असुन या दोन्ही अधिकाऱ्यांमुळे अवैध व्यवसाय करणारांचे धाबे दणाणले आहे गुटख्यानंतर पोलीसांनी मटका देखील बंद केला असुन या पुढे अवैध व्यवसाय करणारांवर धाडाकेबाज कारवाई करण्याचा विडाच उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी उचलला आहे शहरातील शिवाजी रोडवर असणार्या लाँजवर देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहीती पोलीसांना मिळताच त्या ठिकाणी पोलीसांनी छापा टाकला त्या वेळी तीन महीला व एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले या वेळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.
Post a Comment