श्रीरामपुर (प्रतिनिधी )-पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी संदिप मिटके भापोसे आयुष नोपाणी यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले पंचशील सिल्वर स्पून या हॉटेलवर छापा टाकून विस हजार रुपयांची दारू जप्त केलेली आहे त्याचप्रमाणे दोन आरोपी ताब्यात घेतले असून एक फरार असल्याची माहिती आयपीएस अधिकारी आयुष नोपानी यांनी दिली आहे. या कारवाईमुळे शहरात अवैधरित्या धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे या दोन कारवाईमुळे श्रीरामपुर शहरातील नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे मोठे कौतुक केले जात आहे, धडाकेबाज कारवाई करत विस हजाराची बेकायदेशीर दारु जप्त करुन दोन जणांना अटक केली आहे.
Post a Comment