राहुरी कृषि विद्यापीठाचे काम बंद आंदोलनाच्या दुसर्या दिवशी उत्सपुर्त प्रतिसाद.
काम बंद आंदोलनाच्या दुसर्या दिवशी विद्यापीठ मध्यवर्ती परिसारातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांनी एकत्र येत मोर्चा काढला व पुर्ण विद्यापीठामध्ये घोषणा देत प्रशासकीय इमारतीसमोर सर्व कर्मचारी जमले. यावेळी या मोर्चाचे नतृत्व समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. सी.डी. देवकर, उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम, कार्याध्यक्ष डॉ. महाविरसिंग चौहान, सहसचिव डॉ. संजय कोळसे यांनी केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे आणि डॉ. सी.डी. देवकर यांनी सातवा वेतन आयोग आणि आश्वासती प्रगती योगनाचे निवेदन कुलगुरु आणि कुलसचिव यांना दिले. आंदोलनाला उत्तर देतांना कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले कर्मचार्यांच्या मागन्या रास्त आहे. राज्यात सर्व शासकीय कार्यालयांना सातवा वेतन आयोग लागु झाला असून राज्यातील कृषि विद्यापीठे याच्यातून वंचीत राहिले आहे. नुकतीच झालेल्या 48 वी कृषि संशोधन आणि विकास समिती बैठकीमध्ये सातवा वेतन आयोग आणि आश्वासीत प्रगती योजना संदर्भात मी कृषि मंत्री आणि कृषि सचिवांबरोबर याबद्दल बोललो आहे. आपल्या मागन्यांचा शासन स्तरावर विचार होणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. याप्रसंगी डॉ. महाविरसिंग चौहान, डॉ. उत्तम कदम, डॉ. चांगदेव वायाळ व श्री. वराळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी समन्वय संघाचे गणेश मेहेत्रे, मच्छिंद्र बाचकर, महेश घाडगे, जनार्धन आव्हाड, मच्छिंद्र बेल्हेकर, संजय ठाणगे, एकनाथ बांगर, बाबासाहेब अडसुरे, जनार्धन आव्हाड, व सौ. सुरेखा निमसे इ. पदाधिकारी उपस्थित होते. आजचा मोर्चा पदव्युत्तर महाविद्यालयापासून जोरदार घोषणाबाजी करत अभियांत्रिकी महाविद्यालय येथे घोषणा देवून प्रशासकीय इमारतीसमोर ठिया आंदोलन केले. या मोर्चामध्ये मध्यवर्ती परिसरातील सर्व अधिकारी व कर्मचारी सामाजीक आंतर राखत मोठ्या संख्येने उपस्थित होते.