Latest Post

🔹2 छोटे वाहनात क्रोसिंग केले जात होते दारुचे बॉक्स
🔸बुलडाणा व मोताळा येथील ते दारू दुकानदार कोण?
बुलडाणा - (कासिम शेख)16 सेप्टेंबर)
नियम मोडत आपला निर्धारित मार्ग बदलून इतर दोन वाहनात दारूचे बॉक्स पलटी मारताना बुलडाणा एलसीबीच्या पथकाने आज 16 सप्टेंबर रोजी भादोला गावाजवळ तीन वाहने पकडले असून तीन्ही वाहन बुलडाणा ग्रामीण ठाण्यात लावण्यात आले आहे.ज्या दोन छोटे वाहनात दारूचे बॉक्स टाकले जात होते ते दारू विक्रेते कोण?बिल्टी औरंगाबाद च्या नावाने होती तर भादोला जवळ ही क्रोसिंग का केली जात होती,असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
        पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देशी दारू संत्राचे 800 बॉक्स घेऊन आयशर वाहन नागपूर हुन औरंगाबाद कडे निघाला होता.सदर दारु मे.निर्मल ट्रेडर्स,सर्वे नं.211,शॉप नं.5,हरसुल सांवगी, औरंगाबाद यांच्या नावाने होता. सदर वाहनाचा निर्धारित रुट नागपुर अमरावती अकोला खामगाव चिखली जालना व औरंगाबाद असा होता मात्र खामगाव नंतर चिखली कडे ना जाता सदर वाहन बुलढाण्याच्या दिशेने निघाला व बुलढाणा ग्रामीण ठाणे हद्दीतील ग्राम भादोला जवळ सदर मोठ्या वाहनातून दोन मिनी मालवाहू वाहनात माळ पलटी मारल्या जात असताना त्या ठीकाणी बुलढाणा एलसीबीचे पीएसआय मुकुंद देशमुख, अनिल भुसारी, भरत जंगले, विजय दराडे व श्रीकांत चिंचोले पोहोचले व त्यांनी वाहनाची बिल्टी चेक केली असता त्यांच्या लक्षात आले की वाहनचालकाने आपला निर्धारित मार्ग बदललेला आहे.त्यामुळे सदर तिन्ही वाहन ताब्यात घेऊन त्यांना बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे.पलटी मारलेली दारू बुलडाणा येथील 2 व मोताळा येथील एक देशी दारू दुकानावार जात असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेचा पंचनामा करून आता पुढील कारवाईसाठी अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती बुलडाणा एलसीबीचे पीआय महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- शासनाने ग्राहकांच्या हिताचा विचार करुन वन नेशन वन रेशन सुरु केलेल्या योजनेचे ग्राहक पंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले असुन या उपक्रमामुळे ग्राहकांची गैरसोय दुर होणार असल्याचे मत नाशिक विभाग ग्राहक पंचायतीचे  उपाध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी व्यक्त केले  आहे . ग्राहक पंचायतीच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात श्रीगोड यांनी पुढे म्हटले आहे की आज पर्यत कार्डधारकाला ज्या स्वस्त धान्य दुकानाचे रेशन कार्ड असेल त्याच दुकानातून धान्य घेण्याची मूभा होता रोजगाराच्या शोधार्थ अनेक कुटुंब दुसर्या जिल्ह्यात दुसऱ्या राज्यात जात असतात त्या ठिकाणी मोल मजुरी करत असताना त्यांना रेशनकार्ड असुन देखील जादा भावाने धान्य खरेदी करावे लागत होते तीच अवस्था ऊस तोडणी कामगारांची होती ऊस तोडणी करीता हे लोक आपल गाव सोडून दुसर्या जिल्ह्यात चार पाच महीने जातात त्या वेळी त्यांना आपले हाक्काचे राशन खरेदी करता येत नव्हते  या बाबीचा शासनाने गांभिर्याने विचार करुन वन नेशन वन रेशन ही योजना सुरु केली शासनाच्या या उपक्रमामुळे आता ग्राहाकाला आपल्या पध्दतीने कुठल्याही दुकानातुन आपले हक्काचे राशन घेता येणार आहे केवळ राशन घेण्याकरीता ग्राहकाला आपल्या गावी जाण्याची गरजच भासणार नाही ग्राहकाचे हित लक्षात घेवुन शासनाने घेतलेल्या निर्णयाचे ग्राहक पंचायतीचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष रणजीत श्रीगोड श्रीरामपूर तालुकाध्यक्ष गोरख बारहाते संदिप अग्रवाल रमेश चंदन अनिता आहेर सुजाता मालपाठक आदिनी स्वागत केले आहे.

बेलापूर : (प्रतिनिधी  )-बेलापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संग्राम चांडे  यांनी आपल्या कर्तव्याचे पालन न केल्याने  कामात हलगर्जीपणा केल्याच्या गंभीर कारणावरुन निलंबित करण्यात आल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी काढले असुन या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तक्रार करुन कारवाई साठी पाठपुरावा केला होता                                        गटविकास अधिकारी  पंचायत समिती श्रीरामपूर  यांनी  ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे यांना दिनांक २७ जुलै १४ आँगस्ट  व २ सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती संग्राम चांडे ग्रामसेवक ग्रामपंचायत बेलापूर बु!! तालुका श्रीरामपूर 
यांनी केलेल्या आर्थिक अनियमितता व हलगर्जीपणा बाबत त्यांना सेवा निलंबित का कराणेत येवु नये या बाबतचा खूलासा मागविलेला होता संदर्भ  क्रमांक २ चे पत्रासोबत चांडे यांना सदरची नोटीस दिनांक  ७आँगस्ट रोजी बजावलेली पोहोच सादर केलेली आहे संदर्भ क्रमांक ३ चे पत्रान्वये चांडे यांनी अद्याप खूलासा सादर केला नसल्याचे या कार्यालयास कळविले असुन अपण जिल्हा परिषद कर्मचारी असुन सदैव निस्पृह सचोटीने वागणे व कर्तव्य परायण असणे आवश्यक आहे तथापी आपण कर्तव्याचे पालन न केल्याने आपण महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक ) नियम १९६७ चा नियम ३ चा भंग केलेला आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील )नियम १९६४ मधील नियम ३(१) अ मध्ये दिलेल्या तरतुदीस अधीन राहुन मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन या आदेशाद्वारे चांडे यांना आदेश बजावल्याच्या दिनांकापासुन जि प सेवेतुन निलंबीत करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे  बेलापूर येथील एका व्यक्तीच्या नावे एक लाख ८७ हजार रुपयाचा बेअरर चेक काढण्यात आला  ग्रामपंचायतीत असे अनेक व्यवहार हे रोखीने केल्याचे उघड झाले ईलेक्ट्रीक सामान खरेदी देखभाल दुरुस्ती या करीता तीन लाख २५ हजार रुपये खर्च दाखविण्यात आला  पाणी पुरवठा सामान खरेदी देखभाल दुरुस्ती या करीता पाच लाख ७५ हजार रुपये खर्च दाखविण्यात आला हा सर्व व्यवहार चेक स्वरुपात होणे आवश्यक होते परंतु रकमा रोख स्वरुपात काढण्यात आल्या तसेच खरेदी केलेल्या वस्तूची ग्रामपंचायतीच्या साठा रजिस्टरमध्ये कुठल्याही प्रकारची   नोंद आढळली नाही
 निधी वाटप करताना अपंगांचे प्रमाणपत्र नसताना धनादेश काढले, मागासवर्गीयांचे वैैयक्तिक लाभाचे धनादेश मयत व्यक्तीच्या नावे देणे, ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीचे बील एकाच खरेदीवर दोनवेळा काढण्यात आले  कॅमेर्यांची खरेदी ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असताना वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली नाही, पथ दिव्यांच्या खर्चामध्ये आर्थिक अनियमितता केली, , अंगणवाडीची तीन लाख रुपयांची खेळणी ई खरेदी ऐवजी केवळ कोटेशनवर केली, इलेक्ट्रिकल साहित्याची खरेदी व पाणीपुरवठ्यातील पाईपलाईनच्या खरेदी आदींबाबत जि प सदस्य शरद नवले यांनी तक्रारी केल्या होत्या. तसेच चुकीचे काम करणार्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी प सदस्य नवले यांनी केली होती
या तक्रारींची दखल घेत तत्कालीन सीईओ शिवराज पाटील यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांना नियुक्त करण्यात आले. आभाळे यांनी  विस्तार अधिकारी व्ही एन चर्हाटे आर डी अभंग तसेच कृषी अधिकार्यांच्या देखरेखीखाली दप्तर तपासणी केली. कामांची बिले व अदा केलेले धनादेश यांचीही माहिती घेतली. चौकशीत नियमांची पायमल्ली केल्याचे व आर्थिक अनियमितता केल्याचे नमूद करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी या अहवालाच्या आधारे  कर्तव्यात कसुर करुन हलगर्जीपणा केल्याचा गंभीर ठपका ग्रामसेवक संग्राम चांडे यांचेवर ठेवुन त्यांना निलंबन केले.  या सर्व अनियमितता व चुकीच्या खरेदी प्रकरणी चांडे यांना जि प सदस्य शरद नवले यांनी   वेळोवेळी सावध केले होते  राजकीयदृष्ट्या तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीतील  कारवाईकडे तालुक्याचे लक्ष होते.या कारवाई नंतर आता आणखी कुणावर कारवाई  होते याची चर्चा गावात सुरु असुन काँग्रेस सोबत जनता अघाडी यांच्या ताब्यात ग्रामपंचायतीचा कारभार आसताना  ईतका सावळा गोंधळ चालू असताना जनता अघाडीचे नेते गप्प का होते असाही सवाल विचारला जात आहे.

