Latest Post

बुलडाणा - 26 ओक्टोबरवा

ईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचे प्रतीक म्हणून दसरा साजरा केला जातो. यंदा कोरोना महामारीमुळे नियमांच्या चौकटीत दसरा सण साजरा करण्यात आला असून,बुलडाणा जिल्हा पोलिस मुख्यालयात पारंपारीक पद्धतीने जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया,अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या हस्ते शस्र पूजन करण्यात आले. यावेळी होम डीवायएसपी बळीराम गिते,राखीव पोलिस निरीक्षक शिंदे व इतर पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आश्वासना नंतर आंदोलन मागे

बुलडाणा - 26 ओक्टोबरको:- रोनाच्या दहशतीतही मोठी जोखीम पत्कारून सेवा बजावणाऱ्या नर्स, ब्रदर, कंत्राटी सफाई कामगार यांचे गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून वेतन रखडले आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुलडाणा जिल्हा रुग्णालयातच आज 26 ऑक्टोंबर रोजी जिल्हाप्रमुख मदनराजे गायकवाड यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केले असता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

    जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात व जगात गेल्या 7 महिन्यापासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. या कोरोना काळात डॉक्टर, नर्स, ब्रदर, कंत्राटी सफाई कर्मचारी जीव मुठीत घेऊन कोविड योद्धे म्हणून कोरोना संशयीत व इतरही आजारग्रस्तां साठी सेवा देत आहे. मात्र गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून त्यांचे वेतन थकल्यामूळे त्यांना सण उत्सवाच्या काळात प्रपंच सांभाळणे कठीण झाले आहे. या कोरोना योद्धयांसमोर निर्माण झालेला आर्थिक पेचप्रसंग तात्काळ सोडविण्याची आग्रही भूमिका घेत मनसेचे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांनी कार्यकर्त्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयात धडक देऊन तेथेच ठिय्या मांडला. दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी आंदोलकांना भेट देऊन चर्चा केली. काही तासातच प्रलंबित वेतनाचा प्रश्न निकाली काढण्याचे तडस यांनी आश्वासित केल्याने तुर्तास आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख मदन राजे यांनी दिली. यावेळी मनसे जिल्हा उपप्रमुख बंटी नाईक,शहर प्रमुख मनोज पवार, अनिल मोरे, विशाल गायकवाड, पवन सुरडकर, मनीष सोनवाल, अमर लोखंडे, अनिल वाघमारे,गौरव इंगळे आदी  उपस्थित होते.


संक्रापुर (प्रतिनिधी  )-राहुरी तालुक्यातील शेतकर्यांचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले असुन द्राक्ष डाळींब पेरु आंबा या फळबागांचेही नुकसान झालेले असुन  फळबागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना  नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील फळबाग शेतकऱ्यांनी केली आहे. नामदार प्राजक्त दादा तनपुरे आमदार लहु कानडे यांना दिलेल्या निवेदनात फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी पुढे म्हटले आहे की अति पावसामुळे डाळींब पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले फळे खराब झाल्यामुळे  ती  रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली खराब हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांचेही नुकसान झालेले आहे असे असाताना केवळ भुसार मालाचेच पंचनामे करण्यात आले असुन आम्हाला केवळ भुसार पिकाचेच पंचनामे करण्याचे आदेश असल्याचे अधिकार्यांनी सांगीतल्यामुळे फळबाग उत्पादकांनी नामदार प्राजक्त दादा तनपुरे व आमदार लहु कानडे यांच्याकडे दाद मागीतली आहे शासनाने फळबाग शेतकऱ्यानाही नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला असताना राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यावरच अन्याय का असा सवालही फळबाग उत्पादक रविंद्र खटोड देविदास देसाई नारायण जाधव दिलीप जाधव सुभाष दाते महेबुब शेख दिपक पांढरे सतीश देठे नबाजी जगताप लक्ष्मण चव्हाण वसंत लोखंडे अशोक टाकसाळ रोहीदासा खपके संजय जगताप आदिसह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

बुलडाणा - 25 ओक्टोबर

पिढीजात शत्रू असलेल्या एका सापाला बेंडकाने कडवी झुंज देत सापाला शह देऊन आज विजयादशमीचा खरा विजयोत्सव साजरा केल्याचा प्रकार सुंदरखेड भागातील शिव शंकरनगरात समोर आला आहे.

     सत्यावर विजय म्हणजेच दसरा ! अन्यायाचा कडाडून विरोध करणे, अस्तित्वावर गदा आली तर प्राणाची बाजी लावणे, असे दृढ निश्चिय माणसेच नाही तर वन्यजीव देखील करतात.याचा प्रत्यय आज विजयादशमीला दुपारी १ वाजता बुलडाणा शाहराला लागून असलेल्या सुंदरखेडच्या नव्या परीसरात अयान आरो केंद्राजवळ पाहायला मिळाला. शत्रूलाही शुभेच्छा देण्याची आपली प्रथा असली तरी, बेडकाचा पारंपारीक शत्रू असलेला एक साप अयान आरो प्लॉन्ट जवळ एका नाल्यात बेंडकावर फुत्कारत असतांना,बेंडकानेही अस्तित्व पणाला लावत जगण्या- मरण्याचा संघर्ष केला. जवळपास अर्धा तासानंतर बेंडकाने लढत देत सापाला पराजित करुन विजयोत्सव साजरा केल्याचे बघ्यांनी अनुभूती घेतली. या निमित्ताने सत्याचा विजय निश्चितच होतो, हे पून्हा सिद्ध झाले आहे.


बुलडाणा - 25 ओक्टोबर

विजयदशमीच्या दिवशी सकाळी एका निर्दयी आईने एका दिवसाच्या बाळाला फेकून दिल्याची घटनेने संपूर्ण गांव हादरुन गेला आहे.

     बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथे पुरुष जातीचे एक दिवसाचे अर्भक आज 25 ओक्टोबर रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास काही महिलांना दिसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या महिलांनी अर्भक जिवंत असल्याची खात्री करत तात्काळ त्याला उचलून बुलडाणा ग्रामीण पोलिसांना संपर्क केला.ग्रामीण पोलिसाच्या पथकातील पीएसआई रामपुरे, बिटजमादार तायडे यांनी पोहोचुन पंचनामा करुण बाळाला ताबडतोब बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात


उपचारार्थ दाखल केले.हा बाळ कोणाचा आहे याची पोलिसाने माहिती काढली आहे. या प्रकरणी पोलिस पाटिल रवि प्रल्हाद गवई यांच्या तक्रारीवर बुलडाणा ग्रामीण ठाण्यात आई विरुद्ध भादवी ची कलम 317 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आईला सुद्धा उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. आई व बाळाची प्रकृती ठिक असल्याचे समजते.पुढील तपास थाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनात बिटजमादार तायडे करत आहे.

श्रीरामपुर (प्रतिनिधी) सरकारने भारतातील हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना इन्कम टॅक्स रिटर्न (दोन लाखापेक्षा अधीक)बंधनकारक करून एक प्रकारची जाचक अट लावली आहे.इस्लाम धर्मियांमध्ये हज करणे हे एक मूलभूत कर्तव्य आहे त्यामुळे मुस्लिम समाजातील लोक किमान एकवेळ तरी हज यात्रा व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात त्यासाठीच शेतमजूर,मोलमजुरी, शेतकरी इतरांच्या घरातील धुनी भांडी यासारखे छोटे मोठे काम करणारे सर्वसामान्य लोक सुद्धा हज यात्रेच्या अपेक्षेने आपल्या तुटपुंज्या मिळकतीतून थोडे फार पैसे वाचवून त्या पैशातून हज यात्रा करण्याचा मानस ठेवतात त्यामुळे अशी सर्वसामान्य लोक इन्कम टॅक्स रिटर्न  (दोन लाखापेक्षा अधीक) भरणे कस शक्य आहे? सर्वसामान्य लोकांचे हज चे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सदर अट रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग चे महाराष्ट्र प्रदेश सचिव सोहेल शेख (दारूवाला) यांनी केली

बेलापुर  (प्रतिनिधी  )- विविध गुन्ह्यात पोलीसांना हवा असलेल्या गुन्हेगाराच्या गाडीचा अपघात झाल्यामुळे ती गाडी व गावठी कट्टा पोलीसाच्या ताब्यात मिळाला असुन ती गाडी पोलीस स्टेशनला आणणार्या व्यक्ती विरुध्द आर्म अँक्टचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न  ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलीसांना मागे घ्यावा लागला. या बाबत समजलेली माहीती अशी की पोलीसांना खंडणी मारामारी दहशत पसरविणे धमकावणे अशा वेगवेगळ्या  गुन्ह्यात हवा असणारा गुन्हेगार  आकाश अशोक बेग उर्फ टिप्या बेग याच्या गाडीचा श्रीरामपुर बेलापुर रस्त्यावर असणार्या मोसंबी बागेजवळ अपघात झाला त्या वेळी दोन्ही गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या वेळी दोन्ही गाडी चालकांची आपापसात समेट झाली

त्यामुळे कुणीही पोलीसांकडे तक्रार दाखल केली नाही दरम्यान दोन्ही अपघातग्रस्त गाड्या दुरुस्तीसाठी आणत असतानाच एक गाडी गुन्हेगार टिप्या बेग याची असल्याची बातमी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीराट यांना समजली त्यांनी तातडीने ती गाडी ताब्यात घेण्याचे आदेश दिले त्या वेळी बेलापुरातील नितीन शर्मा हा ती गाडी घेवुन येत असताना पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले त्यावेळी गाडीत गावठी कट्टा आढळला त्यामुळे पोलीसांनी नितीन शर्मा याचेवर आर्म अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली हे भाजपाचे कार्यकर्ते सुनिल मुथा यांना समजताच त्यांनी ग्रामस्थासह बेलापुर पोलीस स्टेशनला धाव घेतली नितिम शर्मा हा केवळ अपघातग्रस्त गाडी आणत होता त्यामुळे त्याचेवर खोटा गुन्हा दाखल करु नका नाहीतर गाव बंद ठेवु रस्ता रोको करु असा ईशारा देण्यात आला भाजपाचे प्रकाश आण्णा चित्ते व सुनिल मुथा यांनी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्याशी संपर्क साधुन खोटा गुन्हा दाखल करु नये

अशी मागणी केली अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे व उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांनी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्याशी चर्चा केली व नितीन शर्मा याचा जबाब घेवुन सोडून देणार असल्याचे सांगितले त्यामुळे सुनिल मुथा व प्रकाश चित्ते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणारे आंदोलन स्थगीत करण्यात आले त्या नंतर पत्रकाराशी बोलताना पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट म्हणाले की गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्यास पाठीशी घालण्याचा कुणीही प्रयत्न करु नये आकाश बेग उर्फ टिप्या बेगवर  वेगवेगळ्या स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्या गाडीला अपघात झाल्याचे समजताच श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने तातडीने ती (एम एच ०२ ऐ पी ९२१६ )गाडी ताब्यात घेवुन झडती घेतली असता गाडीत तीन राऊंड व एक गावठी कट्टा आढळला असुन तो जप्त करण्यात आला आहे फरार झालेल्या गुन्हेगाराचा शोध सुरु असुन लवकरच त्याला अटक करु असा विश्वासही पोलीस निरीक्षक बहीरट यांनी व्यक्त केला. 

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget