बेलापुर(वार्ताहर)कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण बांधील असुन आपल्या आसापास अवैध धंदे सूरू असल्यास किंवा कुणाचे कोणत्याही प्रकारे दबाव आणुन शोषण होत असल्यास तात्काळ आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्रीरामपूर शहराचे प्रशिक्षणार्थी आयपीएस पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी केले आहे.*
*बेलापुर येथील पोलीस चौकीत स्थानिक लोकप्रतिनिधी, पत्रकार, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी नोपाणी यांनी मुक्त संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.*
*ते पुढे म्हणाले की,छोट्या छोट्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मोठमोठे गुन्हे घडतात त्यामुळे पोलिसात आलेल्या सर्व तक्रारी गांभीर्याने नोंदविण्यात याव्यात अशा सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यातील मोठी गुन्हेगारी रोखता येईल. लोकांनी पोलिसांशी संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास बिनधास्पतणे आपणाशी भ्रमणध्वनी क्रमांक 8459864520 वर संपर्क साधावा त्याची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल.वाळू मटका जुगार वा अन्य काही अवैध व्यवसाय सुरु असल्यास पोलीस स्टेशनशी अथवा माझ्याशी संपर्क करावा असेही नोपाणी यांनी स्पष्ट केले.पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे यावेळी उपस्थित होते.*
यावेळी झालेल्या चर्चेत माजी सरपंच भरत साळुंके यांनी झेंडा चौकात ट्रॅफिक पोलीस नियुक्त करण्याची मागणी केली. तसेच अन्य काही मुद्द्यांवर झालेल्या चर्चेत सर्वश्री.टॅक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील मुथा,पत्रकार देविदास देसाई, प्रा. ज्ञानेश गवले, नवनाथ कुताळ,बाजार समितीचे संचालक सुधीर नवले,अशोक कारखाना संचालक अभिषेक खंडागळे, अशोक गवते,अशोक पवार, अजय डाकले, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश कु-हे ,पोलीस पाटील अशोक प्रधान, ,अकबर सय्यद आदींनी सहभाग नोंदविला.*
*यावेळी सर्वश्री व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रशांत लड्डा व शांतीलाल हिरण ,प्रसाद खरात ,पत्रकार दिलीप दायमा, सुहास शेलार,अशोक शेलार, किशोर कदम आदी उपस्थित होते.*
*बेलापुर पत्रकार संघ ,ग्रामस्थ व विविध संघटनांच्या वतीने यावेळी नोपाणी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस हवालदार अतुल लोटके, पो. नाईक. रामेश्वर ढोकणे,पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे, हरिश पानसंबळ, निखिल तमनर,साईनाथ राशीनकर आदींनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
Post a Comment