श्रीरामपूर ( प्रतिनिधी  )-अहमदनगर गुन्हा अन्वेषन विभागाने लोणी पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या जुगार अड्डयावर छापा टाकुन 
रोख रक्कम , मोबाईल , दुचाकी व चार चाकी वाहनासह एकूण ४४,लाख  -रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन या कारवाई मुळे जुगारअड्डा चालकाचे धाबे दणाणले आहे 
राहता तालुक्यातील विविध गावांमध्ये जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे अहमदनगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाला समजल्यानंतर राहता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथे लोणी ते कोल्हार रोड लगत असणाऱ्या एका इमारतीच्या टेरेस वर चालू असलेल्या जुगार अड्ड्यांवर नगरच्या गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच धाड टाकून पोलिसांनी 44 लाख 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ,तसेच कोल्हार येथील या जुगार अड्ड्यावर सुमारे 41 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यामध्ये मोठे प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचे बोलले जात आहे,  पोलिसांच्या या  धाडीमुळे जिल्ह्यातील जुगार अड्ड्यावाल्यांना मोठी जरब बसली आहे,
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अहमदनगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाला, या विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना रविवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली होती की, कोल्हार परिसरात मुदस्सर शकील शेख रा,कोल्हार बुद्रुक हा कयूम करीम शेख याच्या इमारतीच्या टेरेसवर पंचवीस ते तीस लोकांना घेऊन तिरट नावाचा जुगार खेळत आहे, त्यानंतर पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी एक टीम तयार करून संबंधित इमारतीला घेतले तर काही कर्मचाऱ्यांनी येथे टेरेस गाठले ,त्यावेळी तेथे एक दोन नव्हे तर चार डाव सुरू होते, त्यामुळे हा एक टाईमपास गेम नव्हे तर हा जुगार असल्याचे पोलिसांना समजून आले, पोलिसांनी या ठिकाणी त्वरित छापा टाकून संबंधित जुगार खेळणारे आरोपींना ताब्यात घेतले, काही पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र या ठिकाणाहून पोलिसांनी एकूण 44 लाख सतरा हजार 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ,तसेच 41 व्यक्तींवर या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, या जुगार अड्यावरून दुचाकी, मोबाईल, जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, अन्य मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे, यातील बहुतांशी लोकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत , जुगार खेळणाऱ्या मध्ये शिर्डी, रुई, राहता, लोणी ,अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदा ,मनमाड, येवला,येथील जुगार्यांचा सामावेश आहे   विविध तालुक्यातून हे जुगार खेळणारे जुगारी प्रतिष्ठित असणारे लोक येथे येत होते, कोल्हार येथील जुगार अड्ड्यांवर झालेल्या कारवाईत चेतन विजय वाघमारे,( पिंपळस). मुद्दत शकील शेख.(कोल्हार बुद्रुक. )सागर बेदाडे, व अशपाक जमीर शेख (,मनमाड) ,दिलावर मन्सूर शेख ,(कोल्हार बुद्रुक,)
आरबाज राजू पठाण (,राहता) माहिद कयूम शेख, (कोल्हार बुद्रुक) बुबेरखान निसारखान पठाण संगमनेर ,आसिफ तसलीम शेख (कोल्हार बुद्रुक,) अरशद रशीद मोमीन( येवला), वसंतलक्ष्मणबडे( येवला ,)अमित गाडेकर (राहता ,)लालू मारुती चौधरी (अकोले), कयूम गुलाब पठाण( विसापूर, तालुका श्रीगोंदा,) नवाब हुसेन शेख लोणी, जाहीद दिलावर सय्यद (कोल्हार, )सय्यद अली मोहम्मद, जयहिंद गोविंद माळी( राहुरी,) विलास दत्तात्रय चोथे (वांबोरी ,)सागर मदनलाल वर्मा, (बेलापूर ,तालुका श्रीरामपूर,) गणेश विठ्ठल जेजुरकर( ,शिर्डी,) इम्राण याकुब मोमिन( मनमाड,) शकील सलीम शेख (कोल्हार,) नजीर अजीज शेख (राहुरी).
संतोष बाबुराव चौधरी (अकोले ,)शकील जबर शेख (कोल्हार बुद्रुक),
संजय कांतीलाल पटेल ,(कोल्हार,) नुमान सत्तार शेख (कोल्हार, )भाऊसाहेब रामराव चौधरी (रुई,तालुका राहता )
सचिन बाळाराम पवार (,कोल्हार ),अमोल भास्करराव वाघमारे. (विसापूर तालुका श्रीगोंदा,) गणेश रंगनाथ सोमासे .(येवला ),महेश अण्णा बरकल (,मनमाड.)आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अहमदनगरचे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत. या मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकल्यामुळे जिल्ह्यातील इतर जुगार अड्डे ही व त्यांच्या मालकांवर आणि जुगार खेळणाऱ्यांवर मोठी जरब,भिती निर्माण झाली आहे,

श्रीरामपूर  (प्रतिनिधी  )-केंद्र शासनाने सुरु केलेल्या "एक देश एक रेशनकार्ड " या योजनेचा प्रचार व प्रसार व्हावा या करीता  श्रीरामपूर तहसील कार्यालय तसेच स्वस्त धान्य दुकान या ठिकाणी विशेष मोहीम राबविण्यात आली.शासनाच्या "वन नेशन वन रेशन " या योजनेंतर्गत आता रेशन कार्डधारकाला सोयी नुसार कुठल्याही धान्य दुकानात आपल्या हक्काचे धान्य खरेदी करता येणार आहे .या पूर्वी ज्या स्वस्त धान्य दुकानात संबंधित कार्डधारकाचे रेशनकार्ड होते त्याच स्वस्त धान्य दुकानातुन माल खरेदी करावा लागत होता. काही कारणास्तव कार्डधारक बाहेरगावी गेला तर पाँज मशिनवर अंगठा न देता आल्यामुळे संबधीत कार्डधारकाला अन्न धान्यापासुन वंचित रहावे लागत होते . अनेक नागरीक रोजगाराच्या शोधार्थ एका राज्यातून दुसर्या राज्यात एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जात असत . त्या ठिकाणी रोंजदारीची कामे करत असताना त्या कुटुंबाचे रेशनकार्ड असुन देखील त्यांना चढ्या भावाने धान्य खरेदी करावे लागत होते . या बाबीचा शासनाने गांभीर्याने विचार करुन संपूर्ण भारत देशात "एक देश एक रेशनकार्ड "ही योजना सुरु करण्याची  संकल्पना सुरु केली . सुरुवातीला काही राज्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरु केली . या योजनेला मिळालेला प्रतिसाद पहाता आता सर्वत्र ही योजना सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला . त्या करीता जिल्हा व तालुका पातळीवर या योजनेचा प्रचार व प्रसार करण्याच्या सुचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात आल्या . अहमदनगरच्या जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी तातडीने सर्व उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार यांना या योजनेची नागरीकांना माहीती देण्याच्या सूचना केल्या . त्यांच्या सुचनेनुसार श्रीरामपूर तहसील कार्यालय , तालुक्यातील धान्य दुकाने यां ठिकाणी फलकाव्दारे जनजागृती करण्यात आली उपविभागीय आधिकारी अनिल पवार, तहसीदार प्रशांत पाटील यांच्या सूचनेनुसार पुरवठा अव्वल कारकून चारुशिला मगरे , गोदामपाल शिवाजी वायदंडे , पुरवठा निरीक्षक अतुल भांगे , पुरवठा विभागाचे  शिवशंकर श्रीनाथ , धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई , लाला गदिया , नरेंद्र खरात  , माणिक जाधव, किशोर छतवाणी , दक्षता समितीचे संदीप वाघमारे यांच्या उपस्थितीत फलकाद्वारे या योजनेची माहीती लाभधारकांना देण्यात आली.

मुस्लिम समाजाला 10% आरक्षण संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावे या मागणीसाठी श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे
श्रीरामपूर शहर व तालूका मुस्लिम आरक्षण अधिकार कृती समिती यांनी आज ७ सप्टेंबर रोजी तहसीलदार श्रीरामपूर यांच्याद्वारे  मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, अल्पसंख्याक मंत्री महाराष्ट्र राज्य,सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री अहमदनगर याना निवेदन देण्यात आले.
श्रीरामपूर शहर व तालूका मुस्लिम आरक्षण अधिकार कृती समिती संस्थापक सदस्य,फहीम शेख,फय्याज इनामदार,नाजीम शेख,आसीफ शेख,मार्गदर्शक व मा,संचालक महाराष्ट्र राज्य ऊर्दु महामंडळ हाजीआरीफभाई बागवान,माजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इब्राहीमभाई शेख,अर्शद.                     इनामदार,आबुजर खान,इकबाल शेख,अफजल मन्सुरी,राजु मलंग,जफर शेख,साजीद मिझा,अन्वर पठाण,अकील शेख,सादीक शेख,अकबर पठाण,जुल्फेकार बागवान,आसिफ बागवान व  श्रीरामपूर शहर व तालूका मुस्लिम आरक्षण अधिकार कृती समिती सदस्य हजर व त्यांच्या सह्या होत्या.

पुणे सुप्रसिद्ध अंध कवयित्री व अंध जनांसाठी भरीव असे सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ. प्रतिभा मोरेश्वर भोळे यांचे 1 सप्टेंबर रोजी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने निधन झाले. कोरोना  कालावधीमध्ये त्यांची अंत्यसंस्कार करणेदेखील दुरापास्त झाले होते. अशा वेळेला माणुसकीच्या दृष्टिकोनातून कोरोना कालावधी मध्ये काम करणाऱ्या मूलनिवासी मुस्लिम मंच या संस्थेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारून हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे डॉ. प्रतिभा भोळे यांचा अंत्यसंस्कार पुणे वैकुंठ स्मशानभूमी येथे करून जाती-धर्माच्या भिंतींना पुण्यामध्ये थारा राहणार नाही असे उदाहरण दाखवून दिले.मराठी सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत मानाचे स्थान असणाऱ्या ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांच्या नात असणाऱ्या प्रतिभा हे अंध असल्यामुळे साहित्य क्षेत्रात मोठा संघर्ष करावा लागला होता तरी देखील आपल्या प्रतिभा आणि सातत्याच्या जोरावर त्यांनीही कवयित्री म्हणून तसेच अंध व अपंग जनांसाठी काम करणारी  स्वयंसेविका म्हणून मोठे नाव कमावले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत शासकीय व खाजगी संस्थांमार्फत विविध स्वरुपाचे पुरस्कार मिळालेले आहेत.अत्यंत मोठा मित्र परिवार व नातेसंबंधातील गोतावळा असतानाही अखेरच्या क्षणी मात्र त्यांच्या पतीशिवाय कोणी सोबत राहिले नाही. पत्नी मेल्याचे दुःख असताना अंतिम संस्कार करण्यासाठी जवळचे मित्र व नातेवाईक कोणीही उपलब्ध नसल्यामुळे भोळे यांचे पती सुनील परमार यांनी मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधाला यावेळी मूलनिवासी मुस्लिम मंचाने देखील  अवघ्या 20 मिनिटांमध्ये डॉक्टर भोळे यांच्या मदतीला पोहोचले सर्व आवश्यक ते सोपस्कार पूर्ण करून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथून डेड बॉडी घेऊन पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले. मूलनिवासी मुस्लिम मंचं यांनी आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या चारशे पेक्षा अधिक लोकांचे अंतिम संस्कार केलेले आहेत. यात मुस्लिम समाजा सोबतच हिंदू, ख्रिश्चन,लिंगायत,बौद्ध आदी सर्व धर्मीय लोकांचे अंतिम संस्कार केलेले आहे.जात-पात न पाहता मदत करणे हेच पुणेकरांचे वैशिष्ट्य असून सर्व मानवतावादी महापुरुषांची परंपरा पुढे चालवत आम्हीदेखील जात-धर्म विरहित काम करण्याचा कसोशीने प्रयत्न करत असल्याने आम्हाला सर्व लोकांचे सहकार्य मिळत आहे.सुप्रसिद्ध कवयित्री डॉक्टर प्रतिभा भोळे यांचा अंत्यसंस्कार आमच्या हातून होणे हे आमच्यासाठी भाग्याचे लक्षण आहे.असे आम्ही मानतो अशी भूमिका मनोगत मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार व त्यांचे सहकारी साबीर शेख तोपखाना, झमीर मोमिन, मोलाना शकिल शेख,साबीर सय्यद,दानिश खान,अमजद शेख व्यक्त केली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget